ख्रिस्ती सेवा
साधनांचे योग्य कारभारीपण
आपल्या सर्व उपलब्ध साधनांद्वारे परमेश्वराची, जो प्रारंभ व शेवट आहे त्याच कार्य पूर्णत्वाकडे गेलं पाहिजे. CETFTC - ९.४९. ChSMar 257.2
पैशाच मुल्य अमुल्यच. देवाच्या लेकरासाठी पैसा हा भुकेल्यास अन्न, तहानलेल्यास पाणी, निर्वस्त्रांना वस्त्र, दबलेल्यांसाठी बचाव आणि रुग्णांसाठी औषध या रुपात आहे. जर तुम्ही ऐहिक गरजासाठी पैसा खर्च करता तर त्याचे मुल्य शून्य आहे, परंतु गरजूंना मदत व प्रभुचे कार्य पुढे नेण्यास त्याचा उपयोग झाला तरच योग्य ! ख्राइस्टस् ऑब्जेक्ट लेसन्स ३५१. ChSMar 257.3
त्याचे कार्य पुढे जाण्याकरिता परमेश्वराने आराखडा बनिवलेलो आहेच आणि त्याच्या लेकरांना ही साधने मुबलक दिली आहेत. इतकी की जेव्हा तो हाक देईल मदतीकरिता, तेव्हा लगेचच त्याला प्रतिसाद देताना म्हणतील, ‘देवा तुझ्या दिलेल्या साधनामुळे येणारी आणखीन साधने उपलब्ध झाली आहेत. TFTC - ९-५८. ChSMar 257.4
तुम्ही धन पुढच्या जन्मात घेऊन जावू शकत नाही. जस तुमचा आत्मा तुम्ही नेऊ शकत नाही. आपल्या धनराशीतला एक रुपया सुद्धा आपल्या हक्काचा नाही तर परमेश्वराचा आहे अस समजावे आणि हे अनमोल धन आपण वाह्यात गोष्टीसाठी खर्चु नये, तर काळजीपूर्वक परमेश्वराच्या कार्यास जसे की आपत्ततीत असणाऱ्याच्या मदती करिता वापरावा. लाईफ स्केचेस २१४. ChSMar 257.5
संपूर्ण जगामध्ये जे सुवार्ता प्रसार कार्य करावयाचे आहे त्यासाठी आपला अनुभव व पाठींबा पुरेसा नाही काय ? आपण आपल्या देणग्या परमेश्वराच्या तिजोरीमध्ये जमा कराव्यात जेणेकरुन दुसऱ्या देशाला सत्याची खाजगी / भेट मिळावी आणि आपला स्थानिक सुवार्ता कार्य ही अबाधित रहावे. अशाने आपणास स्वर्गात जाण्यास मान्यता मिळावी ना ? मागील कार्य काही महामहिम व्यक्ति किंवा जगीक अनुभवातून घडले नाही. ते आजतागायत आपला स्व-त्याग मुळे कार्यरत आहे. ख्रिस्ताच्या दुःख सहन करण्याच्या प्रक्रियेमध्ये परमेश्वराने आपणास सहभागी केले आहे आणि त्याने अशी तरतूद ही केली आहे की जेव्हा अंतिम काळात नवीन पृथ्वी होईल तेव्हा आपण त्याचे वारसदार बनु. - द रिव्ह्यु ॲण्ड हेरॉल्ड - डिसें. २, १८९०. ChSMar 257.6
प्रत्येक दानार्पण नोंद केले जाते. देवदूता तर्फे, हे मला दाखवण्यात आलं. त्याचप्रमाणे साठवणूक ली जाते आणि पूनश्च साधन रुपात त्याचा वर्षाव केला जातो हे सर्व मला दर्शविण्यात आले आहे. परमेश्वराची दृष्टी त्याच्या कर्यासाठी वापरलेल्या प्रत्येक गोष्टीकडे असते तसेच ते देणारा आनंदाने देतो की निरीच्छेने हे ही तो पाहतो. त्याच्या मागचा उद्देश ही क्रमवार केला जातो. प्रभुच्या कार्याच्या गरजेनुसार ज्यांनी नि:स्वार्थपणे काही दिलेले असते ते त्याच्या बक्षिसास मुकणारच नाहीत. तथापि जरी अशा प्रकारच्या देणगीदाराकडून मिळेला धनाचा गैरवापर झाला आणि प्रभुचे कार्य जे परमेश्वराची स्तुती तसेच तारण ह्या गोष्टी जरी साध्य झाल्या नाहीत तरीही ज्याने विश्वासाने, आत्म्याच्या सरळपणाने परमेश्वराच्या गौरवा प्रित्यर्थ दिले आहे. तो कदापि प्रतिफळास / बक्षीसास मुकणार नाही. - टेस्टिामेनिज ऑफ चर्च २:५१८, ५१९. ChSMar 258.1
एखाद्या गरजू बांधवास केलेली मदत वा सुवार्ता प्रसारास केली गेलेली मदत ही एखाद्या रत्नाप्रमाणे स्वर्गीय बँकेमध्ये सुरक्षित ठेवली जाते. परमेश्वर या वेळी आपली परीक्षा पहात नव्हता, निरीक्षण करत असतो. परमेश्वर सढळ हाताने आपण देतच असतो आणि आता तो याचे ही निरीक्षण करतो की तुम्ही त्याचा वापर कशाप्रकारे करत आहात. तुम्ही गरजूंना मदत करीत आहात काय ? आत्मे जिंकण्यास वापर करतात काय ? या सर्व संधीच आपण केलेलं सोनं त्याच्या स्वर्गिय खजिन्यात तो ठेवतो. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च - ३:२४९, २३०. ChSMar 258.2