कलीसिया के लिए परामर्श
चेतनोत्पादक धर्माविषयी ताकीद
ईश्वराच्या कार्यासाठी धार्मिक मनाच्या मनुष्याची आज आम्हांस गरज आहे. तें तत्वनिष्ट असून सत्याविषयीचे त्यांचे ज्ञान स्पष्ट असावे. नव्या नव्या आणि कल्पित सिद्धांतांची लोकांना गरज नाही असें मला सांगण्यांत आलें आहे. मानवी तर्कवितर्क लोकांना नको आहेत ज्यांना सत्य काय तें माहीत आहे व जे सत्य वागवून दाखवीत आहेत. अशांच्या साक्षीची त्याना गरज आहे तिमथ्याकडे सोपविलेले जबाबदारी ज्यांना ठाऊक आहे व ती मानतात अशा लोकांची गरज आहे “वचनाची घोषणा कर. सुवेळी अवेळी तयार रहा, सर्व प्रकारच्या सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखिव, वाग्दंड करे व बोध कर. कारण तें सुशिक्षण सहन करणार नाहीत. तर त्याचे कान खाजत असतां, तें स्वेच्छावाराने आपणासाठी रास घालतील. आणि तें सत्य ऐकेतनासे होतील व कहाण्याकडे वळतील. अशी वेळ येईल. तू सर्व गोष्टींविषयी सावध ऐस, दु:ख सोस, सुवार्तिकाचे काम कर, तुला सोपविलेली सेवा पूर्ण कर’ २ तिमथ्य ४:२-५. CChMara 354.1
निर्धाराने व निश्चितपणे जागृत शातीच्या शुभवर्तमानाच्या शस्त्रसामग्रीने सुसज्ज राहा. शुद्ध व निष्कलक धर्म हा चेतना उत्पन्न करणारा धर्म नसतो. याची तुला खात्री पटू दे. केवळ सिद्धांत्मक व तात्विक गोडी उत्पन्न करण्याचा भार देवाने कोणावर लादलेला नाही. माझ्या बंधूनो तुमच्या शिक्षणात असल्या गोष्टी येऊ देऊ नका. तुमच्या अनुभवात त्याचा शिरकाव होऊ देऊ नका. असल्या शिक्षणाने तुमच्या जीवित कार्याचा बिघाड होऊ देऊ नका. CChMara 354.2