कलीसिया के लिए परामर्श

18/318

कुटुंबातील अति पवित्र वेळ

शब्बाथ शाळा व उपासना या गोष्टींनी शब्बाथ दिवसाचा कांही भाग व्यापला जातो. राहिलेला वेळ कुटुंबानी पवित्र मानला पाहिजे व शब्बाथाची सर्व वेळ मौल्यवान् समजली पाहिजे. हा राहिलेला वेळ आईबापांनी आपल्या लेकराबरोबर घालवावा. पुष्कळ कुटुंबांत लहान लेकरांना मोकाटपणे त्यांना आवडेल तें खेळण्यासाठी सोडण्यात येते. मोकळी सोडलेली लेंकरें लवकरच अस्थिर बनतात व काहीं खोड्या करण्यास सुरवात करतात. याप्रकारे शब्बाथाविषयो त्यांच्या मनात पवित्र भावना राहात नाही. CChMara 47.5

चागल्या हवामानाच्या दिवशी आईबापांनी आपल्या लेकरासह शेतातून व अबराईतून फिरायला जावें, सुष्टीच्या सुंदर वस्तुगणात शाब्बाथाच्या संस्थापनेची कारणें सांगा, देवाच्या महान उत्पत्ति कार्याचे वर्णन करा, त्यांना सांगा कीं, देवाच्या हातानें ही पृथ्वी निर्माण झाली, त्यावेळी ती पवित्र व सुंदर होती. प्रत्येक फूल, प्रत्येक झुडूप, प्रत्येक वृक्ष याकडे पाहून उत्पन्नकर्त्यांचा हेतु स्पष्ट होतो. डोळ्यांनी दिसणाच्या सर्व वस्तु सुंदर व देवाच्या प्रीतीविषयी त्याकडून आपलीं मने भरून जात होती. देवाच्या वाणीला जुळेल असा प्रत्येक आवाज संगीतरुपी होता. पापामुळे देवाचे पूर्ण काम नासून गेले व आज्ञाभंगामुळे आज जगांत दु:ख, मरण, त्रास, काटेकुसळे आली आहेत हें त्यांना दाखवा. जरी पृथ्वी पापामुळे नासून गेली आहे तरी ती देवाचा चांगुलपणा दर्शविते हें त्यांना पाहाण्यास सांगा, हिरवीगार शेतें, उंच झाडे, आनंददायी सूर्यप्रकाश, ढग, दहिंवर, रात्रींची गंभीर वेळ, आकाशातील तार्‍यचे वैभव व सुंदर असा चद्र हीं सर्व उत्पन्नकर्त्याची साक्ष देतात, आपल्या कृतघ्न पृथ्वीवर पडणारा पावसाचा थेंब व प्रकाशाचे किरण, हीं देवाच्या प्रीतीची व सहनशीलतेची साक्ष देतात. CChMara 48.1

तारणाचा मार्ग त्यांना सांगा. “देवाने जगावर एवढी प्रीति केली कीं, त्यानें आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठी कीं जो कोणी त्याजवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. योहान ३:१६. बेथलहेमाची सुंदर गोष्ट पुनः पुनः सागा. येशू हा आईबापांचा आज्ञाधारक मुलगा होता हें त्यांना सांगा. एवढेच केवळ नव्हें; पण विश्वासु, उद्योगी कुटुंबाला मदत करणारा तरुण होता हेहि सांगा. याप्रकारे तुम्ही त्यांना शिकवा कीं, तरुणांना वाटणारा हर्ष व आशा, मोह, सकटे व पेंच तारणाच्याला माहीत होतें व तो त्यांना सहानुभूति व मदत देऊ शकतो. पवित्रशास्त्रांतील गोष्टी त्यांना सांगा. शब्बाथ शाळेत तें काय शिकलें याविषयी प्रश्न विचारा व पुढच्या शब्बाथाच्या धड्याचा अभ्यास त्यांच्याबरोबर करा. 5 CChMara 48.2

शब्बाथ दिवशी कुटुंबानें गभीर स्वार्पण करावे, आज्ञेत म्हटल्याप्रमाणे वेशीच्या आत असलेले सर्व व घरातील सर्व यांचा समावेश होतो व या सर्वांनी जगिक कामधंदा बाजूला ठेवून भक्तीमध्ये हा पवित्र वेळ घालवावा. त्याच्या पवित्र दिनीं आनंदानें सेवा करून देवाला मान देण्यास सर्वांनी एकत्र व्हावें. 6 CChMara 48.3