कलीसिया के लिए परामर्श

82/318

प्रकरण १६ वें - खिस्ती लोकांची गरज व त्रास याविषयींची वृत्ति

आज देव मनुष्याला एक प्रकारची संधि देतो. अशासाठीं कीं, तो आपल्या शेजार्‍यविषयीं प्रेम दर्शवितो कीं नाही हें पाहावें. जो कोणी खन्या रीतीने देवावर व मनुष्यावर प्रेम करतो तो जे पीडित आहेत, जखमी झालेले आहेत व निराश्रित होऊन जे मरत आहेत, अशांवर दया करतो. देव प्रत्येक मनुष्याला त्याचे नाकारलेले कार्य करण्यास, शोधण्यास व पुन: मानवामध्ये उत्पन्नकत्यांची प्रतिमा स्थापन करण्यास बोलावितो. 1 CChMara 126.1

इतरांसाठी करावयाच्या कार्यात खटपट, स्वनाकार व स्वार्पण याची गरज लागते. पण आम्ही जो थोडा स्वार्थत्याग करूं तो देवाच्या एकुलत्या एक पुत्राद्वारे त्यानें केलेल्या स्वार्थत्यागाच्या मानाने तुलनात्मकदृष्ट्या लहान ठरेल. 2 CChMara 126.2

आपल्या तारणार्‍यने अगदी साध्या रीतीने सार्वकालिक जीवन वतन करून घेण्याच्या अटी सांगितल्या आहेत. ज्या मनुष्याला जखमा झाल्या होत्या व ज्याला लुटिले होतें, (लूक १०:३०-३७) तो आमच्या दयेचा. सहानुभूतीचा व आवडीचा विषय आहे. जर आम्ही जे गरजू आहेत त्यांच्याविषयीं निष्काळजीपणा करूं व जे दुर्दैवी आहेत असें आपल्याला दिसलें असतां त्यांच्याकडे कानाडोळा करूं तर आम्ही कोणीही असू द्या आपल्याला सार्वकालिक जीवनाची खात्री नाहीं. कारण आपण मागण्या पुच्या करीत नाही. आम्ही मनुष्याशी कळकळीने व दयेने वागत नाहीं कारण तें आपले जवळचे नातलग नाहींत. जिच्यावर शेवटल्या सहा आज्ञा अवलंबून आहेत अशा दुसर्‍य मोठ्या आज्ञेचा भंग करणारे तुम्ही आहांत जो एका नियमाविषयीं चुकतो तो सर्वांविषयी दोषी ठरतो. जे कोणी मानवाच्या गरजा व दु:ख जाणत नाहींत तें देवाच्या दहा आज्ञेमध्ये दिलेल्या पहिल्या चार आज्ञांतील देवाची मागणी पुरी करण्यास आपलीं मनें वापरणार नाहींत. मूर्तिपूजा आमची आवड व मन यांची मागणी करते आणि त्याकडून देवाची मान होत नाहीं व तो सर्वांवर राज्य करीत नाही. 3 CChMara 126.3

ज्याप्रमाणें लोखंडी लेखणीने दगडावर लिहितात, त्याप्रमाणे आमच्या सद्सद्विवेकांवर असें लिहावें कीं, जो दयेचा अव्हेर करतो. प्रेम व धार्मिकता मानीत नाही, गरीबाकडे दुर्लक्ष करतो व दु:खी मानवाच्या गरजा विचारात घेत नाही, जो दयाळू व सभ्य नाहीं त्याला त्याच्या शीलसंवर्धनात परमेश्वर सहकार्य करीत नाही. जेव्हां आम्ही इतरांविषयी कोमल सहानुभूति दर्शवू व त्याद्वारे त्यांच्या गरजा भागण्यासाठी आशीर्वाद व संधि मिळवून देऊ तेव्हां आपली मने व अंत:करणे यांची सुधारणा सहज घडून येईल. स्वत:साठींच मिळविणे व राखून ठेवणे याकडून आत्म्याची गरिबी बळाविली जाते. जे कोणी देवाने नेमून दिलेले कार्य करतील व ख्रिस्ताच्या पद्धतीने काम करतील त्यांचा स्वीकार ख्रिस्त करील. 4 CChMara 126.4

तारणा दर्जा व जातीभेद, जगिक मानमरातब व धन हीं तुच्छ लेखितो. हेतूचा उद्देश व शील यांचीच त्याला मोठी किंमत वाटते. तो जगाच्या दृष्टीने बलवान् असलेल्यांची बाजू धरीत नाही. जीवंत देवाचा पुत्र ख्रिस्त हा पतितांना वर काढण्यासाठी खालीं आला. प्रतिज्ञा करून व आश्वासने देऊन जे हरवले आहेत व नाश पावत आहेत अशा आत्म्यांना जिकण्यास तो पाहातो. देवाचे दत काळजीपूर्वक पाहात आहेत कीं, त्याच्या अनुयायापैकी कोण सहानुभूति व दया दाखवल. देवाच्या लोकांपैकी कोण येशूची प्रीति दाखवितील हें तें पाहात आहेत. 5 CChMara 127.1

देव फक्त आपलें औदायच मागत नाहीं पण आनंदी चेहरा, आशादायी, शब्द व तुमच्या सढळ हाताची मागणी करतो. तुम्ही प्रभूचे पीडित असणार्‍यांना भेटत असतां त्यावेळी कांहीं निराश झालेले तुम्हांला दिसतील व त्यांना प्रकाशाची गरज असेल म्हणून त्यांना प्रकाशांत आणा. कांहींना जीवनी भाकर हवी आहे त्यांना देवाच्या वचनांतून वाचून दाखवा. दुसरे कांहीं आत्मे आजारी आहेत, त्यांच्यावर जगिक उपाय चालत नाहीं व डॉक्टरी उपाय होत नाहीं. अशाकरितां प्रार्थना करा व त्यांना यशुकडे आणा. 6 CChMara 127.2