कलीसिया के लिए परामर्श
सेव्हंथ-डे अॅडव्हेंटिस्ट-जगापुढें असलेला एक कित्ता
समाज म्हणून आम्हांला सुधारक व्हावयाचे आहे, जगापुढे - ज्योति व्हावयाचे आहे, देवाचे रखालदार म्हणून निष्ठावंत राहावयाचे आहे. अशासाठीं कीं आमच्या वासना भ्रष्ट करणाच्या सैतानाच्या हरएक पाशाविषयी आम्हीं सावधगिरी ठेवावी. सुधारणा कार्यात आमचे वजन, आमची शक्ति हा एक किताच व्हावा. ज्या व्यवहाराने विवेकबुद्धि बोथट होईल अगर मोहाला उत्तेजन दिले जाईल असल्या व्यवहारापासून आम्हीं दूर राहिले पाहिजे. देवाच्या प्रतिमेप्रमाणे घडलेल्या मानवाच्या अंत:करणांत सैतानाच्या प्रवेशासाठी एकहि द्वार उघडे ठेविता कामा नये. 22 CChMara 321.3
याचा एकच खुला मार्ग आहे व तो म्हणजे चहा, कॉफी, दारू, अफू व मादक पेये यांना स्पर्श करूं नये, यांची चव घेऊ नये व त्यांचा संबंध येऊ देऊ नये. देवाच्या कृपेनें सबळ झालेल्या आपल्या इच्छाशक्तीचा आधार घेऊन वासना भ्रष्ट करणाच्या सैतानी मोहाचा प्रतिकार करण्यासाठी पूर्वी होऊन गेलेल्या कित्येक पिढ्यापेक्षा आजच्या मानवी पिढीला दुपटीने अधिक गरज आहे. परंतु तत्कालिन लोकापेक्षा आजच्या पिढीला आत्मसंयमनाची शक्ति कमी आहे. या उत्तेजक पेयांच्या वासनेत जे गुंगून गेले आहेत त्यांनी आपल्या भ्रष्ट वासना व मनोविकार आपल्या मुलांना देऊन टाकल्या म्हणूनच अमितव्ययीपणाच्या सर्व प्रकारांचा प्रतिकार करणार्य अधिक मोठ्या नैतिकबळाची गरज आहे. या कामी एकच निर्धास्तीचा व धोपट मार्ग असा आहे कीं मिताहारला अगदी भक्कमपणे बिलगून राहावे आणि धोक्याच्या मार्गात पाऊलच घालू नये. CChMara 321.4
या विषयावरील नेमस्तपणाच्या बाबींमध्ये जर ख्रिस्ती लोकांनी आपली ज्ञानेंद्रियें जागृत ठेविली तर आपल्या घरच्या मेजावर सुरुवात करून आपल्या उदाहरणाने ज्याना आत्मसंयमन साधत नाहीं व भूकेची हाव आटोक्यात आणण्यास जे असमर्थ आहेत, अशांना मदत करिता येईल. ऐहिक जीवनांत ज्या संवयांच्या आम्ही आहारी गेलों आहों त्या आमच्या सार्वकालिक हिताच्या आड येत आहेत व आमचे सार्वकालिक जीवन नेमस्तपणाच्या कडक शिस्तीवर अवलंबून आहे असें जर आमच्या लक्षात आलें. तर खाण्यापिण्याच्या प्रकरण आम्ही कडक मिताहाराला चिकटून राहूं. आम्ही आमच्या उदाहरणाने व वैयक्तिक खटपटीनं असंयमाच्या अवनीतीपासून, गुन्हेगारीपासून आणि मरणापासून पुष्कळ आत्म्यांचा दबाव करूं शकू. आरोग्यकारक व शक्तीवर्धक अशीच जेवणे तयार करून इतरांच्या तारणप्राप्तीच्या महान कार्यात आमच्या भगिनींना पुष्कळ करिता येईल. आपल्या मुलांना खाण्यापिण्याच्या योग्य आवडीनिवडीचे शिक्षण देण्यांत, सर्व गोष्टींत त्यांना आत्मसंयमनाच्या संवयी लावून देण्यांत आणि स्वनाकार करून व परोपकार करून इतरांचे हित करण्याचे ज्ञान देण्यांत माताना आपला मौल्यवान् वेळ खर्ची घालता येईल. 23 CChMara 321.5
*****