कलीसिया के लिए परामर्श
प्रकरण ६१ वें - येणारी आणीबाणीची वेळ
देवाच्या नियमशास्त्राची जितकी अधिक उपेक्षा दिसून येते तितका अधिक स्पष्ट फरक तें पाळणाच्यामध्ये व जगामध्ये दिसून येतो. देवाच्या निर्बधाविषयीची आवड एका पक्षात वाढत राहते व दुसर्यांत तत्संबधीचा तिरस्कार वाढत जातो. CChMara 361.1
आणीबाणीचा प्रसंग झपाट्यानें येत आहे. अनुमानविषयक फुगलेल्या आकड्यांवरून परमेश्वराच्या भेटीचा काळ अगदी समीप आलेला दिसतो. शासन करावयास नाखूष, तरी तें तो करणारच व तेही त्वरीत गतीने करील. CChMara 361.2
परमेश्वराच्या सूडाचा दिवस आम्हांवर येऊन ठेपला आहे. देशामध्ये घडून येत असलेल्या तिरस्काणीय गोष्टींबद्दल जे कण्हत व रडत आहेत अशाच्याच कपाळांवर ईश्वराचा शिक्का राहील. जे जगाशी सहानुभूती राहून खातपीत व चैन करीत आहेत तें अन्यायी लोकासह खात्रीने नाश पावतील. “परमेश्वराचे नेत्र धार्मिकांवर असतात, व त्याचे कान त्याच्या विनंतीकडे असतात, तरी वाईट करणार्यांवर परमेश्वराची नजर आहे.” १ पेत्र ३:१२. CChMara 361.3
आम्हांवर जिवंत परमेश्वराचा शिक्का राहील किंवा नाशक शस्त्रांनी आमचा नाश केला जाईल हें आमच्या स्वत:च्या वर्तमानक्रमाावरून निश्चित होईल. परमेश्वराच्या कोपाचा थोडासा अश पृथ्वीला देण्यांतही आलेला आहे, परंतु त्याच्या निर्भेळ कोपाच्या अखेरच्या सात पीडा जेव्हां आम्हांवर येऊन गुजरतील तेव्हां पश्चातापासाठी आणि आश्रयासाठी वेळ मिळणार नाही. पापाचे कलंक घुऊन टाकण्यासाठी प्रायश्चित्ताच्या रक्तचा थेंबही तेव्हां मिळणार नाही. CChMara 361.4
शब्बाथ पालनाची ज्याची वहिवाट आहे तें सर्वच शिक्कामोर्तब होतील असें नाही. दुसर्यांना सत्याचे शिक्षण देणार्यपैकीसुद्धा पुष्कळांच्या कपाळी देवाचा शिक्का बसेलच असेही नाही. सत्याचा प्रकाश त्यांना लाभलेला होता, आपल्या गुरूची इच्छा तें जाणून होतें. आमच्या विश्वासाधाराची प्रत्येक महत्वाची गोष्ट त्यांना अवगत होती. परंतु तद्नुसार त्याचे व्यवहार नव्हते. भविष्यवादाची आणि दैवी सुज्ञतेच्या भांडाराशी तें इतके परिचित होतें कीं त्यांनी आपली आपला विश्वास जगत दाखवायचा होता. आपल्या मंडळीस त्यांनी असें निक्षुन सांगावयाचे होतें कीं कौटुंबिक सुव्यवस्थेच्याद्वारे सत्याचा प्रभाव मानवी अंत:करणांवर कसा होतो, हें त्यास जगतापुढे मांडता येईल. CChMara 361.5
ह्या लोकांची भक्तिभावना व धार्मिकता उणी असल्यामुळे आणि धार्मिकतेच्या उच्च पातळीपर्यंत त्याच्याने पोचवत नसल्यामुळे इतरांनी आपापल्या परिस्थितित जशाचे तसेच समाधानी राहावे असें तें करतात. देवाच्या शास्त्रातील भांडार त्यांनी वारंवार उघडून दाखविलेले असतें. असल्या लोकांसारखे कसे बनावे हें मर्यादित बुद्धिच्या लोकांना समजून येत नाही. हें तर खात्रीने आपल्या आत्म्यांना धोक्यात आणणार आहेत येशूच मात्र हा खराखुरा नमुना आहे. देवासमोर गुडघे नम्रतेने व मुलाप्रमाणे शिकून घेण्याच्या बुद्धिने आपण काय करावे म्हणून प्रभूची इच्छा आहे, हें समजून घेण्यासाठी प्रत्येकाने स्वत:साठी पवित्र शास्त्राचा अभ्यास आता करावयास पाहिजे. एकदा दीक्षित सेवक देवाच्या कृपेने कितीही प्रतिष्ठित ठिकाणी असला व तो देवाने प्रकाशास अनुसरण्याची निष्काळजी करितो व लहान मूलाप्रमाणे घेण्याचे धिक्कारितो तर तो अंधारात व सैतानाच्या फसवेगिरीत जाईल व त्याच मार्गाने तो दुसर्यनाही घेऊन जाईल. CChMara 361.6
आमच्या शिलावर एकदा जरी कलक किंवा ठिपका असेल तर आम्हापैकी एकालाही व कधीही देवाचा शिक्का प्राप्त होणार नाही. आमच्या स्वभावातील उणिवा काढून टाकणे आणि आमच्या आत्म्याचे मंदिर हरएक अमंगळतेपासून शुद्ध राखणे हें आम्हांकडे सोपविलेले आहे. प्रथम आत्म्याची वृष्टि पन्नासाव्या दिवशी शिष्यांवर झाली त्याचप्रमाणे अंतसमयी आत्म्याची वृष्टि आम्हांवर होईल. CChMara 362.1
माझी गोष्ट तर अगदी निराशाजनक आहे व मला ख्रिस्ती जीवन जगणे शक्य नाही, असें कोणीहि म्हणू नये. ख्रिस्ताच्या मरणाने प्रत्येकाला पुष्कळ सवलती दिलेल्या आहेत. गरजेच्या वेळी येशू हा आमचा सदासिद्ध असा साहाय्यक असतो. मात्र निष्ठेने त्याच्याकडे जा आणि तो तुमचे ऐकावयास व तुमच्या मागण्या द्यावयास त्यानें अभिवचन दिलेले आहे. CChMara 362.2
आहाहा, जिवंत, कर्तबगार निष्ठा ! आम्हांला तिची गरज आहे; आम्हांला ती पाहिजेच आहे नाहीतर परीक्षेच्या दिवशी आम्ही मुर्छित होऊन पडून जाऊ. आमच्या मार्गावर येणाच्या अंधाराने आम्ही खचू नये. अगर हताश होऊ नये. ही अवस्था एक पडदा असून जेव्हां परमेश्वर आपले मौल्यवान आशीर्वाद द्यावयास येतो तेव्हां त्या पडद्याने तो आपले वैभव झाकून घेतो. आमच्या गत अनुभवावरून आम्हांस हें कळून यावयास पाहिजे. जेव्हां देव आपल्या लोकासह वादग्रस्त बाबींविषयी वाटाघाट करतो तेव्हां असला अनुभव समाधानाला व आशेला साधनभूत असतो. CChMara 362.3
जगाच्या कलंकापासून आम्ही स्वत:ला व आमच्या मुलाना शुद्ध ठेवण्याची आज वेळ आहे. आमची शीलमय वस्त्रे कोंकण्याच्या रक्तांत घेऊन शुभ्र करण्याची आज वेळ आहे. अहकार, विषय-मनोविकार आणि आत्मिकतेच सुस्ती बाहेर पडण्याची आज वेळ आहे. जागृत होऊन आमच्या स्वभाव धर्मात एकरूपता आणण्याचा निश्चित प्रयत्न करण्याची आज वेळ आहे.” आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर तुम्ही आपली मनें कठीण करूं नका.” इत्नी ३:७,८,१५. CChMara 362.4
तयारी करण्याची आजच वेळ आहे. अशुद्ध पुरूषाच्या अगर स्त्रीच्या कपाळावर परमेश्वराचा शिक्का कदापि पडणार नाही. महत्वाकांक्षी व जगावर प्रीति करणाच्या पुरूषाच्या अगर स्त्रीच्या कपाळावर परमेश्वराचा शिक्का पडणार नाही. खोटे बोलणाच्या अगर फसवणूक करणार्य कोणत्याही पुरूषाच्या अगरे स्त्रिच्या कपाळावर तो शिक्का कदापि पडणार नाही, ज्या कोणावर हा क्किा पडेल तें सर्व ईश्वरासमोर निष्कलंक असले पाहिजेत. स्वर्गप्राप्तीसाठी हेच उमेदवार होत. माझ्या बंधूनो व भगिनींनो पुढे चला. यावेळी या बाबीविषयी मी सक्षेप्तांत लिहून तयारीच्या आवश्यकतेकडे तुमचे लक्ष मात्र वेधीत आहे. आजच्या घडीचे जे भयानक गांभीर्य आहे तें तुम्हांस कळून यावे म्हणून स्वत: पवित्र शास्त्राचा अभ्यास करा. CChMara 362.5