कलीसिया के लिए परामर्श
उशीर करण्यांत धोका
रात्रींच्या दृष्टांतात एक मनोवेधक देखावा मजपुढून गेला. मी एक भला मोठा अग्नीचा गोळा काहीं सुंदर इमारतींवर पडताना पाहिला व त्यांचा तत्क्षणी नाश झाला. कोणीतरी असें म्हणतांना मी ऐकलें, “देवाचा न्याय या पृथ्वीवर येत आहे असें आम्हांला ठाऊक होतें; पण इतक्या लवकर येईल हें आम्हांला ठाऊक नव्हते.’ दुसरे दुःखाने ओरडून म्हणाले, “तुम्हांला माहीत होतें मग तुम्ही आम्हांला का सांगितलें नाहीं? आम्हांला माहीत नव्हते” चोहोकडे असेच दोषात्मक शब्द ऐकू येत होतें. CChMara 64.4
मोठ्या मार्नासक दु:खातून मी जागी झाले मी पुन: झोपी जाऊ लागले. आणि मी जणु काय मोठ्या जमावात आहे असें वाटले. एक प्रमुख गृहस्थ एका मोठ्या जमावामध्ये भाषण करीत होता व त्यांच्यापुढे जगाचा एक नकाशा पसरला होता तो म्हणाला कीं नकाशा देवाचा द्राक्षमळा दर्शवितो व त्याची मशागत झाली पाहिजे. स्वर्गातून कोणावरही प्रकाश चमकला तर त्यानें तो इतरांना द्यावयाचा असतो. अनेक ठिकाणी प्रकाश द्यावयाचा आहे, आणि या एका प्रकाशापासून दुसरे प्रकाश निर्माण करायचे आहेत. CChMara 65.1
पुन: शब्द ऐकू आलें, ‘’तुम्ही पृथ्वीचे मीठ आहा; पण जर मीठाचा खारटपणा गेला तर त्याला खारटपणा कशाने येईल? तें बाहेर टाकले जाऊन माणसाच्या पायाखाली तुडविले जाईल. तुम्ही जगाचा प्रकाश आहा. डोंगरावर वसलेले नगर लपत नाही. दिवा लावून मापाखालीं ठेवित नाहीत तर दिवठणीवर ठेवतात, म्हणजे तो घरातील सर्वांवर उजेड पाडतो आणि तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव होतें.” मत्तय ५:१३-१६. CChMara 65.2
प्रत्येक दिवस निघून जात असतां आपण अंताजवळ येत आहोत. त्याप्रमाणे आपण देवाजवळही येत आहोत काय ? आम्ही प्रार्थना करण्यास जागृत राहातो काय ? रोज रोज ज्याच्याशी आमचा संबंध येतो त्यांना आमच्या मदतीची व मार्गदर्शनाची गरज आहे. तें अशा मन:स्थितींत असतील कीं, ज्याप्रमाणे खिळा अचूक ठिकाणी मारला जातो त्याप्रमाणे पवित्र आत्मा त्यांना संदेश देतो. उद्या कदाचित् हें आत्मे अशा ठिकाणी जातील कीं तेथें आपणांस त्यांना भेटता येणार नाही. या सोबतीच्या प्रवाशावर आपले कोणते वजन पडत आहे? खिस्ताकडे त्यांना जिंकून घेण्यास कोणती खटपट आपण करतो? 9 CChMara 65.3
दूत चारी दिशांचे वारे थोपवून धरीत असतां आम्हांला सर्वशक्ति वेंचून आपल्या शक्यतेप्रमाणे कार्य करायचे आहे. आपण आपला सदेश उशीर न करता द्यावयाचा आहे. पापांत पडलेल्या या काळांत आम्ही स्वर्गाला व मनुष्याला असा पुरावा दिला पाहिजे कीं, ख्रिस्त ज्याचा कर्ता आहे असा आमचा धर्म सामर्थ्याचा व विश्वासाचा आहे आणि त्याचे वचन दैवी आहे. मानवी आत्मे तराजूत तोलले जात आहेत तें एक तर देवाच्या राज्याची प्रजा बनतील किंवा सैतानाच्या जुलमाखाली गुलाम होतील. सुबातेंत दिलेली आशा बाळगण्याची सर्वांना संधि मिळाली पाहिजे, आणि तें सुवार्तिकाशिवाय कसें ऐकतील? मानवी कुटुंबाला नैतिक सुस्थितीची गरज आहे. शिवाय शीलाची तयारी करण्याचीहि आवश्यकता आहे. यासाठी कीं, त्यांना देवाच्या समक्षतेत उभे राहाता यावे. कांहीं आत्मे नाशाप्रत जाणार आहेत कारण सध्या चालूं असलेल्या तात्त्विक चुकांमुळे त्यांचा नाश होणार आहे व त्या चुकांमुळे सुवार्तेच्या संदेशाला अडथळा येतो. मग देवाबरोबर कार्यकर्ते होण्यासाठी स्वत:ला पूर्णपणे कोण वाहून घेईल? 10 CChMara 65.4
आमच्या मडळींतील लोक मोठ्या प्रमाणावर आज पापांत व अधर्मात मृत झाले आहेत. तें फिरत्या दरवाजाप्रमाणे येतात व जातात. कारण अनेक वर्षे त्यांनी स्वसंतोषाने अति गंभीर व आत्म्याला हालवून सोडणारे सत्य ऐकिलें आहे; पण तें आचरणात आणले नाही म्हणून त्यांना सत्याच्या बाबतींत कमी जाणीव आहे. इशारा व धमकावणी याविषयींच्या हालवून सोडणाच्या साक्षीकडून त्यांना पश्चाताप होत नाहीं. देवापासून जो गोड स्वर-विश्वासाने तारण व ख्रिस्ताची धार्मिकता, प्रीति व कृतज्ञता ही त्यांच्यापासून येत नाहीं. जरी स्वर्गीय व्यापारी प्रीति व कृतज्ञता ही त्यांच्यापासून आपली अंत:करणे लपवितात व त्याचा कोमटपणा घालवून प्रीति व आदेश घेण्यास चुकतात, धर्म स्वीकारताना तें धार्मिकतेचे सामर्थ्य झुगारून देतात. अशा स्थितीत तें राहिले तर देव त्यांचा नाकार करील त्याच्या कुटुंबाचे सभासद होण्यास तें स्वत:ला नालायक बनवितात. 11 CChMara 65.5
मंडळीच्या सभासदांनी हें लक्षात ठेवावें कीं, मंडळीच्या पुस्तकांत आपली नावें नोंदविली म्हणजे तारण होत नाही. तें देवाला लज्जाविरहित कामकरी असा देवाजवळ पटलेला कामकरी असें तें आहेत हें दाखवून दिले पाहिजे. ख्रिस्ताच्या शिकवणीप्रमाणें त्यांनी आपले शील दिवसेंदिवस बनविले पाहिजे. त्याजवर विश्वास ठेवून सतत त्याजमध्ये त्यांनी राहिले पाहिजे. याप्रकारे तें ख्रिस्तांत पूर्ण वाढलेले, सुंदर, आनंदी व कृतज्ञ ख्रिस्ती असें वाढून अधिक स्पष्ट अशा प्रकाशांत देव त्यांना नेईल. हा जर त्यांचा अनुभव नाहीं. तर एके दिवशीं जे मोठ्यानें शोक करणार आहेत त्यामध्ये त्याची गणना होईल; सुगी संपली, उन्हाळा गेला आणि आमचे तारण झाले नाहीं. मी आश्रयाच्या स्थानाकडे कां पळून गेलों नाहीं? मी माझ्या आत्म्याचा खेळ का केला व कृपच्या आत्म्याचा नाकार का केला? 12 CChMara 66.1
ज्यांनी सत्यावर फार दिवसांपासून विश्वास ठेवला आहे अशा बंधुभगिनीनो, मी तुम्हांला वैयक्तिकरित्या विचारतो कीं, तुमची वागणूक प्रकाशाप्रमाणे व जी संधि देवाकडून तुम्हांला मिळाली आहे त्याप्रमाणे आहे का? हा गंभीर प्रश्न आहे. धार्मिकतेचा सूर्य मंडळीवर उगवला आहे व प्रकाश देण्याचे कर्तव्य मंडळीचे आहे. प्रत्येक आत्म्याने वाढ करून घेण्याची संधी आहे. ज्यांचा ख्रिस्ताशी संबंध आहे तें देवाच्या पुत्राच्या कृपेत व ज्ञानांत वाढून पूर्ण पुरुष व स्त्रिया होतील. सत्यावर विश्वास ठेवणाच्या सर्वांनी आपली सर्वशक्ति खचून शिकण्याची व कार्य करण्याची सध साधली असती, तर ख्रिस्तांत बळकट झाले असतें. त्यांचा कोणाताही धदा असो, म्हणजे तें शेतकरी, तज्ञ, शिक्षक किंवा पाळक यांनी स्वत: देवाला पूर्णपणे वाहन दिले असतें तर तें स्वर्गीय धन्यासाठी कर्तबगार कामगार बनले असतें. 13 CChMara 66.2