कलीसिया के लिए परामर्श

266/318

देवाचें मंदिर भ्रष्ट करूं नका

तरुणांचीं मनें हस्तगत करावीत, त्यांचे विचार भ्रष्ट करावेत व त्याच्या विषय-भावना जागृत कराव्यात हेंच सैतानाचे विशेष कार्य ह्या शेवटच्या दिवसात आहे, कारण तो जाणून आहे कीं, असल्या पद्धतीने अशुद्ध व्यवहार चालूं राहातील. मनाच्या सर्व थोर शक्तींचा -हास होईल व त्याच्या इच्छेरुप त्याचे हेतु साध्य करण्यासाठी त्याला मालकी चालविता येईल. 5 CChMara 324.2

या सद्गुणभ्रष्ट युगांत तरुण आपले स्वभावधर्म बनवीत आहेत. त्यांच्यासाठी माझा आत्मा विव्हळत आहे. त्याच्या आईबापांसाठीसुद्धा माझा जीव लटपट कांपत आहे. कारण मला असें दर्शविण्यात आलेले आहे कीं, आपली मुलें ज्या मार्गात स्थिर व्हावयास पाहिजेत त्याचे शिक्षण देण्याचे कर्तव्य साधारणत: त्यांना कळून येत नाहीं. रूढी व चालीरिती काय याचा विचार करण्यांत येतो. यांतच मुलें हेलकावे घेण्याचे शिकतात व भ्रष्टतेला बळी पडतात. यावेळी गुगीत असलेल्या त्यांच्या आईबापांना आपली मुलें कोणत्या धोक्यात येत आहेत हें पाहून घेण्यास त्यांच्या डोळ्यावर झापड आलेली असतें. परंतु भ्रष्ट संवयांच्या तडाख्यातून फारच थोडेसे तरुण सुटतात. त्यांच्यावर कामाचा फार ताण पडेल या भयाने त्यांना आईबाप शारीरिक कष्ट पडू देत नाहींत. मुलांना जे ओझे वाहावयाचे असतें, तें आईबापच अगावर घेतात. CChMara 324.3

वाजवीपेक्षां अधिक काम वाईट खरें परंतु आळसाचे परिणाम अधिक दहशतकारक असतात. भ्रष्ट संवयाच्या संग्रमांत आळशीपणाच घेऊन जातो. स्वयशक्तीचा दुरुपयोग केल्याने जो थकवा व ग्लानी येते त्याच्या पाचव्या हिश्शानेसुद्धा उद्योगशीलतेच्या श्रमांनी येत नाहीं. जर साध्या व सुयोजित श्रमांनी तुमच्या मुलांना थकवा येत असेल तर आईबापानी, दुसर्‍य कोणत्या तरी कारणाने ती नि:सत्व होऊन त्यांना निरतरचा थकवा भासत तर नसेल ना याची खात्री करून घ्या. आपल्या मुलांच्या मज्जातंतुंना व स्नायूंना व्यायाम मिळेल अशा प्रकारचे शारीरिक श्रम त्यांना द्या. यामुळे येणार्‍य थकव्याने दुर्गुणी सवयाकडे जाण्याची त्याची आवड कमी होऊन जाईल. 6 CChMara 324.4

अशुद्ध विचार मनांत येतील असलें वाचन व देखावे यांची टाळाटाळ करा. नैतिक व बौद्धिक शक्तींची वाढ करा. 7 CChMara 325.1

तुम्ही आपले विचारच नाहीं तर तुमचे मनोविकार व प्रेमसंबंध आपल्या ताब्यांत राखावेत अशी देवाची इच्छा आहे. असल्या गोष्टींच्या योग्य कारभारावरच तुमचे तारण अवलंबून आहे. मनोविकार व प्रेमाभिलाष ही जोमदार साहित्ये असतात. जर त्याचा दुरुपयोग केला, अयोग्य उद्देशाने त्यांचा विनियोग केला, भलत्याच प्रकारे त्याचा व्यवहार झाला तर तुम्हांला नष्ट करण्याची त्यात ताकद आहे व देवाव्यतिरिक्त व आशाव्यतिरिक्त लाचारींत तीं तुम्हांला ढकलून देतील. CChMara 325.2

निरर्थक तर्कवितर्कात जर तुम्ही रमत असाल व आपल्या मनात अशुद्ध विचार येऊ देत असाल तर तें तुमचे विचार प्रत्यक्ष अमलांत आणल्याचे कार्य म्हणून तुम्ही परमेश्वरासमोर काहीं अशीं गुन्हेगारच आहो असें होईल. संधि मिळाली नाही म्हणून तें कार्यस्वरुपात आलें नाहींत येवढेच. रात्रंदिन तद्रत राहावे व मनोराज्ये करावीत हें वाईट असून संवया बनविण्यास तें अत्यंत घातक असतें. एकदा हा प्रघात जडला म्हणजे त्यामुळे लागलेल्या संवयांचे निर्मूलन करणे अशक्य होऊन जाते म्हणून विचारसरणीला शुद्धतेच, पवित्रतेचे व भारदस्तीचे वळण लावा. आपले मन आटोक्यात ठेवायचे असेल व निरर्थक आणि भ्रष्ट विचारांचा आत्म्याला संपर्क होऊ द्यावयाचा नसेल तर आपल्या नेत्रांवर, कणावर आणि सर्व ज्ञानेंद्रियांवर तुम्हांला निष्ठापूर्वक रखवालदारी केली पाहिजे. हें अत्यंत इष्ट कार्य कृपेच्या सामथ्यनेच साध्य होऊं शकतें. 8 CChMara 325.3

मेंदूमध्यें रक्तप्रवाह वाढल्यामुळे जर बेसुमार अभ्यास केला तर त्यानें विकारी चेतना होतें, आत्मसंयमनाचा जोर कमी होतो आणि वारवार मानसिक छद व हरुप वाढला जातो. याप्रमाणे अशुद्धतेला प्रवेशासाठी मार्ग मोकळा होतो. आज जगामध्ये भ्रष्टतेचा जो सर्वत्र प्रसार होत आहे त्याला शारीरिक शक्तींचा दुरुपयोग अगर निरुपयोग हाच प्रामुख्याने कारणीभूत आहे. “अहंकार, अन्नाची भरपाई आणि आळशीपणाची चंगळ’ हें मदोमाच्या नाशकाली असें मानवाचे कट्टे शत्रू होतें तसेच तें आज मानवी प्रगतीचे अत्यंत प्राणघातक शत्रु होत. 9 CChMara 325.4

हलकट मनोविकारांच्या फदाने पुष्कळण प्रकाशाकडे पाहूं इच्छिणार नाहींत. कारण जीं पायें सोडून देण्याची त्याची तयारी नाहीं तीं त्या प्रकाशात उघड होतील असें त्यास भय वाटतं. पाहिजे त्या सर्वांना ती दिसतील. प्रकाशापेक्षा अधाराचीच त्यांना आवड असेल तर त्यांचा अपराध यत्किंचितही कमी होणार नाहीं. 10 CChMara 325.5

देवाचा अवमान करावा अगर त्याच्या आज्ञाचे उल्लघन करावे त्यापेक्षा तत्पूर्वी पुरवले असें प्रत्येक ख्रिस्ती मनुष्याचे ब्रीद वाक्य असावे. सुधारकांचा बाणा करणारे आणि देवाच्या वचनांतील अत्यंत गभीर व शुद्धकारी सत्ये बाळगणारे म्हणून आम्हांला सत्याचा जो दर्जा आहे त्यापेक्षा अधिक भारदस्त केला पाहिजे. मंडळींमधील पाप व पापी यांची ताबडतोब विल्हेवाट लाविली पाहिजे. इतरांना त्यांचा संपर्क होऊ नये म्हणून आखानासारख्या लोकांना आमच्या समूहातून संपूर्णपणे परिशुद्ध करण्यांत यावे अशी सत्याची आणि शुद्धतेची आम्हांकडे मागणी आहे. जे जबाबदारीच्या हुद्यावर आहेत त्यांनी आपल्या बंधूच्या पापाकडे कानाडोळा करूं नये. त्यानें आपलें पाप तरी सोडून द्यावें अगर मंडळीमधून तरी निघून जावे. (बाहेर पडावे.) 11 CChMara 325.6

तरुणांच्या अंगीं तत्त्वे इतकी भक्कम भिनलेली असावीत कीं सैतानाच्या अत्यंत जहाल मोहामुळे तें आपली निष्ठा रतिभरहि सोडणार नाहीत. अत्यंत भ्रष्ट परिस्थितीच्या गराड्यात शमुवेल बाळ अडकलेला होता. त्यांच्या मनाला खेद वाटेल अशा गोष्टी तो पाहत होता व ऐकत होता. एलीचे पुत्र पवित्र हुद्यावर होतें तरी सैतानाच्या तंत्राने चालत होतें. ह्या लोकांनी आसपासचे संबंध वातावरण भ्रष्ट करून टाकले होतें. रोजरोज पुरुष व स्त्रिया पापाकडे व अन्यायाकडे आकर्षिल्या जात होत्या तरी पण शमुवेल निष्कलक होता. त्याचा वर्तनक्रम निर्दोष होता, त्याचे शील निष्कलंक होतें. त्यानें त्याच्याशी संगत सोबत केली न हीं अगर त्यांच्या पापाविषयी सबध इस्राएलामध्ये ज्या भयानक बातम्या उठत होत्या त्यांविषय त्याला समाधान वाटत नव्हते. शमुवेलाची देवावर प्रीति होती. त्याचे अंत:करण देवाशीं इतकें निगडित होतें कीं, एलीचे पुत्र इस्राएलांत भ्रष्टाकार माजीवीत होतें. तेव्हां त्यांच्या पापांविषयी बोलण्यासाठी दूताला त्याजकडे पाठविण्यात आलें. 12 CChMara 326.1