कलीसिया के लिए परामर्श
इतर धर्मपंथांच्या दिक्षितांशी व मंडळीशी बोलतांना
दसर्या उपासना मंदिरामध्ये बोलण्याची तुम्हांला संधि मिळेल. असल्या संधीचा योग्य उपभोग घेताना तारणायाच्या शब्दाची आठवण करा, म्हणून संसारखे चतुर व कबुतरासारखे साळसूद व्हा.” दोषारोपाची भाषणे करून शत्रुत्वाचा मत्सर उत्पन्न करूं नका. अशा रीतीने सत्याची प्रवेशद्वारे तुम्ही बंद करून टाकाल. स्पष्ट संदेश देण्यांत यावेत परंतु विरोध न चेतविण्याची सावधगिरी घ्या. पुष्कळ आत्म्यांचे तारण साधवयाचे आहे. सर्व प्रकारची कठोर शब्दरचना आवरून धरा. तारण साधण्यासाठी आपल्या शब्दांत व कृतीत चतुर असा ज्या कोणाशी संबंध घडेल त्याना ख्रिस्त दाखवा. शांतीच्या व सदिच्छेच्या सुवार्तेने तुम्ही सुसज्ज झालेला आहा हें सर्वांना दिसूं द्या. ख्रिस्ताच्या आत्म्याने जर तुम्ही कार्याला हात घातला तर परिणाम आश्चर्यकारक घडून येतील. न्यायत्वाने, दयेने आणि प्रेमाने जर कार्य चालूं ठेविले तर अवश्य ती मदत प्राप्त होईल. सत्याचा विजय होईल व यशप्राप्ति जिंकली जाईल. CChMara 340.2
इतर मंडळ्यांमधील दीक्षितांसाठी आम्हांला कामगिरी दिलेली आहे. त्यांचे तारण व्हावे अशी देवाची इच्छा आहे. विश्वास व आज्ञापालनाच्याद्वारे मात्र आम्हाप्रमाणेच त्यांना अविनाशी जीवन मिळू शकेल. त्यांना तें लाभावे म्हणून आम्ही मोठ्या आस्थेने परिश्रम केले पाहिजेत. आजच्या काळी देवाचे जे विशेष कार्य चालूं आहे त्यांत त्यांनी विभागी व्हावे असें देवाला वाटत आहे. देवाच्या कुटुंबीयांना वेळीच अन्नपुरवठा करणार्य मंडळीत त्यांनीही असावे अशी इच्छा आहे. ह्या कार्यात त्यांनी को सामील होऊ नये ? आमच्या दीक्षितांनी इतर धर्मपंथाच्या दीक्षिताच्या निकट जाण्याचा प्रयत्न करावा. या लोकांसाठी व या लोकांबरोबर प्रार्थना करा. त्याच्यासाठीं ख्रिस्तही मध्यस्थी करीत आहे. गंभीर जबाबदारी त्यांच्याकडे आहे. ख्रिस्ताचे संदेष्टे म्हणून आम्ही कळपाच्या ह्या मेषपालाशी ह्या अंत:करणपूर्व आस्थेने हितसंबंध दाखवावा. CChMara 340.3
आमच्या दिक्षितांसाठी परिश्रम करणे आपले विशेष कार्य आहे असें समजावे त्यांनी त्याच्याशी विरोध करता कामा नये. परंतु आपले पवित्रशास्त्र हाती घून त्याचा अभ्यास करण्याचा त्यास आग्रह करावा. असें जर घडून आलें तर जे पुष्कळ दीक्षित चुकीचा संदेश सागतात, तें सोबतच्या काळासाठी सत्याची सुवार्ता सागतील. CChMara 340.4