कलीसिया के लिए परामर्श

27/318

नवीन वसाहतीत जाऊन साक्ष देणे

देवाच्या लोकांनी मोठ्या समाजात वस्ती करून राहावे किंवा वसाहत करावी अशी देवाची इच्छा नाहीं. या पृथ्वीवर येशूचे अनुयायी त्याचे प्रतिनिधि आहेत आणि देवाची योजना आहे कीं, त्याच्या लोकांनी देशभर पागून जावे एवढेच केवळ नव्हें पण शहरात गावात, खेड्यांत व जगांतील अंधारामध्ये प्रकाशाप्रमाणे पसरून जावे त्यांनी देवाकरिता मिशनरी असावे. त्याच्या विश्वासाने व कार्याने येणार्‍य तारणार्‍यची साक्ष द्यावी. CChMara 58.3

आमच्या मंडळीचे स्वतंत्र सभासद क्वचितच सुरु केलेल्या कार्याची पूर्तता करुं शकतात. कोणीही जगिक सुखसोयीसाठींचे फक्त नवीन ठिकाणी जाऊ नये. पण जेथे चरितार्थ चालविण्याची संधि आहे तेथें सत्यांत मुरलेल्या एक ना दोन कुटुंबांनी एके ठिकाणी जावे व मिशनरी कार्य करावे, त्यांनी आत्म्यासाठी प्रीति दर्शवावी व त्यांच्यासाठी कार्याचे ओझे घ्यावे आणि त्यांना सत्यांत कसे आणावे हा त्यांचा अभ्यास असावा. तें आपले वाङमय वाटू शकतात, त्यांच्या घरात सभा भरवू शकतात, आपल्या शेजार्‍यांच्या ओळखी करूं शकतात व त्यांना या सभेला आमंत्रण देऊ शकतात. याप्रकारे तें चांगल्या कार्याद्वारे त्याचा प्रकाश देऊ शकतील. CChMara 58.4

कामगारांनी देवामध्ये एकटे उभे राहून आपल्या सोबत्याच्या तारणासाठीं रडावे, प्रार्थना करावी व कार्य करावे. तुम्ही शर्यतीत धावत आहा हें लक्षात ठेवा व सार्वकालिक जीवनाचा मुकुट मिळविण्याची खटपट करीत आहांत. पुष्कळजण देवाची मर्जी संपादन करण्याऐवजी मनुष्याच्या स्तुतीला भाळतात. तुम्ही नम्रपणे कार्य करा. कृपेच्या सिंहासनापुढे तुमच्या शेजार्‍यला नेण्यासाठी विश्वासाने प्रार्थना-करा व त्याच्या अंत:करणाला स्पर्श होण्यासाठी देवाजवळ विनंति करा. त्याप्रकारे प्रभावी मिशनरी काम होईल. पाळक व काल्पोर्टर धार्मिक साहित्यविक्रेते भेटू शकणार नाहींत अशास काहीजण भेटू शकतील. याप्रकारे नवीन ठिकाणी जे कार्य करतील त्याना लोकांना भेटण्याची पद्धत कळेल व दुसर्‍य कामगाराकरिता मार्गदर्शक होतील. 16 CChMara 59.1

तुमच्या शेजार्‍यांना भेटी द्या व त्यांच्या आत्म्याच्या तारणाबद्दल तुम्हांला गोडी आहे असें दाखवा. प्रत्येक आत्मिक शक्ति कार्य करण्यासाठी जागीं करा. जे तुम्हांला भेटतील त्या प्रत्येकाला जगाचा शेवट जवळ आला आहे असें सांगा. प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या अंत:करणाची द्वारे उघडील व त्यांच्या मनावर कायम टिकणारे परिणाम करील. CChMara 59.2

जरी तें आपल्या रोजच्या कार्यात गुंतलेले असणार तरी देवाचे लोक इतरांना ख़िस्ताकडे नेणार हें करीत असतां. त्यांना मौल्यवान आश्वासन आहे कीं तारणारा त्यांच्याजवळ आहे तें स्वत:च्या दुर्बळ प्रयत्नावर अवलंबून आहेत असें त्यांना वाटू नये. ख्रिस्त त्यांना बोलण्यासाठी शब्द देईल त्याद्वारे जे गरीब आहेत व अंधारात आहेत त्यांना धैर्य, शक्ति व उत्साह प्राप्त होईल. तारुणान्यांचे वचन पूर्ण झाल्याचे समजल्यावर त्यांचा स्वत:चा विश्वास बळकट होईल तें इतरांना आशीर्वाद हातील एवढेच नव्हें पण ख़िस्ताकरितां तें जे कार्य करतात त्याद्वारे त्यांना स्वत:ला आशीर्वाद प्राप्त होईल. 17 CChMara 59.3

पवित्रशास्त्र जसे आहे तसेच लोकांना सांगण्याकडून मोठे कार्य होईल. प्रत्येक मनुष्याच्या घरीं देवाचे वचन न्या. प्रत्येक मनुष्याचा सद्सद्विवेक जागृत करण्यास त्यातील स्पष्ट विधानें। सागा. प्रभूच्या आज्ञा सर्वांना सागा. “शास्त्रलेख शोधून पाहा’ योहान ५:३९. बायबल जसे आहे तसेच स्वीकारण्यास त्यांना शिकवी. त्याकडून दैवी प्रेरणेची याचना करण्यास मदत होईल व जेव्हां प्रकाश प्रकाशेल तेव्हां प्रत्येक मौल्यवान् किरण स्वीकारण्यास व निर्भयतेने परिणाम भोगण्यास मदत होईल. 18 CChMara 59.4

आमच्या मंडळीच्या सभासदांपैकी घरोघर शास्त्राभ्यास देणारे व वाङमय वाटणारे असावेत. देवाच्या कार्याला पैशाद्वारे मदत करून सत्याची वार्ता आनंदाने गाजवणे ही एक मानवाला संधि आहे असें मानण्याकडून ख्रिस्ती शील पूर्ण व प्रमाणबद्ध बनू शकेल. आम्ही सर्व जलाशयाजवळ पेरणी केली पाहिजे व आपला आत्मा देवाच्या प्रीतींत राखला पाहिजे. दिवस आहे तोंवर कार्य करीत व प्रभूने दिलेला पैसा नंतर येणाच्या कर्तव्यासाठी खर्च केला पाहिजे. जे कांही आपल्या हातीं पडेल तें विश्वासाने केले पाहिजे. जो यज्ञ करण्यासाठी आपल्याला पाचारण झाले आहे तो आनंदाने केला पाहिजे. आम्ही जलाशयाच्या कडेला पेरणी करीत असतां आम्हांला कळेल कीं, “जो सढळ हातानें पेरितो तो त्याच हातानें कापणी करील.” २ करिंथ. ९:६. 19. CChMara 59.5