कलीसिया के लिए परामर्श
बेसावध निवेदने करण्यांतील धोका
देवाच्या आज्ञेला विरोधक नसतील तर लोकांनी आपापल्या देशाच्या कायद्यानुसार सर्व गोष्टी शक्य तितक्या मान्य कराव्यात असें शिक्षण द्या. CChMara 344.1
सरकारच्या व कानूकायद्यांच्यावरूद्ध आम्हांपैकी कांही बधुजण पुष्कळच बोलतात व लिहीतात यावरून आम्हांविषयीची गैरसमज होण्यासारखा असल्यामुळे असें करणे चुकीचे आहे. सरकारी अधिकार्यकडून जे कांही घडते त्यात निरतर दोष काढणे कांही शहाणपणाचे नसते. व्यक्तिवर अगर सस्थावर हल्ला करणे हें काम आमचे नाही. सरकारी अधिकाच्याशी आम्ही विरोधक आहो असा समज न होऊ देण्याविषयी आम्ही मोठी सावधगिरी बाळगावी. CChMara 344.2
आमचा युद्ध संग्राम हा आगळीकीचा आहे हें खरे आहे परंतु “असें प्रभु म्हणतो.” यांत आमचा हत्यारसंग्रह आहे. देवाच्या महान् दिवसासाठी लोकांनी सिद्ध व्हावे याची तयारी करावी हें आमचे काम आहे. जे अमाच्या धर्माचे नाहीत त्यांच्याशी विरोध वैमनस्य होईल अशा गोष्यींपासून आम्ही परावृत्त व्हावे. CChMara 344.3
अशी वेळ येणार आहे कीं आमचे बंधू निष्काळजीने जे बोलतात व लिहीतात व बेसावधगिरीची टीकात्मक निवेदने करतात त्यांचा उपयोग करून आमचे शत्रु आम्हांस दोषी ठरवितात. जे कोणी असली निवेदने करितील त्यांनाच मात्र तें दोष देणार नाही तर सबंध अॅडव्हेटिस्ट मंडळीवर तो दोषारोप येईल. दोषारोप करणारे असें म्हणतील कीं तुम्हांपैकी जबाबदार माणसांनी अमक दिवशी सरकारच्या कायदेकारभाराविरूध्द असें निवेदन केले. आमच्या विरोधकांच्या ठपक्यांनी पोषक अशा अनेक गोष्टी पुढे केलेल्या व ध्यानात ठेविलेल्या पाहून पुष्कळजण आश्चर्यचकित होतील आमच्या मनांतही नव्हता असा आमच्या शब्दाचा बेअर्थ; केल्याबद्दल पुष्कळजण थक्क होऊन जातील. म्हणून आमच्या कामदार मंडळीने सर्वदा व सर्व परिस्थीतीत सावधपणे बोलण्याची काळजी घ्यावी. मानवाच्या अंत:करणाची कसोटी होण्याच्या महान क्रांतीपूर्वी आम्ही आमच्या अविचाराच्या भाषणांनी त्रास निर्माण करूं नये म्हणून सर्वांनी सावध रहावे. CChMara 344.4
आम्ही जसे दिसतो तसा न्याय जग आमचा करील हें आम्ही ध्यानात ठेवावे ख़िस्ताला प्रगट करण्याचा जे कोणी प्रयत्न करीतात त्यांनी आपल्या स्वभावधर्मात विसंगती न दिसावी म्हणून काळजी वाहावी. आम्हांवर वरून अत्म्याने वर्षाव केल्यानंतरच आम्ही पूर्णपणे कामाला हात घालावा हें पाहावयास पाहिजे असें झाल्यावरच आम्हांला निश्चित सदेश देता येईल. परंतु आता जसे कांही करतात त्यापेक्षा तो कमी दोषात्मक प्रकारचा होईल. विश्वासधारी सर्वजण विरोधकांच्या तारणासाठी अधिक आस्थेवाईक होतील. अधिकारी वर्ग व सरकार ह्यांना दोष देण्याचे कार्य संपूर्णत: देवाच्या हवाली राहूं द्या. नम्रतेत व प्रीतीत निष्ठावंत रखवालदार म्हणऊन येशूत असलेल्या सत्याच्या तत्त्वांचे आपण प्रतिपालन करूं या. CChMara 344.5