ख्रिस्ती सेवा

55/256

निदनापासून गहू वेगळे

होईल देवाचा नाशवंत न्याय ही ज्यांना देवाचे सत्य समजण्याची संधी मिळाली नाही. त्यांच्यावर दया आहे. देव त्यांच्याकडे तो दयाळूपणे पाहाते. तो त्यांना दयेने स्पर्श करतो. त्याचा हात अजूनही त्यांना वाचविण्यासाठी पुढे करतो. याचवेळी जे त्याच्या राज्यात प्रवेश करु इच्छित नाहीत त्यांच्यासाठी दरवाजा बंद होतो. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ९:९७. ChSMar 78.3

लवकरच देव ज्यांची त्यांची मजूरी देईल जे देवाची सेवा करतात आणि जे करीत नाहीत. आता सर्व गोष्टींची चाळणी केली जाणार आहे. जे चाळणीतून हलत नाहीत किंवा पडत नाहीत ते चाळीत राहतील तेच चांगले असतील. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ९:१५,१६. ChSMar 79.1

आपत्ति आणि तारांबळाच्या वेळी जी राष्ट्रे पूर्णपणे भ्रष्टाचार आणि सैतानाच्या कह्यात गेले नाहीत. सैतानाची सेवा करीत नाहीत ते देवासमोर स्वत:ला नम्र करतील आणि पूर्ण हृदयाने देवाला शरण जातील. देव त्यांचा स्वीकार करील आणि त्यांच्या पापांची क्षमा होईल. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. १:२६९. ChSMar 79.2

अनेकजण बायबल वाचतात, परंतु त्यातील सत्य त्यांना समजत नाही ही सत्ये अति महत्त्वाची असतात. संपूर्ण जगातील स्त्री पुरुष उत्कंठतेने स्वर्गाकडे पाहात आहेत. प्रार्थना आणि अश्रु ढाळून प्रार्थना करीत आहेत. उत्सुकतेने चौकशी करीत आहेत. अनेकजण स्वर्गाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. आत प्रवेश मिळविण्यासाठी थांबलेले आहेत. - द अॅक्टस ऑफ अपोस्टल १०९. ChSMar 79.3

एलीयाच्या अनुभवावरुन धैर्य खचलेल्या काळातील पुष्कळ धडे शिकण्यासारखे आहेत. सत्यापासून दुरावलेल्या युगात देवाच्या सेवकांना अमोल्य धडे मिळतात. संदेष्ट्यांच्या काळात इस्त्राएल लोकांवर ज्या धर्म त्यागाने पकड घेतले होती त्याच्या सारखीच आजची परिस्थिती आहे. देवापेक्षा मानवाला उंचावणे, लोकमान्य नेत्यांचा गुणाणुवाद गाणे, धन पूजा, सत्य प्रगटी करणापेक्षा विज्ञान शाखाच्या शिकवणीला प्राधान्य देणे असे करण्याने आज बहुसंख्य बालमूर्तीचे अनुकरण करीत आहेत. संशय आणि अश्रध्दा मनावर व अंत:करणावर अपायकारक पगडा पाडीत आहेत. आणि अनेकजण दैवी प्रकटीकरणाच्या जागी मानवी तत्त्वज्ञान आणीत आहेत. देवाच्या वचनापेक्षा मानवी विचारसरणी श्रेष्ठ आहे. अशी शिकवण उघडपणे देण्यात येत आहे. देवाचे नियमशास्त्र धार्मिकतेचे दिव्य प्रणाम आज मितीला निरर्थक आहे असे विदित करण्यात येत आहे. शत्रु सर्व सत्याविषयीची फसवणूक करुन स्त्री पुरुषांना देवाच्या जागी मानवी विधिनियमांना उच्च दर्जा देण्यास प्रवृत्त करीत आहे आणि मानव जातीच्या उद्धारासाठी व सुख समधानासाठी जे अधिकृत करुन ठेविले आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यास भाग पाडीत आहे. तथापि हा धर्मत्याग विस्तृत असला तरी तो विश्वव्यापी नव्हता. जगातील सर्वजण स्वैरवर्तनी आणि पापी नाहीत. सर्वांनी शत्रुची बाजू घेतली नाही. ........ समोर गुडघे टेकलेले अजून हजारो आहेत. ख्रिस्त व त्याच्या नियमशास्त्राचे समग्र ज्ञान संपादन करुन घेण्यास अनेकजण आग्रही आहेत. पाप व मरण यांचे साम्राज्य नष्ट करण्यासाठी येशू लवकरच येईल याची अपेक्षा करीत आहेत. अज्ञानाने पुष्कळजण बालमूर्तीची पूजा करीत आहेत. परंतु देवाचा आत्मा त्यांच्यासाठी जोराचा प्रयत्न करीत आहे. - प्रॉफेटस अॅण्ड किंग्स १७०, १७१. ChSMar 79.4