ख्रिस्ती सेवा
पाहुणचार हा ख्रिस्ती धर्म व कर्तव्य
या जगामध्ये आपले कार्य म्हणजे इतरांसाठी जगणे, त्यांचे चांगले करणे, त्यांना आशीर्वाद द्या. त्यांचा पाहुणचार करा. अनेकदा त्यांच्यावर समस्या येतात. अशा काही लोकांना खरेच काही असतात त्यांना शक्य ते सहाय्य करुन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करावा. आपल्या समाजातून व कुटूंबातून सहाय्य करण्यासाठी पुढे यावे. काही लोक हे आवश्यक ओझे टाळतात, परंतु कोणीतरी हे सोसले पाहिजे. काही लोक सामान्यपणे त्यांना पाहुणचार करायला आवडत नाही. त्यांना आदरतीथ्य करणे जमत नाही. ख्रिस्तीपणाचे कर्तव्य ते करीत नाहीत किंवा कोणाला सहाय्य करीत नाहीत, परंतु काही ख्रिस्ती असे आहेत की त्यांना गरजवंतांना मदत करणे आवडते. ते आनंदाने सहाय्य करण्यात पुढे सरसावतात. उदारहस्ते ते गरजवंतांना सहाय्य करतात. त्यांचे ओझे स्वत:वर घेतात आणि त्यांचे दुःख हलके करतात. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च २:६४५. ChSMar 224.3
“अतिथि प्रेमाचा विसर पडू देऊ नको कारण तेणे करुण कित्येकांनी देवदूतांचे नकळत अतिथ्य केले आहे.” काळ निघून गेला परंतु या वचनाची शक्ति व प्रेरणा कमी झाली नाही. आमचा स्वर्गीय पिता आपल्या लोकांच्या मार्गावर आजसुद्धा आशीर्वादमय संधी उपलब्ध करुन देतो आणि त्यांचा उपयोग जे करुन घेतात त्यांना अत्यानंद होतो. - प्रॉफेटस अँण्ड किंग्स १३२. ChSMar 224.4
देव कसोटी घेतो आणि सिध्द करतो की जीवनातील सामान्य घडून येणारी गोष्ट जी छोटी असते हृदयाचा एक अध्याय उघडून देते. याकडे थोडेसे सावधतेने लक्ष द्यावे लागते. छोट्या संख्येने असणाऱ्या चांगल्या गोष्टी त्या आपल्या जीवनामध्ये आपण करतो इतरांना दया दाखवितो. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये आनंद प्राप्त होतो. हा आपल्या जीवनाचा सारांश आहे. या दयाळूपणाकडे दुर्लक्ष करु नये. इतरांसाठीचे प्रेमळ शब्द विसरु नये. आपल्या जीवनामध्ये आनंद प्राप्त होतो. हा आपल्या जीवनाचा सारांश आहे. या दयाळूपणाकडे दुर्लक्ष करु नये. इतरांसाठीचे प्रेमळ शब्द विसरु नये. आपल्या जीवनामध्ये थोडी दया आणि धीराचे शब्द दुखीतांसाठी वापरावेत. त्यांच्या जीवनामध्ये धीराचे शब्द त्यांच्या कानावर गेल्यास आपणास सुद्धा धीर येतो आणि यामुळे जीवनामध्ये अतिशय आनंद प्राप्त होतो. आपल्या सभोवती असणाऱ्या दुःखीतांचे सहाय्य केल्यास स्वर्गामध्ये त्याची नोंद केली जाईल. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च २:१३३. ChSMar 225.1
मी पाहिले की विधवा, अनाथ, अंध, पांगळे आणि पीडीलेले व दुःखी लोकांना ईश्वरी सहाय्य प्राप्त होते ते अनेक मार्गांनी आणि अशाप्रकारचे दयेचे कार्य करणारे ख्रिस्ती लोक ख्रिस्ताच्या जवळ येतात व त्याच्या मंडळीशी त्याचा संबंध येतो. त्यामुळे मंडळी देवाचे कार्य करुन त्यांचे गुण त्याच्या सत्यामध्ये उतरतात. गरजवंतांशी आपण कसे वागतो हे देवदूत वरुन पाहात असतात. त्यांचे नि:स्वार्थीपणाचे सहाय्य व परोपकारक बुद्धीचे ते अवलोकन करीत असतात. आपल्या स्वभावाची परीक्षा देव अशाप्रकारे घेत असतो. जर आपल्यामध्ये बायबलचा खरा धर्म आहे, तर आपले प्रेम खोलवर दिसून येते. दयाळूपणा आणि ख्रिस्तामध्ये असणारे बंधुप्रेम त्याच्यावतीने त्यांच्यावरील प्रेम मुळीच कमी करु शकत नाही. ही बंधु प्रिती जशी आपणावर तशी त्यांच्यावर ही करु. कारण देवाने तेही आपल्यावर अमाप प्रीति केली आहे. आम्ही पापी असतांनाही तो आपल्यावर प्रीति करतो. त्याची दया आणि त्याची प्रीतिही आपल्या बांधवांवर नि:स्वार्थीपणे करतो. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ३:५११. ChSMar 225.2