कलीसिया के लिए परामर्श

250/318

“सर्व देवाच्या गौरवासाठीं करा ”

अन्नाच्या प्रकरणी आम्ही कांहीं नक्कीच दिशा दाखवीत नाही पण एवढे मात्र आम्ही सांगतों कीं ज्या देशात भरपूर फळफळावळे, कडधान्ये, कठीण कवचाचीं फळें आहेत त्या ठिकाणीं देवाच्या लोकांसाठीं मांसाहार में कांहीं योग्य अन्न नाहीं. त्या खाद्याने विषयवासनेकडे कल जातो, प्रत्येकाला जे प्रेम व सहानुभूति दाखवायची ती स्त्रीपुरुषांपासून हिरावून घेतली जाते आणि उच्च मनोविकार हलकट मनोविकाराच्या पायाखाली येतात, असें मला सांगण्यांत आलेले आहे. मास - खाद्य कधीं तरी आरोग्यकारक झाले असेल पण तें आज निर्विघ्न असें वाटत नाहीं. ह्या खाद्याने कॅन्सर, ग्रंथीरोग, फुफ्फुसाचे विकार फार मोठ्या प्रमाणात उद्भवतात. CChMara 311.2

विश्वासाच्या कसोटीसाठी मांसाहाराचा उपयोग करावयाचा नाही, परंतु जे स्वत:ला विश्वासणारें (ख्रिस्ती) म्हणतात त्याचे इतरांवर कसे काय वजन पडते, याचा आम्हीं विचार करावयास पाहिजे आहे. देवाचे सदेशवाहक म्हणून आम्हीं लोकांस सांगू नये काय ? “तुम्हीं खाता पिता किंवा जे कांहीं करिता तें सर्व देवाच्या गौरवासाठीं करा.” १ करिंथ १०:३१ भ्रष्ट भुकेच्या फंदाविरुद्ध आम्ही नक्कीच निवेदन करुं नये कीं काय ? जे शुभवर्तमानाचे प्रवर्तक आहेत व मर्त्य मानवांना पूर्वी कदापि मिळालेली नव्हती अशा शुभवातेची धोषणा जे करितात, अशांनी मिसरी मांसाहाराकडे परत जाऊन तसलें उदाहरण जनतेपुढे मांडावे कीं काय? देवाच्या भांडारांतील दशाशावर जे जगत आहेत त्यांनीं भ्रष्टान्न खाऊन शिरशिरांतून तें विषारी प्रवाह वाहू द्यावेत कीं काय? त्यांस देवाने दिलेला प्रकाश व त्यानें दिलेले इशारे त्यांनीं झुगारून द्यावेत कीं काय? CChMara 311.3

कृपेमध्यें वाढ व्हावी व समतोल शील प्राप्त व्हावे म्हणून शारीरिक आरोग्य महत्त्वाचें गणले जाते. जर पोटाची योग्य प्रकारे काळजी घेतली नाही तर योग्य व नैतिक स्वभाव बनण्यास अडखळण येते. मज्जा व मज्जातंतु पोटाशी समरस असतात. चुकांच्या खाण्यापिण्याने चुकीची विचारसरणी व चुकीची वागणूक बनते. CChMara 311.4

आतां सर्वांची कसोटी व पारख होत आहे. आम्ही ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा पावलेले आहोत जे आम्हांला खालीं खेचते व जे करूं नये तें करावयास लाविते तें टाळण्याचा जर आम्हीं आपला भाग केला तर ख्रिस्तामध्ये वाढण्यास आम्हांला सामर्थ्य मिळेल कारण तो आमचा जिवंत अधिपति आहे व आम्हांला देवाकडून मिळणारें तारण पाहावयास मिळेल. CChMara 311.5

आरोग्यकारक जीवनाची तत्त्वे आम्हांला समजून येतील तेव्हाच मात्र अयोग्य प्रकारच्या अन्नाचे दुष्ट परिणाम पाहण्यास आम्ही संपूर्णत: जागृत होऊं आपल्या चुका ध्यानात आल्यावर संवया बदलण्याचें ज्यांच्या अंगी धैर्य आहे. त्यांना असें कळून येईल कीं सुधारणा - कार्यासाठी धडपड करावी लागते व पुष्कळ चिकाटी धरावी लागते. पण एकदा चांगली अभिरुचि जडली म्हणजे त्यांना कळून येईल कीं पूर्वी जे अन्न आपल्याला निरुपद्रवी वाटत होतें, तें हळहळू पण नक्कीच अपचनाचा व अवांतर आजारांचा पाया घालीत होते. CChMara 311.6

पित्यांनी व मातानों, प्रार्थना करीत राहा. फाजील आहाराच्या कोणत्याही स्वरुपाविरुद्ध कडक सावधगिरी घ्या. अस्सल आरोग्य सुधारणेची तत्त्वे आपल्या मुलांना शिकवी, आरोग्यसंरक्षणासाठी कोणकोणत्या गोष्टी टाळाव्यात हें त्यास दाखवून द्या. आज्ञाभंगी मुलांवर (पिढीवर) परमेश्वराचा कोप सुरूही झालेला आहे. कसले गुन्हें, कसलीं पायें, व कसले अन्यायी व्यवहार सर्वत्र उघडकीस येत आहेत ! मानव म्हणून आम्ही आपल्या मुलांना नीतिभ्रष्ट संगतीपासून दूर ठेविले पाहिजे. CChMara 312.1