कलीसिया के लिए परामर्श
सफळ प्रार्थनेच्या अटी
जर आम्ही प्रभूच्या वचनाप्रमाणे जगत असलो तरच मात्र आम्हांला त्याच्या अभिवचनाच्या परिपूर्तीविषयीं हक्काने प्रतिपादन करिता येईल. स्तोत्रकर्ता म्हणतो, “माझ्या मनांत दुष्कर्माचा विचार असतां तर प्रभु माझे न ऐकता.” (स्तोत्र ६६:१८) आमचा आज्ञांकितपणा नुसताच अपुरा व अर्धामुर्धाच असेल तर त्याच्या वचनांची आम्हांत परिपूर्ति होणार नाहीं. CChMara 329.3
आजार्यांच्या आजारनिवारणार्थ विशेष प्रार्थना असावी याविषयीं परमेश्वराच्या वचनांत आम्हांला शिक्षण दिलेले आहे. परंतु तें प्रार्थनाकार्य अत्यंत गंभीर असल्यामुळे काळजीपूर्वक विचार केल्याखेरीज तें हातांत घेऊ नये. आजाण्यासाठी करावयाची प्रार्थना पुष्कळदां अशी असतें कीं तिला जो विश्वास लागता तो कधीं कधीं विश्वास नसून केवळ पोकळ अभिमानच असतो. CChMara 330.1
आत्मढंगांत सांपडलेले पुष्कळजण आजार स्वत:च घेऊन येतात. निसर्गाच्या बंधनाप्रमाणे अगर कडक शुद्धतेच्या तत्त्वाप्रमाणे तें जगत नसतात. खाण्यापिण्यांत, कपड्यांत आणि कामधद्यांची जीं आरोग्यकारक बंधने असतात ती कित्येकजण झुगारून देतात मानसिक अगर शारीरिक दुर्बळता आणील अशा स्वरूपाचा दुर्गुण अंगीं उतरलेला असतो. आरोग्यदानाचा आशीर्वाद जरअशा लोकांना प्राप्त झाला तर पुष्कळजण देवाच्या निसर्गाचे आणि आत्मिकतेचे नियम दुर्लक्षून झुगारुन देतील व स्वत:शीच विचार करून म्हणू लागतील कीं प्रार्थनेच्या द्वारे जर देव आरोग्यदान देणार असेल तर मग आरोग्यविध्वंसक अशा संवयीं चालूं ठेवण्यास व निर्धांकपणे भ्रष्ट फंदात पडण्यास आम्ही स्वतंत्र आहों. परमेश्वराने एखादा मोठा चत्मकार करून असल्याही लोकांना आरोग्यदान दिले तर तो पापवृत्तीला जणू काय उत्तेजनच देतो असें होईल. CChMara 330.2
आपल्या आरोग्यविधातक चालीरिती सोडून देण्याचे जर लोकांना शिक्षण दिले नाही तर देवच आजार नष्ट करणारा म्हणून त्याजकडे पाहात असें शिक्षण देणें वायफळ आहे. प्रार्थनेचे उत्तर म्हणून जर देवाचा आशीर्वाद घ्यावयाचा असेल तर दुष्टाईचा मार्ग सोडून दिला पाहिजे, सत्कार्ये करण्याचे शिकले पाहिजे. त्यांनी आपले वातावरण आरोग्यकारक ठेविले पाहिजे आणि आपली व्यवहारनीति अचूक राखिली पाहिजे. देवाच्या नैसर्गिक तशाच आत्मिक विधिनिबंधाशीं सुसंगत असें त्यांनी जगले पाहिजे. CChMara 330.3
आरोग्यप्राप्तीसाठी प्रार्थना करूं इच्छिणार्यांना असें स्पष्टपणे सांगण्यांत यावे कीं देवाच्या नैसर्गिक व आत्मिक विधिनिबंधाचे उल्लघन हें पाप होय व त्याचा आशीर्वाद जर त्यास मिळवायचा असेल तर त्यांनी आपली पापें पदरीं घेऊन ती सोडून दिली पाहिजेत. CChMara 330.4
धर्मशास्त्राची आज्ञा अशी आहे कीं, “तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपलीं पातकें एकमेकांजवळ कबूल करून एकमेकांसाठी प्रार्थना करा.” (याकोब ५:१६.) जो प्रार्थना करूं इंच्छितो त्याजपुढे पुढील विचार मांडावेत. “आम्हांला तुमचे अंतर्याम वाचून बघतां येत नाहीं अगर तुमच्या जिण्यांतील गुपिते कळत नाहींत. त्यांचे ज्ञान तुमचे तुम्हांला व देवालाच आहे. जर पापांबद्दल तुम्हांला पश्चात्ताप झाला असेल तर ती कबूल करणे हें तुमचे कर्तव्य होय.” गुप्त प्रकारचे पाप ख्रिस्तासमोर कबूल करावयाचे असतें कारण तोच देवामध्ये व मानवामध्ये मध्यस्थ असतो. कारण, “जर कोणीं पाप केलेच, तर धार्मिक असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे.” (१ योहान २:१) प्रत्येक पाप ईश्वरासमोर एक गुन्हा असतो व ख्रिस्ताच्यातर्फे त्याची कबुली दिली पाहिजे. उघड उघड पाप उघडपणे पत्करावयाचे असतें. स्वबांधवांचा अन्याय केला असेल त्याची दुररूस्ती करावयाची असतें. आरोग्यप्राप्तीसाठी ज्यांची धडपड चाललेली असतें अशांत जर कोणी अभद्र भाषा बोलत असतील. गृहांत, शेजार्यपाजाच्यांत अगर मंडळीमध्ये बेबनाव पेरून बुद्धिभ्रंश व कलह निर्माण करीत असती. आपल्या अन्यायी व्यवहाराने जर काणाला पापांत पाडिले असेल तर त्यांनी ही सर्व पापें देवासमोर व ज्याचे अपराध केले असतील त्याच्यासमोर कबूल केले पाहिजेत. जर आपण स्वत:ची पापे पदरी घेतो, तर ती विश्वासू व न्यायी आहे म्हणून आपल्या पापाची क्षमा करील व आपल्याला सर्व अधर्मापासून शुद्ध करील.” (१ योहान १:९.) CChMara 330.5
अन्यायाची दुरुस्ती करण्यांत आल्यावर आम्हांला रोगग्रस्तांच्या गरजा विश्वासाने व प्रभूच्या आत्म्याच्या अनुरोधानें प्रभूसमोर सादर करता येतील. एकेकाला तो नावाने ओळखतो, प्रत्येकाची तो काळजी वाहातो ती काळजी अशी असतें कीं देवाने आपला प्रिय पुत्र दुसर्य कोणासाठी नाहीं तर जणु काय तुम्हांसाठींच दिलेला असतो. देवाची ही अशी अफाट व अचूक प्रीति असल्यामुळे रोगग्रस्तांना त्याजवर विश्वास ठेवून आनंदित राहाण्याचे उत्तेजन देण्यांत यावे. आपल्याचविषयी काळजी करीत असल्याने अशक्तता व आजार येण्याचा संभव असतो. निराशा व दु:ख बाजूला सारले तर रोगमुक्ततेचा संभव अधिक चांगला असतो, “कारण जे त्याच्या दयेची अपेक्षा करितात.... त्याजवर त्याची नजर असतें.” (स्तोत्र ३३:१८.१९) CChMara 331.1
आजार्यांसाठी प्रार्थना करीत असताना असें ध्यानात बाळगले पाहिजे कीं, “प्रार्थन करावी तशी करावयास आपल्याला समजत नाहीं.” (रोम ८:२६). ज्या आशीर्वादाची आपण अपेक्षा करितो तो हितावह आहे कीं असावा कीं, “प्रभु, अंतर्यामातील प्रत्येक गुप्त गोष्ट तुला माहित आहे. ही मंडळी तुला परिचित आहे. त्याचा कैवारी येशू याने त्याच्यासाठीं स्वप्राण दिला. आमच्या प्रीतीपेक्षा त्याची त्यांच्यावरील प्रीति फार अधिक आहे; म्हणून तुझ्या गौरवाप्रीत्यर्थ आणि दुखणाईताच्या कल्याणार्थ आम्ही येशूच्या नांवे अशी विनंती करितों को, त्याचे आरोग्य त्यांना परत दे. त्यांना तें मिळू नये, अशी जर तुझी इच्छा असेल तर तुझ्या कृपेनें त्यांना समाधान मिळावे आणि तुझ्या सान्निध्याने त्याच्या दु:खांत त्यांना आधार मिळावा.११ CChMara 331.2
प्रारंभापासून तर शेवट काय हें तो जाणून असतो. सर्व लोकांच्या अंतर्यामाचा त्याला परिचय असतो. अंत:करणातील हरएक गुपित तो ओळखून घेतो. ज्यांच्याकरिता प्रार्थना करण्यांत येतात त्यांना जीवदान मिळाल्यावर कसोटीसाठी त्यावर येणार्य प्रसंगांतून तें निभावून जातील कीं नाही हें त्याला ठाऊक असतें. त्यांची आयुष्ये स्वत:साठीं न जगतासाठीं आशीर्वाद संपन्न होतील को शापमय होतील, हें त्याला कळत असतें. ह्याच एका कारणामुळे आस्थापूर्वक विनति अर्ज करतांना आम्हीं म्हणत जावे कीं, “माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे.” (लूक २२:४२.) गेथशेमाने बागेत देवाच्या इच्छेला व चतुर्राइला मान्य असणारे शब्द जोडून येशूनें विनत केली कीं; “हें माझ्या बापा, होईल तर हा त्याला मजवरून टळून जावो.” (मत्तय २६:३९). देवपुत्राच्या मुखात जर हें शब्द उचित होतें तर नश्वर पतित व मर्त्य मानवाच्या तोंडात तें किती अधिक साजेसे होतील ! CChMara 331.3
आपल्या इच्छा सर्वज्ञ स्वर्गीय पित्यापुढे सादर कराव्या व नंतर संपूर्ण विश्वासाने त्याव सर्व हवाला टाकावा हा सुसंगत वर्तनक्रम होय. त्याच्या इच्छेनुरुप आपण मागणी केली तर देव आमचे ऐकतो हें आम्हांला ठाऊक आहे परंतु शरणागतीची भावना नसताना आमच्या मागण्या दटावीत राहाणे रास्त नसते. प्रार्थनेचे स्वरुप हुपकाचे न करितां तें मध्यस्थीचे असावे. CChMara 331.4
आरोग्यप्राप्तीचें कार्य परमेश्वर आपल्या दैवी शक्तीनुरुप निश्चितपणे करितो अशीं उदाहरणे आहेत. परंतु सर्वच रोगग्रस्त बरे होत नाहींत. पुष्कळ जण येशूमध्ये मरणाधीन होतात. पात्मस बेटावर योहानाला लिहिण्याची अशी आज्ञा झाली कीं, “प्रभूमध्ये मरणारे आतापासून धन्य आहेत. आत्मा म्हणतो: खरंच आपल्या कष्टांपासून सुटून त्यांस विसावा मिळेल; त्यांची कृत्ये त्यांजबरोबर जातात.” (प्रकटी १४:१३) यावरून आम्हांला असें दिसून येते कीं ज्याना आरोग्यदान मिळत नाहीं, तें काहं विश्वासांत उणे आहेत असें सम्जूं नये. CChMara 332.1
आमच्या प्रार्थनांची उत्तरे आम्हांला ताबडतोब व सरळ मिळावीत असें आम्हा सर्वांना वाटते. उत्तराला दिरंगाई लागली किंवा तें नको असलेल्या स्वरूपांत आलें तर निराश होण्याचा मोह पडतो. आमच्या प्रार्थनांची उत्तरे आमच्याच वेळेवर व आमच्याच इच्छेप्रमाणे द्यावीत कीं न द्यावीत हें देवाला समजून येणार नाही इतका तो खुळा नाहीं. आमच्या इच्छेनुररुप करण्यापेक्षा अधिक आणि अधिक चांगले काय तें तो करूं शकतो त्याच्या चतुराईवर व प्रेमावर आमची निष्ठा आहे म्हणून आमच्याच मनाप्रमाणे करावे असें न मागता त्यांच्या उद्देशांशी समरस होण्याचा आम्ही प्रयत्न करावा. त्याच्या योजनेंत आमच्या इच्छा व आवडी लोपून जाव्यात. या अनुभवानी आमच्या विश्वासाची कसोटी होत असल्यामुळे तें आम्हांला हितकर असेच आहेत. त्यावरून आमचा विश्वास सत्य वे खरोखरीचा आहे कीं नाहीं, तो देवाच्या वचनांवर मात्र आधारलेला आहे कीं नाहीं अगर परिस्थितीत हेलकावे खात तो अनिश्चित व चंचल आहे कीं काय, हें त्या अनुभवांनी प्रगट केले जाईल. व्यवहार घटनेत निष्ठेला बळकटी येते. सहनशीलतेला आपले संपूर्ण कार्य करूं द्यावे. प्रभूवर अवलंबून राहणार्यसाठी पवित्र ग्रंथांत फार मौल्यवान् अभिवचने दिलेली आहेत, हें ध्यानात आणावें. CChMara 332.2
हीं तत्त्वे सर्वांनाच अवगत होतात असें नाहीं. प्रभूच्या आरोग्यदायक कृपेची मार्गप्रतिष्ठा करणाच्या पुष्कळांचा असा समज आहे कीं आमच्या प्रार्थनांची उत्तरे सरळ आणि त्वरित मिळाली तर ठीक नाहीतर आमच्या विश्वासांत कांही दोष असेल असें त्यांस वाटते. ह्याच कारणामुळे जे आजाराने अशक्त होतात त्यास चतुराईचा सल्ला देणे आवश्य असतें कीं त्यांनी सारासार विचाराने वागावे. त्यांच्यानंतर जो मित्रमंडळी येणार त्यांच्याविषयींच्या आपल्या कर्तव्याची हेळसांड त्यांनी करूं नये अगर आरोग्यप्राप्तीसाठी नैसर्गिक साधनांकडे त्यांनी दुर्लक्ष करूं नये. CChMara 332.3
अशावेळी वारंवार भूलचूक होण्याचा धोका असतो. प्रार्थनेचे उत्तर म्हणून त्यांना आरोग्यदान मिळाले तर आपल्या विश्वासांत उणेपणा दिसेल असें काहीएक करिता कामा नये असें त्यांस वाटते. परंतु मरण आपणांला घेऊन जाणार असें मनांत आणून आपला कारभार नीटनेटका करण्याची टाळाटाळ त्यांनी करुं नये अगर मरणसमयी आपल्या प्रियकर मंडळास उत्तेजनाचे शब्द अगर सल्लामसलत देण्याचे त्यांना भय वाटू नये. CChMara 332.4
प्रार्थनेच्याद्वारें आरोग्य मिळविण्याचा जे कोणी प्रयत्न करतात त्यांनी आटोक्यात असलेला औषधोपचार करण्याची निष्काळी करुं नये. दु:ख शमविण्याच्या कामी आणि गुणप्राप्तीसाठी निसर्गामध्ये साहाय्यभूत होणारी साधने देवानेच पुरविलेली असतात म्हणून या उपचारात विश्वासाची कांहीं नाकबुली होत नाहीं. देवाशीं सहकार करण्यांत विश्वासाला कमीपणा येत नाहीं तर उलट तें गुण येण्याच्या परिस्थितींत स्वत:ला मदत करतात. आपल्या जीवनकलेविषयीं जे विधिनिबंध आहेत त्यांचे ज्ञान आम्हांस मिळावे म्हणून देवाने आम्हांस शक्ति दिलेली आहे. विनियोग करण्यासाठी देवानेच हें ज्ञान आमच्या आटोक्यात ठेविले आहे. आरोग्यप्राप्तीसाठी आम्ही आपल्या प्रत्येक शक्तीचा, शक्य त्या प्रत्येक सवलतीचा नैसर्गिक बंधनाशी मेळ बसवून उपयोग करून घ्यावा. रोगग्रस्ताला गुण यावा म्हणून आम्ही प्रार्थना करितों तेव्हां आम्हांला आमच्या बुद्धिसामथ्र्याचा अधिक उपयोग करता येईल व देवाशीं सहकार्य करीत त्याची उपकारस्तुति करून त्यानें स्वत:च पुरवठा केलेल्या साधनावर आशीर्वाद मागता येईल. CChMara 332.5
औषधोपचारांचा विनियोग करण्यासंबधी देवाच्या शास्त्रांत परवानगी दिलेली आहे. इस्राएलांचा हिजिकया राजा आजारी पडला व देवाच्या संदेष्ट्याने त्याजकडे असा संदेश आणिला कीं तो ह्या दुखण्यांत मरावयाचा आहे. राजानें प्रभूची रडून प्रार्थना केली. त्यानें आपल्या सेवकाचे ऐकून घेतले व त्याजकडून असा संदेश धाडण्यात आला कीं त्याच्या आयुष्यांत आणखी पधरा वर्षांची भर पडणार आहे. देवाच्या एकाच शब्दाने हिज्कियाला ताबडतोब आराम पडला असतां पण येथे विशेष सूचना देण्यांत आल्या होत्या. “अंजिराची एक चादकी आणून गळवावर बाधा म्हणजे त्याला गुण पडेल.” (यशाया ३८:२१.) CChMara 333.1
आजार्यांच्या आरामासाठी आम्ही प्रार्थना करितां तेव्हां कोणतीही परिस्थिति असो देवावरचा विश्वास कमी होता कामा नये. जर विरह व्हावयाचा असेल तर ती कडू गोळी आम्हीं मान्य करावयास पाहिजे. कारण ती पित्याने आपल्या हातानें आम्हांस दिलेली आहे. परंतु जर आरोग्यदान लाभले तर ज्यावर ही कृपावृष्टि झालेली आहे त्यावर उत्पन्नकर्त्यांचा नवीन उपकार झालेला आहे, हें त्याला विसरता येणार नाही. दहा कुष्ठ रोग्यांना बरे केले तेव्हां एकच येशूकडे येऊन त्याला गौरव देता झाला. देवाच्या कृपेचा ज्यांना स्पर्शहि झाला नाही अशा त्या नऊ निर्बुद्धासारखे आम्हांपैकी कोणीही होऊ नये. “प्रत्येक उत्तम देणगी प्रत्येक पूर्णदान वरुन आहे; तें ज्याला विकार नाहीं व जो फिरण्याने छायेत जात नाही अशा प्रकाशाच्या पित्यापासून उतरते.” (याकोब १:१७). CChMara 333.2
*****