कलीसिया के लिए परामर्श

253/318

स्थानिक परिस्थिति विचारांत घेणें

खादाडपणा व अनेमस्तपणा याविरुद्ध मोहीम करत असताना मानव जात कसल्या परिस्थितीला बळी पडलेली आहे, हें आम्हीं लक्षात घेतले पाहिजे. जगांतील भिन्न भिन्न देशात राहणार्‍य लोकांसाठी देवाने तरतुदी करून ठेवलेल्या असतात. देवासह जे कामकरी होऊ इच्छितात. त्यांनी कोणते अन्न खावे व कोणते खाऊं नये हें स्पष्ट करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. जनतेशी आम्हांला समरस व्हावयाचे असतें. परिस्थितीला लागू पडणार नाहींत अशीं अति कडक आरोग्य-सुधारणा तत्त्वे लादल्याने हितापेक्षा अहितच अधिक होईल. गरीब लोकांना शुभवर्तमान गाजविताना मला असें सांगण्यांत आलें आहे कीं चागले शक्तिदायक अन्न खात जा असें त्यास शिकविण्यात यावे. CChMara 313.4

“अडीं अगर दृध अगर मलई खाऊं नका. अन्न तयार करतांना लोण्याचा उपयोग करूं नका.” असें मला सांगता येणार नाहीं. गोरगरीबांना शुभवर्तमान दिलेच पाहिजे, परंतु अन्नाच्या तयारीविषयी त्यांना कडक सूचना देण्याची वेळ अद्यापि आलेली नाहीं. CChMara 313.5