आरोग्यदायी सेवा

1/172

आरोग्यदायी सेवा

अध्याय १—आपले महान उदाहरण

मी तुमच्यामध्ये सेवा करणाऱ्यासारखा आहे

आपला प्रभु येशू ख्रिस्त या जगामध्ये न थकता गरजवंतांच्या गरजा पुरविण्यासाठी आला व त्याने स्वत: आमचे विकार घेतले आणि आमचे रोग वाहिले.” (मत्तय ८:१७). अशासाठी की मानवाची सर्व आवश्यकता तो पुरी करु शकेल. तो आमचे पाप दुर्दैव आणि आजाराचे ओझे स्वत:वर घेण्यासाठी आला. मानवाला आरोग्य दान हा त्याच्या सेवेचा मुख्य उद्देश होता. तो आपल्याला आरोग्य शांती व सौख्य प्रदान करण्यासाठी आला. MHMar 1.1

त्याच्याकडून सहाय्य प्राप्त करण्यासाठी येणाऱ्यांच्या वेगवेगळ्या समस्या आणि गरजा होत्या आणि त्यामधून सहाय्य मिळाल्यावाचून कोणीच परत गेला नाही. त्याच्यामधून आरोग्यदान करण्याचा एक झरा वाहत होता. एक शक्ति वाहत होती. त्यामुळे मनुष्याचे शरीर, मन आणि आत्म्याला पूर्ण आरोग्य प्राप्त होत असे. मुक्तिदात्याचे हे कार्य कोणा काळ व स्थानावर मर्यादित नव्हते. त्याच्या दयाळू व कनावाळूपणाला मर्यादा नव्हती, त्याच्या प्रीतिला सीमा नव्हती. त्याच्या रोगमुक्ति आणि शिक्षण देण्याचे सेवा कार्य इतके विस्तृत होते की पॅलेस्टाईनमध्ये अशी कोणतीच इमारत नव्हती की ज्यामध्ये त्याच्याभोवती गर्दी करणारा जमाव त्या इमारतीत मावू शकेल. गालीलातील हिरवळ असलेले डोंगर, रस्ते, समुद्र किनारे, प्रार्थना स्थळे आणि प्रत्येक उपलब्ध असणारी सर्व ठिकाणी आजारी लोकांना आणले जात असे तेथेच त्याचे रुग्णालय होत असे. प्रत्येक शहर, गाव, पेठा ज्या ज्या ठिकाणी तो जाईल तेथे आजारी लोकांवर हात ठेऊन तो त्यांना बरे करीत असे. ज्या ठिकाणी त्याचा संदेश स्विकारण्यासाठी लोक आपली हृदये खुली करीत तेथे तो त्यांना स्वर्गीय पित्याच्या प्रीतिचा विश्वास देत असे. पूर्ण दिवस जे लोक त्याच्याकडे येत त्यांची तो सेवा करी. जे लोक दिवसभर आपल्या कुटुंबासाठी कष्ट करित असत संध्याकाळी तो त्यांच्याकडे लक्ष देई. MHMar 1.2

येशूने मनुष्याच्या मुक्तिचे मोठे ओझे असलेली मोठी जबाबदारी स्वत:वर घेतली. त्याला ठाऊक होते की मानवाने जोपर्यंत आपले उद्देश आणि सिद्धांत बदलण्याचे निश्चित ठरवत नाही तोपर्यंत सर्व काही नष्ट होईल त्याच्या आत्म्याचे तेच एक मोठे ओझे होते. त्याचे हे ओझे कोणालाच समजू शकणार नव्हते. त्याचे बाळपण, तरुणपण आणि प्रौढपण तो एकटाच चालला व फिरला. तरीही त्याच्या उपस्थितीमध्ये किंवा सहवासात राहणे हे स्वर्ग सुखाचा आनंद लाभत असे. दिवसेन दिवस त्याला कष्ट आणि परीक्षांना तोंड द्यावे लागत होते. त्याला वाईटाच्या संपर्कात आणले गेले. त्याने आपल्या जीवनात वाईट शक्तिचा प्रभाव पाहिला या वाईट शक्तिने प्रभावित झालेल्या आत्म्यांना वाचून त्यांना आशीर्वादित करण्याच्या शोधामध्ये तो होता. तरीही तो निराश झाला नाही किंवा अपयशी झाला नाही. MHMar 1.3

प्रत्येक वस्तुमध्ये त्याने आपल्या इच्छांना कठोरपणाने आपल्या उद्देशामध्ये मिसळून घेतले. त्याने आपली प्रत्येक गोष्ट आपल्या स्वर्गीय पित्याच्या इच्छांच्या स्वाधीन केली आणि आपले जीवन गौरवयुक्त केले. त्याच्या बाल्यावस्थेमध्ये तो मंदिरामध्ये गुरुजनांमध्ये सापडला तेव्हा त्याच्या आईने त्याला विचारले की, “बाळा तू आमच्याशी असा का वागलास ?’ तेव्हा त्याच्या उत्तरामध्ये त्याच्या जीवनातील मुख्य कार्याच्या उद्देशाचा सिद्धांत दिसून आला. तो म्हणाला, “माझ्या पित्याच्या घरी मी असावे हे तुमच्या ध्यानात आले नाही काय ?” (लूक २:४८-४९). MHMar 2.1

त्याचे जीवन एक प्रकारे सतत आत्म बलिदान होते. या जगामध्ये त्याच्यासाठी आपले म्हणणारे असे कोणीच नव्हते, की घर नव्हते. एखाद्या वाटसरु प्रमाणे तो आपल्या मित्रांच्या दयेवर अवलंबून होता. आमच्यासाठी सर्वात दरिद्रीपणामध्ये जीवन तो जगला. गरजवंत आणि त्रासामध्ये असणाऱ्यांच्या मध्ये तो चालला. ज्या लोकांसाठी त्याने खूप काही केले त्या लोकांमध्ये ओळखीविना किंवा कोणत्याही सन्मानाशिवाय राहिला. MHMar 2.2

तो सदैव प्रसन्नचित्त आणि धैर्यशील होता तसेच दुःखी व कष्टी लोक त्याला जीवन आणि शांतीदूताच्या रूपाने पाहात होते व त्याचा सन्मान करीत होते. त्याने स्त्री-पुरुष आणि मुलांच्या गरजा पाहिल्या आणि त्या प्रत्येकाला त्याने निमंत्रित केले. “अहो कष्टी व भाराक्रांत जन हो तुम्ही सर्व मजकडे या.” आपल्या सेवाकार्यामध्ये येशूने सुवार्ता प्रचारापेक्षा रोग आजार बरे करण्यामध्येच जास्त काळ व्यतीत केला. त्याची आश्चर्यकारक कार्यच त्याच्या सत्य वचनाची साक्ष देत होती. की तो नाश करण्यासाठी नाही, परंतु जीवन देण्याकरिता आला होता. जेथे कोठे तो जाई त्याची दया आणि आरोग्यदायी खुषीचा उत्सव मानण्यात येत असे आणि शक्ति प्राप्त झालेले रुग्ण आनंदाचा उत्सव करीत असत. त्याच्याभोवती लोकांची गर्दी जमत असे आणि त्यांच्या कार्याची चर्चा प्रत्येकाच्या तोंडी ऐकायला येत असे. ज्यांच्या जीवनात येशूनेच चमत्कार केले ते लोक शांत बसत नसत. त्यांचा आवाजच प्रथम ध्वनी होता की अनेकांना प्रथमच त्याविषयी ऐकला होता. त्याचे नावच तो पहिला शब्द होता की अनेकांनी प्रथमच उच्चारीला होता. त्याचा चेहरा ही पहिलीच छबी होती की अंधांनी पहिल्या प्रथमच पाहिली होती. मग असे लोक का नाही येशूचा महिमा गाणार आणि का नाही त्याची स्तुति व त्याच्यावर प्रेम करणार ? ज्या ज्या शहरातून आणि पेठातून येशू गेला तो जीवन देणारा एक महान झरा असा झाला. जो खुशी आणि आनंदाचा खळखळाट करीत गेला. MHMar 2.3

“जबुलून प्रांत व नफताली प्रांत समुद्र किनाऱ्यावरचा, यार्देनच्या पलिकडचा परराष्ट्रयांचा गालील - अंधकारात बसलेल्यांवर प्रकाशाचा उदय झाला आहे आणि मृत्युच्या प्रदेशात व छायेत बसलेल्यांवर ज्योति उगवली आहे.” (मत्तय ४:१५-१६). MHMar 3.1

या मुक्तिदात्याने प्रत्येक मन आणि आत्म्यामध्ये आरोग्यदानाचा स्वर्गीय सिद्धांत बसविण्याची सुसंधी सोडली नाही. त्याच्या कार्याचा हाच एक उद्देश होता. येशूने जगातील लोकांना आशीर्वाद आणि आरोग्यदान अशासाठी दिले की स्वर्गातील शाश्वत समाचाराकडे ते आकर्षिले जातील. MHMar 3.2

येशूला यहूदी राज्यातील शिक्षकांमध्ये सर्वात उच्च स्थान मिळू शकले असते, परंतु त्याने गरीबांनाच राज्याची सुवार्ता सांगण्याचे पसंत केले. तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेला तर ज्या राजमार्गावर किंवा रस्त्याच्या कडेला असो ते सत्याची वाणी ऐकतील. समुद्र किनारे, डोंगरावर, नगरामध्ये, रस्त्यांवर आणि उपासना मंदिरामधून पवित्रशास्त्रामधून येणारी वाणी त्याने मंदिराच्या बाहेर रस्त्यावर आणि मोकळ्या ठिकाणी लोकांना शिकविल्या म्हणजे जे यहूदी नाहीत त्यांनाही ही वचने ऐकायला मिळतील. येशूची ही शिकवण शास्त्री व परुशांपेक्षा भिन्न होती. ती म्हणजे त्याने आपल्या वाणीने लोकांची मने वचनाकडे आकर्षित करीत असे. शास्त्री व परुशी परंपरेला चिकटून राहिले होते आणि मानवाने निर्माण केलेल्या सिद्धांताचा वापर करीत होते. त्यावरच अवलंबून होते. वचनाला सोडून मनुष्यांनी पाडलेल्या परंपरेवरच जास्त अवलंबून राहात होते व त्या विषयीच शिकवित होते. येशूच्या शिकवणीचा विषय केवळ परमेश्वराचे वचनच होते. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्याने साधेपणानेच दिली. तो म्हणाला, असे लिहिले आहे “वचन काय सांगते” किंवा “तू काय वाचतोस’ कोणत्याही वेळी शत्रुने किंवा मित्राने रुची दाखवून विचारलेल्या प्रश्नांना त्याने अशाच प्रकारची उत्तरे दिली आहेत. त्याने केवळ त्यांच्यासमोर वचनेच सादर केली होती. स्पष्टपणे आणि पूर्ण शक्तिने त्याने संदेशाचा प्रचार केला. वचनातूनच त्याने गुरुजन आणि संदेष्ट्यांच्या शिक्षणावर प्रकाश टाकला आणि लोकांसमोर प्रकाशनासारखे पवित्रशास्त्राचा उलगडा केला. त्याच्या तोंडून वचन ऐकणाऱ्यांनी अगोदर कधीच इतके सखोलपणे व स्पष्टपणे ऐकलेच नव्हते. MHMar 3.3

ख्रिस्तासारखा सुवार्ता प्रसारक अजूनपर्यंत कोणीच केला नाही. तो तर स्वर्गाचा राजा होता, परंतु नम्र होऊन त्याने मनुष्य स्वभाव धारण केला. कारण मानवाच्या पातळीवर येऊन त्याला मनुष्य बनायचे होते. म्हणजे तो मनुष्याला भेटू शकेल. श्रीमंत, गरीब, स्वतंत्र, दास अशा सर्व लोकांसाठी तो संदेश घेऊन येणारा तारणारा आला. रोग आजार बरे करणारी एक महान व्यक्ति म्हणून त्याची ख्याती सर्व पॅलेस्टाईनमध्ये पसरली. तो ज्या मार्गावरुन जाणार होता त्या मार्गावर लोक अगोदरच जाऊन पोहोचत असत. म्हणजे तो आला की मदत करण्याची ते विनंती करीत असत. त्याचे वचन ऐकण्यासाठी आणि त्याने आपणास स्पर्श करावा म्हणून अनेक आशावादी लोक त्याच्याभोवती गोळा होत. अशाप्रकारे हा गौरवी राजा नम्रतेच्या पेशामध्ये गावोगाव, शहरे आणि पेठांमध्ये गल्ल्यातून सुवार्ता सांगत आणि आजार बरे करीत फिरत होता. MHMar 4.1

त्याने राष्ट्राच्या वार्षिक उत्सवामध्ये भाग घेतला आणि या उत्सावामध्ये बाहेरुन येणारे आणि उत्सवात हरवून जाणाऱ्यांना त्याने स्वर्गीय आनंदाचे ज्ञान दिले ते ऐकून स्वर्गीय आनंद त्यांना मिळत असे. प्रत्येकासाठी त्याने स्वर्गीय ज्ञानाचे भांडार उघडून ठेवले. त्याने इतक्या सोप्या भाषेत सांगितले की सर्वांना सहज समजले. जे कष्टी व दुःखी होते. त्यांना त्याने आपल्या पद्धतीने समजाविले. आपल्या मृदू व कोमल आवाजामध्ये त्यांचे सांत्वन केले व रोग, आजार बरे केले. त्याने पापी व आजारी आत्म्यांना बरे करुन शक्तिप्रदान केली. MHMar 4.2

शिक्षकांच्या या सरदाराने लोकांच्या सामान्यज्ञान असणाऱ्या व माहीत असणाऱ्या वस्तूंची उदाहरणे देऊन त्यांच्या हृदयापर्यंत मार्ग तयार केला. त्याने सत्याला त्यांच्या समोर अशाप्रकारे सादर केले की त्यांच्या हृदय पटलावर पवित्र व संवेदनशीलपूर्ण कोरले गेले. त्याचे शिक्षण एकदम सरळ साधे व सोपे आणि योग्य असे असल्यामुळे सहानुभूति व प्रसन्नतापूर्वक असे होते. ऐकणारे मंत्रमुग्ध होऊन जात असत. ज्या पद्धतीने त्याने आणि उत्सुकतेने त्यांच्यासमोर मांडले की गरजवंतांना प्रत्येक शब्द पवित्र झाला. त्याचे जीवन इतके व्यस्त होते की त्याला विश्रांती नव्हती. दिवसेंन दिवस तो दुःखी व गरीबांच्या घरोघर जाऊन रोग आजार बरे करीत त्यांचे दुख निवारण करीत असे. त्यांना आशा व शांतीचे वचन सांगत असे. दया, करुणा व ममतेने तो दुःखाने झुकलेल्यांना आधार देऊन उठवत असे. त्यांचे सांत्वन करण्यासाठी तो जात असे. जेथे कोठे तो गेला आशीर्वाद घेऊन गेला. निर्धन लोकांची सेवा करीत असताना धनवानापर्यंत पोहोचण्याचं कार्यही त्याने केले. MHMar 5.1

त्याने श्रीमंत व सभ्य परुशांना व घरंदाज यहूदीयांना आणि रोमी शासकांची ओळख करुन घेण्याचा प्रयत्न केला. त्याने त्यांचे निमंत्रण स्वीकारले. त्यांच्या उत्सवामध्ये भाग घेतला. त्यांचे कार्य व आवड समजून घेतली आणि त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचून त्यांचा कधी नाश होऊ नये अशी धनसंपत्ति त्यांच्याकडे सोपवून दिली. MHMar 5.2

या जगामध्ये ख्रिस्त आला तो लोकांना दाखविण्यासाठी की स्वर्गीय सामर्थ्य प्राप्त करुन मनुष्य एक निष्पाप जीवन जगू शकतो. पूर्ण धैर्य आणि सहानुभूतीच्या सहाय्याने त्याने सतत लोकांच्या गरजा पुरविल्या. आपल्या प्रेमळ स्पर्शाने त्याने लोकांचे अशांत संशयी आत्मे बदलून मित्रत्व आणि विश्वासाने भरुन टाकले. तो कोणालाही म्हणू शकत होता की, “माझ्या मागे या” आणि ज्याला त्याने पाचारण केले तो उठून त्याच्यामागे चालला. जगातील आकर्षण निघून जात होते. त्याचा आवाज ऐकून आत्म्यातील लालसा आणि महत्त्वकांक्षा निघून जात असे आणि लोक उठून त्याच्या मागे जात असत. MHMar 5.3