कलीसिया के लिए परामर्श

308/318

वैयक्तिक ईश्वरनिष्ठेचे महत्व

एकांतांतील प्रार्थना व शास्त्रवचन याची एखाद्या दिवशी निष्काळजी केली कीं दुसर्‍य दिवशी सद्सद्विवेकाची तक्रार सारून त्या गोष्टी वगळल्या जातात निष्काळजीपणाचा हा एक दाणी अंतर्यामाच्या भूमीवर पेरला कीं चुकवाचुकवीची भली मोठी मालीका बनली जाते. उलटपक्षी प्रकाशाचा प्रत्येक किरण हुदयी बाळगला कीं प्रकाशाचा मोठा हंगाम पदरांत पडतो. एका मोहाचा एकदा प्रतिकार केला कीं दसच्या वेळी प्रतिकाराची शक्ति अधिक भरभक्कम होऊन जाते. स्वार्थावर मिळविलेल्या प्रत्येक विजयामुळे थोर व उदार यशप्राप्तीचा मार्ग सरळ होऊन जातो. प्रत्येक विजय हा सार्वकालिक जीवनासाठी पेरलेला बींच असतों. CChMara 374.3

सत्य अंत:करणाने देवाकडे येणारा प्रत्येक सत्पुरूष जो विश्वासाने आपल्या मागण्या मागतो त्याला त्याच्या प्रार्थनांची उत्तरे मिळतील. तुमच्या प्रार्थनांना जर तुमच्या मागण्याप्रमाणे ताबडतोब उत्तरे मिळाली नाहीत तर तुमच्या विश्वासाने देवाची अभिवचने सोडून देऊ नयेत. देवावरच्या निष्ठेविषयी साशक होऊ नका. “मागा म्हणजे तुम्हांस मिळेल.” योहान १६:२४. ह्या त्याच्या निश्चित वचनावर विसंबून रहा. CChMara 374.4

देव इतका चतुर आहे व तो इतका चांगला आहे कीं जे त्याचे संतगण न्यायमार्गाने चालतात, त्यांच्याविषयी तो चूक करणार नाही किंवा कोणतीही गोष्ट त्यांना द्यावयाची नाकारणार नाही. मानवप्राणी चुकणारा आहे व जरी प्रामाणिक अंत:करणाने त्यानें आपल्या विनंत्या केलेल्या असल्या तरी आपल्यासाठी कोणकोणत्या गोष्टी हितकर आहेत अगर कोणत्या गोष्टीनें देवाचे गौरव होईल अशा गोष्टी तो नेहमीच मागत नसतो. अशी गोष्ट असल्यामुळे आमचा सूज्ञ व चांगला पिता विनंत्या ऐकून घेतो व कधीं कधीं ताबडतोब उत्तर देतो. परंतु ज्या गोष्टी आमच्या हिताच्या व त्याच्या गौरवार्थ आहेत अशाच तो आम्हांस देतो. देव आम्हांला आशीर्वाद देतो. जर आम्ही त्याच्या हेतूकडे पाहिलें तर आम्हांला असें दिसून येईल कीं, आम्हांसाठी उत्तम काय आहे हें तो जाणतो व आमच्या प्रार्थनांना उत्तर देतो. अपायकारक असें काहीच देण्यांत येत नाही. परंतु आम्ही मागतो तें आम्हासाठी हितकर नसेल उलट अपायकारक असेल तर त्याऐवजी तो आम्हांला अवश्य असें अशीर्वादच देतो. CChMara 374.5

मी असें पाहीले आहे कीं जरी आम्हांला आमच्या प्रार्थनांची उत्तरे ताबडतोब मिळालेली नसतात तरी आम्ही आमचा दृढतर विश्वास सोडू नये अविश्वासला थारा देऊ नये कारण तसे झाले तर आपण देवापासून दुरावले जाऊ आमचा विश्वास ढीला पडला कीं त्याजपासून आम्हांला कांही एक मिळणार नाही. देवावरची आमची निष्ठा भरभक्कम असावी, जेव्हां आम्ही अत्यंत गरजेत येऊ तेव्हां पर्जन्याप्रमाणे त्याच्या आशीर्वादाचा वर्षाव आम्हांवर होईल. CChMara 375.1