ख्रिस्ती सेवा

142/256

मोफत वितरण करण्याची संधी

पवित्र देवाचे हे सत्य साहित्य रेल्वेमध्ये रस्त्यावर पेठांमध्ये जहाजावर व इतरत्र चातुर्याने वितरण होणे आवश्यक आहे. पोस्ट ऑफिसमधूनही याचे वितरण व्हावे. - गॉस्पल वर्कर्स ३५३. ChSMar 185.1

या दिवसामध्ये आपण प्रवास करीत असताना अनेक प्रकारचे स्त्री-पुरुष भेटतात. आपल्या संपर्कात येतात. ही संधी आपण सोडू नये. इस्त्राएलांच्या दिवसांमध्येही मुख्य रस्त्यांवर हजारोच्या हजारो लोकांचे जाणे येणे असते. देवाने सुंदर मार्ग निवडला आहे. छापखान्यांची संस्था यामध्ये अनेक सुविधा आहेत. आपल्या इच्छेवर चालतात यामध्ये सर्व पवित्र वचने, पत्रिका, पुस्तके, पुस्तिका व बायबल छापली जातात. तेही अनेक भाषांमध्ये. या काळातील सत्य वचने छापली जातात. ती आपल्या हातात सहज येतात व आपण त्यांचे सर्व जगामध्ये विरण करु शकतो. - गॉस्पल वर्कर्स ३५२. ChSMar 185.2

हस्तपत्रके, पत्रिका, पुस्तके व पुस्तिका सर्व दिशातून सर्वत्र पसरुन जाऊ देत. तुम्ही जेथे जाल तेथे हे सर्व साहित्य आपणाबरोबर घ्या. निवडक पत्रक तुमच्याबरोबर घ्या. जशी तुम्हाला संधी मिळेल तसे त्याप्रमाणे वितरण करा. शक्य असेल तर विक्री करा. उधार घ्या किंवा गरजेनुसार मोफत द्या. कारण त्यांचे योग्य परिणाम होतील.- द रीव्हिव्ह अॅण्ड हेरॉल्ड १० जून १८८०. ChSMar 185.3

मला दाखविण्यात आले की आम्ही आमचे कर्तव्य इमानीपणे करीत नाही. अगदी छोट्या पत्रिकांचे सुद्धा वाटप करीत नाहीत ही खेदाची गोष्ट आहे. परंतु अनेक आत्मे प्रामाणिक आहेत की जे सत्याचा स्वीकार आनंदाने करतील. जे चार, आठ किंवा सोळा पानाचे साहित्य वाचून सत्याचा स्वीकार करतील. हे साहित्य त्यांच्यासाठी परिणामकारक असतात आणि ज्यांच्या हृदयावर या साहित्याचे प्रभाव पडतात ते उदारहस्ते देणग्या देतात. तुम्ही जेव्हा मित्रांना लिहीता तेव्हा तुम्ही त्यांना पोस्टाच्या खर्चाने पाठवू शकता व ते तुम्हाला देणगी देऊ शकतात. तुम्हाला रस्त्यावर, कारमध्ये, रेल्वेमध्ये जे भेटतील त्यांना एकावयास कान आहेत. तुम्ही त्यांना स्वार्ता सांगून माहिती पुरुवू शकता. मग त्यांना तुम्ही सुवार्तेच्या पत्रिका देऊ शकता. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च १:५५१,५५२. ChSMar 186.1