ख्रिस्ती सेवा

73/256

पाळकांचे कर्तव्य

पाळकांनी सभासदांना सहाय्य करावे उपदेश करण्यासाठी नाही, परंतु मंडळीच्या उत्कर्षासाठी योजना करुन त्याप्रमाणे कार्य करण्याचे शिक्षण त्यांना द्यावे. प्रत्येक सभासदाला इतरांना काहीतरी करण्यासाठी काम द्या. त्यांना ख्रिस्ताची कृपा मिळविण्यासाठी तशाप्रकारचे शिक्षण देण्याचे सहाय्य करावे. विशेषतः जे विश्वासामध्ये नव्याने आले आहेत. त्या सर्वांनी एकत्र देवाचे सेवक बनण्यासाठी शिक्षण घ्यावे. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ९:८२. ChSMar 94.5

पाळक जे सत्याचे भाषण करतात ते मंडळी बाहेरील लोकापर्यंत पोहोचते. शक्य झाल्यास प्रत्येक मार्गांनी वैयक्तिक कष्ट लोकांना उत्साही करतात. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ९:१२४. ChSMar 95.1

पाळकांनी मंडळीतील सर्व सभासदांना आध्यात्मिकपणे वाढ होण्याचे शिकवावे म्हणजे देवाने त्यांना जी जबाबदारी दिली आहे ती त्यांनी इतरांमध्येती देऊन त्यांची वाढ करावी त्यांचे आध्यात्मिक जीवन वाढवावे. सत्याचे मार्गदर्शन इतरांना देण्याचे ओझे त्यांनी वाढवावे. त्यांनी इतरांना सत्य सांगून त्यांना सत्यात आणण्याचे ओझे सभासदांचे आहे. जे आपली जबाबदारी पार पाडू शकत नाहीत त्यांनी प्रार्थना करावी. भेटी द्याव्यात. पाळक लोकांवर कोणी अवलंबून राहू नये याची काळजी घेऊन त्यांना तशा प्रकारचे शिक्षण घ्यावे. या ऐवजी त्यांनी स्वत:ची कला वापरुन मंडळी बाहेरील लोकांना देवाकडे आणावे. इतरांना स्वत:ची कला वापरुन त्यांच्यापर्यंत सत्य घेऊन जावे. स्वर्गीय दूतांचे सहाय्य घेऊन त्यांनी सुवार्ता प्रकार करुन सत्य वचन पसरावे. स्वत:ची कला वापरुन त्यांच्यापर्यंत सत्य घेऊन जावे. स्वर्गीय दूतांचे सहाय्य घेऊन त्यांनी सुवार्ता प्रसार करुन सत्यवचन पसरावे. स्वत:चा अनुभव लोकांना सांगून त्यांचा विश्वास वाढावावा. यामुळे ते देवावरील विश्वासामध्ये बळकट करावे. - गॉस्पल वर्कर्स २००. ChSMar 95.2

अगोदरच तेथे कामकरी आहेत. त्यांच्यामध्ये काही विश्वासू आहेत. पाळकांनी अविश्वासणाऱ्यांना विश्वास ठेवण्याची गडबड करु नये. मंडळीच्या सभासदांना प्रशिक्षण देऊन सहकार्य करावे, परंतु त्यांनी स्वतंत्रपणे कार्य करुन आत्मे जिंकण्याचे कार्य करावे. त्यांनी आपल्या कार्याचा सखोल अभ्यास करावा व अनुभवही घ्यावा. काही सभासदांना पाळक आणि इतर अधिकाऱ्यांसाठी प्रार्थना करावी. मंडळीच्या सभासदांनी प्रार्थनापूर्वक आत्मे जिंकण्याचे कार्य केले, तर त्यांना नक्कीच यश मिळेल, परंतु प्रथम त्यांना प्रशिक्षण घ्यावे. - गॉस्पल वर्कर्स, १९६. ChSMar 95.3

मंडळीमध्ये पाळकाला काही सन्मान आहे. ज्या प्रमाणे एखाद्या गँगचा फोरमन तो जे सांगेल तसे ते कामगार काम करतात जसा जहाजाचा कप्तान त्याच्याखाली जे कामगार आहेत त्यांनी कप्तानने सांगितलेली प्रत्येक गोष्ट तंतोतंत करावी अशी त्याची अपेक्षा असते. याला अपवाद केवळ तातडीचे कार्य. एखाद्या मोठ्या कंपनीच्या मालकाला त्याच्या व्यवस्थापकाला काहीतरी दुरुस्त करीत होता. त्यावेळी अर्धा डझन इतर कामगार त्याच्या भोवती उभे होते व ते केवळ पाहात होते. मालकाने ते पाहिले आणि अन्याय होत आहे असे त्याला समजले. मालकाने व्यवस्थापकाला त्याच्या कामाबद्दल पूर्ण पगार देऊन रजा दिली. व्यवस्थापकाला नवल वाटले त्याने कारण विचारल्यावर मालक म्हणाला, “मी तुला सहा लोक तुझ्या हाताखाली दिले. मी पाहिले की तू एकटाच काम करीत होतास आणि सहा जण केवळ उभे राहून पाहात होते. तू करीत असलेले काम त्यांच्यापैकी कोणीही केले असते. अशा अवस्थेमध्ये काम न करणाऱ्या कामगारांना कामावर ठेऊ शकत नाही. एका कामगाराच्या कामासाठी मी सात कामगार ठेऊ शकत नाही.” ChSMar 95.4

ही घटना काही लोकांना लागू होते. ती सर्वांनाच नाही, परंतु अनेक पाळकांना ही गोष्ट समजत नाही किंवा मंडळीसाठी सभासद मिळविण्याचा ते तसा प्रयत्न करीत नसतील. तसे पाहता ते मंडळीच्या वेगवेगळ्या विभागामध्ये ते कार्य करण्यासाठी गुंतलेले असतील. पाळक लोक जर त्यांच्या मंडळीच्या कार्यामध्ये जास्त गुंतले असतील तर मंडळीची भरभराट होईल. यामुळे सभासदांना अभ्यास करण्यासाठी जास्त वेळ मिळेल आणि धार्मिक भेटीसाठी वेळ मिळेल आणि वेगवेगळे संघर्ष करण्याच्या भानगडीत पडू नये. - गॉस्पल वर्कर्स. १९७, १९८. ChSMar 96.1