कलीसिया के लिए परामर्श

16/318

शब्बाथ दिवसाची आठवण ठेवा

चौथ्या आज्ञेच्या अगदी आरंभी प्रभु म्हणतो, “आठवण ठेवा” देवाला माहीत होतें कीं, चिंता व काळजी यामध्ये मनुष्याला नियमाचे पूर्ण पालन करण्याच्या बाबतीत सबब सांगण्याचा मोह होईल किंवा त्याच्या पवित्र महत्त्वाविषयीं विसर पडेल. म्हणून त्यानें म्हटले, “शब्बाथ दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ.” निर्गम २०:८. CChMara 45.2

सर्व आठवडाभर आम्ही शब्बाथाची आठवण ठेवावी व आज्ञेप्रमाणे पाळण्यासाठी तयारी करीत असावे. आम्ही केवळ रीत म्हणून शब्बाथ पाळू नये. जीवितांतील सर्व बाबींत त्याचा आत्मिकपणा आम्हांला समजावा. जे कोणी शब्बाथ हा देव व मानव यांतील खूण आहे असें समजतात व पवित्र रीतीने प्रतिनिधित्व करतील. त्याच्या राज्याचे कायदे राज अमलांत आणतील. शब्बाथापासून मिळणाच्या पवित्रीकरणासाठी तें रोज प्रार्थना करतील. रोज ख्रिस्ताचा सहवास त्यांना घडेल व त्याच्या शीलाचें पूर्णत्व आपल्या आचरणांत दाखवितील. त्यांच्या सत्कृत्यांद्वारे प्रत्येक दिवशी त्यांचा प्रकाश इतरांना प्राप्त होईल, CChMara 45.3

देवाच्या कार्याच्या विजयाबाबतींत पहिल्यानें आपल्या कौटुंबिक जीवनांत विजय मिळविला पाहिजे. येथे शब्बाथाची तयारी झाली पाहिजे. आठवडाभर आईबापांनी लक्षात ठेवावे कीं, आपले घर ही एक शाळा असून तिच्यात त्यांच्या लेकरांना स्वर्गासाठी शिक्षण मिळाले पाहिजे. त्यांचे शब्द योग्य प्रकारचे असावेत. त्यांच्या लेकरांनी ऐकू नये असले शब्द त्यांनी उच्चारू नयेत. रागापासून त्यांनी शांत असावे. आईबापांनो, तुम्ही आठवडाभर पवित्र देवाच्या समक्षतेत राहा कारण त्याच देवाने तुम्हांला त्याच्याकरिता शिक्षण देण्यासाठी लेंकरें दिली आहेत. तुमच्या घरांतही लहान मंडळी त्याच्याकरता शिकवून तयार करा. अशासाठीं कीं, शब्बाथ दिवशी सर्वांनीं भक्तीसाठी मंदिरात जाण्याची तयारी करावी. त्यानें रक्तानें विकत घेतलेले वतन या नात्यानें रोज सकाळी व संध्याकाळी तुमची लेकरे देवाला अर्पण करा. देवावर प्रीति करणे व त्याची सेवा करणे हें त्यांचे उच्च कर्तव्य आहे असें त्यांना शिकवा. CChMara 45.4

या प्रकारे शब्बाथाची आठवण ठेवल्यावर जगिक गोष्टींचा आत्मिक बाबींवर पगडा बसणार नाहीं. सहा दिवसांतील कोणतेहि काम शब्बाथासाठी राखून ठेविले जाऊ नये. आठवडाभर जगिक व्यवसायांत आम्ही इतके गुंतून जाऊ नये कीं त्याकडून प्रभूनें ज्या दिवशी विसावा घेतला त्या दिवशी त्याच्या सेवेत भाग घेण्यास दमून गेलेले आढळू नये. CChMara 46.1

ज्याअर्थी आठवडाभर शब्बाथाची तयारी करायची आहे. त्याअर्थी शुक्रवार हा विशेष तयारीचा दिवस असावा. मोशाद्वारे प्रभूनें इस्राएल लोकांना सांगितलें आहे कीं, “उद्यां पवित्र शब्बाथाचा विसावा आहे. तुम्हांला भाजायचे तें भाजा, शिजवायचे तें शिजवा आणि जे शिल्लक उरेल तें उद्या सकाळसाठी राखून ठेवा.” “लोकांनी बाहेर जाऊन मान्ना गोळा केला. जात्यात दळला व मुसळाने कुटला व तव्यावर भाजून त्याच्या भाकरी केल्या.” निर्गम १६:२३, गणना ११:८. इस्राएल लोकांकरितां ही स्वर्गीय भाकर तयार करतांना आणखी कांही तरी करायचे होतें. प्रभूनें त्यांना सागितलें कीं हें काम शुक्रवारी तयारीच्या दिवशी करावे. CChMara 46.2

शुक्रवारी शब्बाथाची पूर्ण तयारी होऊ द्या. सर्व कपडे तयार आहेत कीं नाही व सर्व स्वयंपाक तयार आहे किंवा नाहीं तें पहा. बुटाला पॉलिश करणे व आंघोळ करणे झाले पाहिजे. हें करणे शक्य आहे. जर तुम्ही असा नियम केला तर शक्य आहे. शब्बाथ दिवश कपडे शिवणे, जेवण तयार करणे, मजेसाठी किंवा कोणत्याही जगिक कार्यात गुंतू नये. सूर्य मावळण्याअगोदर रोजचे सर्व काम बाजूला ठेवावे व सर्व जगिक वर्तमानपत्रें व पुस्तकें बाजूला ठेवावीत. आईबापानो, तुमच्या कामाचा हेतु तुमच्या लेकरांना समजावून सांगा व आज्ञेप्रमाणे शब्बाथ पाळण्याच्या बाबर्तीत तयारी करण्यास त्यांनाही भाग घेऊ द्या. CChMara 46.3

आम्ही इर्षेने शब्बाथाचा आरंभ व शेवट पाळावा. शब्बाथाचा प्रत्येक क्षण देवाला वाहिलेला व पवित्र आहे हें लक्षात ठेवा. जेव्हां जेव्हां शक्य आहे तेव्हां तेव्हां मालकांनी कामदारांना शुक्रवारी दुपारपासून तो शब्बाथाच्या सुरवातीपर्यंतचा वेळ द्यावा. तयारीसाठी त्यांना वेळ द्या म्हणजे शांत मनाने प्रभूच्या दिवसाचा तें आदर करतील. अशा करण्याकडून तुम्ही व्यवहारिक दृष्ट्या आशीर्वादित व्हाल. CChMara 46.4

तयारीच्या दिवशी दुसरे एक काम आहे कीं त्याकडे लक्ष पुरविले पाहिजे. या दिवशी भावाभावामधील, कुटुंबांतील किंवा मंडळींतील गैरसमज दूर केले पाहिजेत. सर्व प्रकारचा कटूपणा, राग, मत्सर हीं आत्म्यांतून घालवून दिली पाहिजेत. नम्रभावानें, एकमेकांचे अपराध एकमेकांजवळ कबूल करा. एकमेकांसाठी प्रार्थना करा. अशासार्टी कीं त्यांनी निरोगी व्हावें.” याकोब ५:१६. 2 CChMara 46.5

देवाच्या दृष्टीनें जे शब्बाथ दिवशीं करुं नये व बोलू नये तें करून व बोलून शब्बाथाची पायमल्ली करुं नये. फक्त शारीरिक कार्यापासूनच शबाथ दिवशीं अलिप्त राहिले पाहिजे असें नाहीं, पण आपले मनहि पवित्र गोष्टीवर विचार करीत राहिले पाहिजे. चौथी आज्ञा जगिक गोष्टींविषयी चर्चा करण्याने किंवा घाणेरड्या व वाईट संभाषणाद्वारे मोडली जाते. मनांत येतील असल्या कोणत्याही गोष्टींविषयी किंवा सर्व गोष्टिविषयी बोलणे म्हणजे स्वत:चे शब्द बोलणे होय. योग्य गोष्टीपासून दुरावणे म्हणजे आपल्यावर नाश ओढवून घेणें होय. 3 CChMara 46.6