कलीसिया के लिए परामर्श

291/318

शास्त्राचें ज्ञान व त्यांचे प्रम-हीच आमची निर्भयता

सत्याशी पुष्कळ दीर्घ परिचय असलेल्या पुष्कळांच्या मनात कठोर व टीकात्मक भावना शिरलेल्या आहेत. तें चलाख, टीकाखोर व दोष दाखविणारे आहेत न्यायासनावर चढून जे त्याच्या कल्पना मान्य करीत नाहीत त्याचा तें न्याय करतात. अशाना तर देव सागतो कीं खालीं या व पश्चातापी अंत:करणाने त्यासमोर लीन व्हा व आपली पापें पदरी घ्या. तो त्यास म्हणतो तरी तू आपली पहिली प्रीति सोडिली याविषयी मला तुला दोष देणे आहे. तू कोठून पडला आहेस त्याची आठवण कर व पश्चाताप करून आपली पहिली कृत्ये कर नाहीतर मी तुजकडे येईन, आणि तू पश्चाताप न केलातर तुझी समई तिच्या ठिकाणाहून काढीन.” प्रकटी २:४,५ अग्रस्थान पटकविण्याची तें खटपट करीत आहेत आणि आपल्या शब्दांनी व कृतींनी तें अनेकांनी अंत:करणे दुखवीत आहेत. CChMara 355.4

आपल्या वचनांवर विश्वास ठेवून त्याप्रमाणे जगावे असें ख्रिस्ताचे आपल्या लोकांना सांगणे आहे त्याच्या वचनाचा अंगिकार करून जे त्याच्याशी एकरूप होतात आपल्या प्रत्येक कृतीत व स्वभावधर्मात त्याच्या वचनांतील सत्यता येऊ देतात, तें प्रभुच्या सामथ्यत सबळ होतील. त्यांचा विश्वास हा स्वर्गीय पायावरचा आहे असें दिसून येईल. भलतीकडेच तें भटकणारे नाहीत. त्यांचा धर्म भावनाप्रधान व खळबळकारक होणार नाही. ज्यांचे शील धर्म सबळ सुसंगत आहेत असें तें दूतासमोर व मानवासमोर उभे राहतील. CChMara 355.5

ख्रिस्ताच्या शिकवणीत दर्शविल्याप्रमाणे सत्याच्या सुवर्ण धुपाटणीत जे असतें तें आम्हांस येईल व त्यावरून आत्म्यांच्या पापांची खात्री करून त्यांचे रूपांतर करण्यांत येईल. जी सत्य प्रकट करण्यासाठी ख्रिस्त जगांत अवतरला ती साध्या रीतीने सादर करा म्हणजे तुमच्या संदेशांतील सामर्थ्य जाणवले जाईल. ख्रिस्ताने कधीही सांगितलें नाहीत व ज्यांना पवित्रशास्त्राचा आधार नाही असले कल्पनावाद व सचोटीवाद सादर करूं नका. थोर आणि गंभीर सत्ये आम्हांला द्यायाची आहेत. असें लिहीले आहे’ हीच कसोटी प्रत्येक आत्म्यापुढे मांडिली पाहिजे. CChMara 356.1

मार्गदर्शनासाठी आपण देवाच्या वचनाचा आधार घेऊ या. “असें प्रभु म्हणतो’ याचा आपण शोध करूं या. मानवी पद्धती आम्ही भरपूर पाहून घेतल्या आहेत. जगांतील विज्ञानशास्त्रांतच मात्र जे मन तरबेज झालेले आहे. त्याला देवाच्या गोष्टी समजून येत नाहीत. परंतु तेच मन रूपातरीत व पवित्र झालेले असले तर त्याला प्रभूच्या वचनांत दैवी सामर्थ्य दिसून येईल. जे मन व अंत:आत्म्याने परिशुद्ध केलेले आहे तेच मात्र स्वर्गीय गोष्टींचा निर्वाळा काढू शकेल. CChMara 356.2