कलीसिया के लिए परामर्श
शब्बाथ दिवशी शाळेला जाणें
जो कोणी चौथी आज्ञा पाळतो त्याला आढळून येईल कीं, जग व तो यामध्ये फरक आहे, शब्बाथ ही मनुष्याची नव्हें पण देवाची कसोटी आहे. जे देवाची सेवा करतात व सेवा करीत नाहींत यांच्यातील फरक याकडून कळून येईल. सत्य व असत्य यांत या मुद्यावरून शेवटचा महान् लढा होईल. CChMara 51.4
आमच्यापैकी कांही लोकांनी आपली मुलें शब्बाथ दिवशीं शाळेला पाठविली आहेत. असें करण्यास त्यांना सक्ति करण्यांत आली नव्हती; पण मुलांनी सहा दिवस शाळेला हजर राहावे अशी शाळा अधिकार्यांची मागणी होती. अशा कांही शाळांत विद्यार्थांना रोजचा अभ्यास करण्यास सांगण्यांत येते व त्यांना वेगवेगळी कामे करावी लागतात. नामधारी शब्बाथ पालन करणारे लोक आपल्या लेकरांना अशा शाळांना पाठवितात. कांही आईबाप येशूचे शब्द बोलून दाखवून स्वत: सबब सांगतात कीं, शब्बाथ दिवशीं सत्कर्म करणे योग्य आहे; पण त्यांचा तो विचार जे म्हणतात कीं, आपल्या मुलांना जेवण मिळावे म्हणून शब्बाथ दिवशी काम केले पाहिजे याच्यासारखा आहे, आम्ही काय करावे व काय करूं नये यांतील फरक दाखविला जात नाहीं. CChMara 51.5
जेथें चौथी आज्ञा पाळणे शक्य नाही अशा शाळेत आपली मुलें घालून आपले भाऊ देवाची पसंती मिळवू शकत नाहींत त्यांनी शब्बाथ दिवशी आपली मुलें शाळेला जाण्यापासून सुटी मिळेल अशी शाळाधिकाच्यापासून व्यवस्था करून घ्यावी. जर तसे होत नाही तर त्यांचे कर्तव्य काहीही असो, देवाची मागणी पुरी करून त्याच्या आज्ञा पाळणे बरे आहे. CChMara 52.1
कांहीं जण म्हणतील कीं, प्रभू आपल्या मागणीच्या बाबतींत इतका काटेकोर नाही; नुकसान करून शब्बाथ दिवस पाळणे किंवा देशाचा कायदा जेथे आड येतो तेथेहि शब्बाथ पाळणे आपले कर्तव्य नाहीं. पण येथेच आपली कसोटी आहे. ती म्हणजे मनुष्यापेक्षा देवाला आपण मानतो किंवा नाहीं. याच गोष्टीनें जे देवाचा सन्मान करतात व करीत नाहींत यांतील फरक कळन येतो. येथेच आम्ही आपला एकनिष्ठपणा सिद्ध केला पाहिजे. सर्व काळांत आपल्या लोकाशी देवाची जी वागणूक होती तिच्या इतिहासावरून दिसून येते कीं, देवाला तंतोतंत आज्ञापालन पाहिजे. CChMara 52.2
जर आईबापांनी आपल्या मुलास जगिक शिक्षण घेण्यास संधि दिली व शब्बाथ मोडं दिला, तर देवाचा शिक्का त्याच्यावर मारला जाणार नाही. जगाबरोबर त्यांचाहि नाश होईल. त्यांच्या रक्ताचा दोष त्याच्या आईबापावर येणार नाहीं का? पण जर आपण विश्वासूपणे देवाच्या आज्ञा पाळल्या, लेकरांना शिकविल्या व आपल्या ताब्यात त्यांना ठेविले व प्रार्थनेने, विश्वासाने त्यांना देवाच्या स्वाधीन करूं तर देव आमच्या प्रयत्नाला यश देईल. कारण त्यानें तसे वचन दिले आहे. जेव्हां देशातून शिक्षा सुनावली जाईल तेव्हां प्रभूच्या घरातील गुप्त स्थळ आम्हाबरोबर त्यांना लपविले जाईल. 14 CChMara 52.3