कलीसिया के लिए परामर्श

255/318

प्रकरण ५२ वें - देवाचें नातें मानवाशीं स्पष्ट राखा

मज्जातंतु शरीरघटनेत सर्वत्र बातम्या पुरवितात. मानवाच्या अंतर्यामांत दैवीज्ञान पोचविण्याचे कार्य ह्याच मज्जाततुकडून होतें. ह्या मज्जातंतूच्या जोरदार कार्य-प्रवाहात जर कांहीं विघ्न निर्माण झाले तर शरीरघटनेतील आवश्य त्या शक्ति दुबळ्या होऊन जातात व त्याचा परिणाम मानसिक ज्ञानेंद्रियांवर विधातक असा होतो. 1 CChMara 316.1

कोणत्याही प्रकारच्या असंयमनाने अवयांची ग्रहणशक्ति मंद होतें व त्यामुळे मज्जातंतूच्या शक्तींचा -हास होऊन सार्वकालिक गोष्टींची त्यांना आवड न वाटतां सर्वसाधारण गोष्टींकडेच त्या झुकल्या जातात. उच्च ध्येय ठेवण्यासाठी मनाच्या थोर शक्ति योजिलेल्या असतांना त्या हलकट मनोविकारांची गुलामगिरी करतात. आमच्या शारीरिक संवया योग्य नसल्यास आमच्या मानसिक व नैतिक शक्ति जोरदार राहूं शकत नाहीत कारण शारीरिक व नैतिक नात्यांत फार सहानुभूति नांदत असते. 2 CChMara 316.2

मानवजाति अधिकाधिक दु:खांत व दुर्दैवांत बुडालेल्या पाहून सैतानाला अत्यानंद होतो. ज्यांची प्रकृति निकोप आहे तें जशी देवाची सेवा आस्थेनें, चिकाटीने व शुद्ध मनाने करूं शकतात तशी ज्यांच्या सवया अयोग्य व ज्यांची शरीरें कोपित आहेत अशांच्याने ती करवत नाहीं, हें त्याला ठाऊक असतें. रोगीट प्रकृतीचा परिणाम मेंदूवर घडतो. मनानेच आम्ही देवाची सेवा करीत असतो. मस्त शरीर-साम्राज्याची राजधानी असतें. मानवजातीने वाईट सवयांच्या फदांत पडून स्वत:चा व एकमेकांचा नाश करावा अशा घातक कार्यातच सैतानाचा विजय असतो व अशा पद्धतीने देवाची घडणारी सेवा तो त्याजपासून झुगारुन घेतो. CChMara 316.3

मानवजाति आपल्या कह्यांत आणण्यासाठी सैतान निरंतर जागत असतो. मानवावर जर कोठे त्याचा भरभक्कम ताबा असेल तर तो भुकेच्या मार्गातच असतो व त्या भुकेलाच तो हरएक मागने चेतवीत असतों. 3 CChMara 316.4