कलीसिया के लिए परामर्श
भविष्यवाद्यांनी स्थापिलेल्या मंडळ्या
यरुशलेमांतील मंडळीची स्थापना इतर ठिकाणच्या मंडळ्याच्या स्थापनेसाठी एक नमुना अशी व्हावयाची होती अशासाठी कीं सत्याच्या सेवकांनी सुवार्तेकरिता आत्मे जिंकावे. ज्यांना मंडळीची सर्वसाधारण जबाबदारी दिलेली होती तें प्रभूच्या निवडलेल्यावर प्रभुत्व चालवीत नव्हते; “पण शहाण्या मेंढपाळाप्रमाणे मेंढरांना चारायचे होतें. त्यांना कित्ता पवित्र घालून द्यायचा होता” सेवकांनी चांगले नाव मिळविलेले, ज्ञान व आत्मा यांनी भरलेलें असावे. ह्या माणसांनी ऐक्याने खर्यची बाजू धरायची होती व धैर्याने व निश्चयाने चालूं ठेवावयाची होती. या प्रकारे त्यांचा छाप सर्व कळपावर बसणार होता. 4 CChMara 109.2
नवीन पालट झालेल्या व्यक्तीच्या आत्मिक वाढीच्या बाबतींत एक फार महत्त्वाची बाब म्हणून सुवार्तेच्या आज्ञेने तें वाढले जावेत म्हणून प्रेषित काळजी घेत. प्रत्येक मंडळींत कामदार नैमिले होतें. विश्वासणार्यांच्या आत्मिक बाबीविषयीं सुव्यवस्था व शिस्त स्थापन केली होती. सुवार्तेच्या योजनेप्रमाणे सर्व विश्वासणार्यांना ख्रिस्तांत एकत्र करण्याचे हें कार्य होतें. हीच योजना पौलाने आपल्या सेवेत अनुसरण्याची काळजी घेतली होती. त्याच्या कार्याद्वारे जे इतर ठिकाणी होतें त्यांना ख्रिस्ताचा स्वीकार करण्यासाठी मार्गदर्शन करण्यांत आलें व त्यांची योग्य वेळी मंडळी स्थापन करण्यांत आली. सभासद थोडे होतें तरी हें करण्यांत आलें. याप्रकारे ख्रिस्ती लोकांना एकमेकांस मदत करण्यास शिकविण्यात आलें व जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नामाने एकत्र जमले असतील तेथें मी आहे’ या वचनाची त्यांना सतत आठवण राहिली. 5 CChMara 109.3