कलीसिया के लिए परामर्श
देवाबरोबर सहकामकरी होण्याची संधी
आपल्या कार्याला मदत व्हावी म्हणून देव मनुष्यावर अवलंबून राहत नाहीं. तो आपला खजिना भरून जावा म्हणून स्वर्गातून थेट पैसे पाठवू शकला असतां. असें करणे मनुष्यासाठी चांगले आहे असें त्याला दिसलें असतें. तर त्यानें तसे केले असतें. मनुष्याच्या मदतीशिवाय दतांदारे जगाला सत्य गाजविता येईल अशी योजना त्यानें केली असती. त्यानें आपले सत्य आकाशात लिहिले असतें आणि त्याकडून त्याच्या जीवंत शीलातील त्याच्या मागण्या जगाला कळल्या असत्या देव कोणा मनुष्याच्या सोन्यारुप्यावर अवलंबून नाहीं. तो म्हणतो. “जगलातील प्रत्येक पशु माझा आहे व हजारों डोंगरावरील गुरे माझी आहेत” “मला भूक लागली तर म तुला सांगितलें नसते कारण सर्व जग माझे आहे व त्यातील सर्व कांही माझे आहे.” स्तोत्र ५०:१०, १२. देवाच्या कार्याच्या वाढीच्या बाबतींत जी कांही गरज असेल ती आमच्या बर्यकरिता आहे. त्यांच्याबरोबर सहकामकरी होण्याचा मान त्यानें आपल्याला दिला आहे. मनुष्याने सहवार्य करावे असें त्यांने योजिले आहे. अशासाठीं कीं, त्यांनी त्यांची परोपकारवृत्ती कृतीत आणावी. CChMara 75.2
नैतिक नियमशास्त्रात शब्बाथपालन येते. त्याचा भंग केल्यानंतरच तें ओझे झाले. मोडल्याद्वारे त्याच्या शिक्षेशी तें बांधले गेले. जे दशाशाच्या पद्धतीपासून दुरावलेले नव्हते त्यांना दशांश देणे ओझे नव्हते. जी योजना इस्राएलात सुरू केली गेली ती ज्याने सुरु केली त्याकडून बंद पडली नाहीं. आता ती अमलांत आणण्याचे बंद पडली नाहीं. आता ती अमलांत आणण्याचे बंद न करिता ती मोठ्या प्रमाणात पुढे नेली पाहिजे व तिची अधिक वाढ केली पाहिजे. कारण ख्रिस्ती युगात तारण ख्रिस्ताद्वारेच फक्त अधिक प्रमाणात प्रकाशात आणिलें आहे. CChMara 75.3
सुवार्ता प्रसार करण्यास व तिचा प्रसार होत असतां ख्रिस्ताच्या मरणानंतरचा लढा चालूं ठेवण्यास मोठी तरतूद पाहिजे होती आणि याकडून दान देणे ही फार गरजेची बाब इब्री राज्यांत होती त्यापेक्षा अधिक भासू लागली. आता देव कमी मागणी करीत नाहीं. पण जगाच्या कोणत्याही काळांत नव्हती इतक्या मोठ्या देणगीची मागणी करतो. ख्रिस्तानें जो नियम घालून दिला आहे तो असा कीं, जो प्रकाश व आशीर्वाद मिळाला आहे. त्याप्रमाणात आमच्या देणग्या व अर्पणे असावीत. तो म्हणाला. “ज्याला अधिक दिले आहे त्याच्याकडून अधिक घेतले जाईल.” लूक १२:४८. 11 CChMara 75.4
देवाच्या वचनापासून प्रकाश चोहोंकडे प्रकाशांत आहे, आणि ज्या संधीची हयगय झाली आहे त्याबाबतींत जागृति निर्माण झाली पाहिजे. जेव्हां सर्वजण देवाला त्याचे दशांश व अर्पणे परत देण्यांत विश्वासू राहतील, तेव्हां या काळासाठी जगाने संदेश ऐकावा म्हणून मार्ग मोकळा केला जाईल. जर देवाच्या लोकांची अंत:करणे ख़िस्तावरील प्रेमाने भरून जातील, जर मंडळीचा प्रत्येक सभासद स्वार्पणाच्या वृत्तीने भरून जाईल जर सर्वांनी पूर्ण उत्सुकता दाखविली, तर देशी व परदेशी मिशन कार्यासाठी फडाची तूट भासणार नाहीं. आमची मिळकत वाढेल. उपयुक्त अशी हजारों द्वारे उघडली जातील व आम्हांला त्यांतून जाण्यास आमंत्रण देण्यांत येईल. जर देवाच्या लोकांनी दयेचा संदेश जगाला देण्यांत देवाचा हेतु सिद्धीस नेला असतां तर खिस्त यापूर्वीच या जगांत आला असतां व संताना देवाच्या नगरांत स्वागताने स्वीकारले असतें. 12 CChMara 76.1