कलीसिया के लिए परामर्श

261/318

तंबाखूचा धूर स्त्रियांना व मुलांना अपायकारक

चिलमीच्या व सिगारच्या धुरानें अगर ओढणाराच्या दुर्गंधयुक्त श्वासानें दूषित झालेली हवा स्त्रियांना व मुलांना गिळावी लागते. असल्या परिस्थितींत राहणार्‍यांची प्रकृति नेहमीच रोगीट राहील. 15 CChMara 319.9

फुफ्फुसांतून व त्वचाछिद्रांतून बाहेर पडणारी विषारी दुर्गंधीची लहान बाळ श्वासावाटें घेईल व त्यामुळे त्याची प्रकृति विषभरीत अशी होईल. जरी कांहीं अर्भकांवर हें विष मंदगतीने कार्य करील आणि त्याच्या मेंदूवर, हृदयावर, पित्ताशयावर व फुफ्फुसावर असा अधिक परिणाम करील कीं ती बालकें निस्तेज होतील, परंतु कांहीं अर्भकांवर असा मोठा आघात होईल कीं त्यांना झटके येऊ लागतील. अर्धांगवायु होईल व आकस्मिकपणे ती मरणाला बळी पडतील. तंबाखूचा दास बनलेल्या माणसाच्या प्रत्येक उच्छ्वासाने तो आपल्या सभोवारचे वातावरण दूषित करीत राहतो. 16 CChMara 320.1

गतपिढ्यांच्या आरोग्यविघातक व्यवहारनीतीचा आजच्या मुलांवर व तरुणांवर आघात होत आहे. मानसिक दुबळेपणा, शारीरिक अशक्तता, मज्जातंतुंचा गोंधळ आणि अस्वाभाविक आवडीनिवडी ह्या गोष्टी आईबापांकडून मुलांना वारसा म्हणून प्राप्त होतात. तीच संवयी मुलेंहि चालूं ठेवितात व अशा प्रकारे ही एक दुर्गुणांची परंपराच वाढत राहते. 17 CChMara 320.2