कलीसिया के लिए परामर्श

84/318

गरजूंना कशी मदत करावी

जे गरजू आहेत त्यांना मदत करण्याच्या पद्धतीविषयी प्रार्थनापूर्वक व काळजीपूर्वक विचार करावा. आम्हांला शहाणपणा मिळावा म्हणून देवाजवळ मागणी करावी. कारण त्यालाच अदूरदृष्टीच्या मर्त्य मानवापेक्षा त्यानें उत्पन्न केलेल्या प्राण्यांची काळजी कशी घ्यावी हें माहीत आहे. जे त्यांच्या मदतीची याचना करतात त्याना भेदाभेद न करता देणारे काहीजण आहेत असें करण्याकडून तें चूक करतात जे गरजू आहेत त्यांना मदत करीत असतां योग्य प्रकारची मदत देण्याच्या बाबतींत काळजी घ्यावी. ज्यांना मदत करण्यांत येते तें स्वत:ला विशेष गरजेचा विषय बनवितील. ज्यावर अवलंबून राहायाचे अशी गोष्ट दिसण्यावर त्या गोष्टीवर अवलंबून राहातील. अशाकडे लक्ष दिल्यास व वेळ खर्च केल्यास आम्ही आळस, निराधारीपणा, अतिरेक व अमितपणा यांना उत्तेजन देतों. CChMara 128.2

आम्ही गरिबांना देतो तेव्हां आपण विचार करावा कीं, “मी उधळेपणाला उत्तेजन देतों काय? मी त्यांना मदत करीत आहे कीं, त्यांचे नुकसान करीत आहे?” जो मनुष्य आपला उदरनिर्वाह मिळवू शकतो त्यानें इतरांवर अवलंबून राहूं नये. CChMara 128.3

देवाच्या शहाण्या व दूरदर्शी अशी पुरुषांना व स्त्रियाना जे गरीब व गरजू आहेत त्यांच्या गरजा भागविण्यासाठी नेमावे त्यांनी अशांची मंडळीला माहिती द्यावी व त्याच्या बाबतीत सल्ला द्यावा. 8 CChMara 128.4

भावांनी प्रत्येक गरीब कुटुंबाची व सत्याचा स्वीकार करणार्‍य गरीब कुटुंबांची जबाबदारी घ्यावी असें देवाला वाटत नाही. जर त्यांनी तसे केले तर पाळकाना नवीन क्षेत्रात प्रवेश करणे बंद करावे लागेल. कारण फड सपन जाईल. पुष्कळजण काटकसर व उद्योगीपणा यांच्या अभावामुळे गरीब आहेत. आपला पैसा कसा वापरावा हें त्यांना समजत नाहीं. त्यांना मदत केल्याने त्यांना त्रास होणार आहे. काहीं नेहमीचे गरीब आहेत त्यांना उत्तम फळें पाहिजेत तर त्यांना चांगली मदत होणार नाहीं. अशाना चागले धोरण नसून अधिक किंवा कमी कांही मदत मिळेत ती सर्व तें खचून बसतील. CChMara 128.5

जेव्हां असें सत्याचा स्वीकार करतात तेंव्हा त्यांना वाटते कीं, आपल्या श्रीमंत भावाकडून आपल्याला मदत मिळालीच पाहिजे. त्यांच्या इच्छेप्रमाणे झाले नाही तर तें मंडळीविरुद्ध तक्रार करुन म्हणतात कीं, तें विश्वासाप्रमाणे वागत नाहीत. या बाबतीत कोणाला सोसावे लागेल? या गरीब अनेक कुटुंबांना मदत करण्यास वेगवेगळ्या ठिकाणचे खजिने रिकामे पडावे व देवाचे काम नाश पावावे काय ? नाहीं. आईबाप अधिक प्रमाणात शब्बाथाचा स्वीकार केला म्हणून गरज भासणार नाहीं. 9 CChMara 128.6

प्रत्येक मंडळीमध्ये गरीब मनुष्याला देव राहूं देतो तें सतत आम्हांमध्ये आहेत व मंडळीच्या प्रत्येक सभासदावर त्याची काळजी घेण्याची जबाबदारी देव सोंपवितों. आमची जबाबदारी आम्हांला इतरांवर ढकलायची नाहीं. जी सहानुभूति व प्रेम त्यानें दर्शविले असतें तेच प्रेम व सहानुभूति ख्रिस्त आमच्या ठिकाणी असतां आम्ही आमच्या संबंधात असलेल्यांना दर्शविली पाहिजे. याप्रकारे आम्ही स्वत:ला शिस्त लावून घेतों. यासाठी कीं आम्ही ख्रिस्ताच्या पद्धतीनुसार काम करण्यास तयार व्हावें. 10 CChMara 128.7