कलीसिया के लिए परामर्श

246/318

अन्नांतील फेरबदल विषयांचे शिक्षण

स्नायूंची सुदृढता मांसाच्या खाद्यावरच अवलंबून असतें अशी कल्पना चुकीची आहे. तसल्या खाद्याव्यतिरिक्त आमच्या प्रकृतिमानाच्या गरजा अधिक चांगल्या रितीने भागविता येतील आणि अधिक तजेलदार आरोग्य राखिता येईल. चागले रक्त साध्य करण्याच्या कामीं अवश्य लागणारी सर्व द्रव्ये अन्नधान्यांत, फळफळावात आणि भाजीपाल्यांत भरपूर असतात. ही द्रव्ये मांसाहारात इतकी चांगली व भरपूर नसतात. आरोग्यासाठी व शक्ति वर्धनासाठी तें खाद्य जर अवश्य असतें तर प्रारंभींच त्या योजनेचा समावेश केला असता. CChMara 306.3

मांसमय खाद्य जर बंद केले तर अशक्तता वाटते व तजेला राहात नाही अशीं एक चुकीची भावना मनात वारंवार येते. यावरून मांसखाद्य आवश्य आहे असा पुष्कळांचा जोरदार दावा असतो. परंतु त्याचे कारण असें असतें कीं असल्या खाद्यामध्ये एक प्रकारची चेतना असतें व रक्ताला गरम करून ती मज्जांततूमध्ये तरतरी आणिते; ही गोष्ट त्या लोकांना एरवी मिळत नाहीं ज्याप्रमाणे एखाद्या दारूड्याला दारू सोडून देणे, जिवावर येते, परंतु ह्या फेरबदलाने त्याचे अधिक हितच होईल. CChMara 306.4

मांसाहार सोडून दिला म्हणजे त्याच्या जागी अन्नधान्ये, भाजीपाला व फळफळावळ याचे निरनिराळे शक्तिकारक वे भूकसवर्धक प्रकार करण्यांत यावेत. ज्यांची प्रकृति अशक्त आहे व ज्यांना सारखे परिश्रम करावे लागतात अशासाठीं यांची विशेष गरज असतें. 16 CChMara 306.5

जेथें मासाचे खाद्य हा जेवणाचा मुख्य भाग नसतो तेथें विशेषत: चागल्या स्वयपाकांची मोठी आवश्यकता असतें. मांसाच्याऐवजी दुसरे पदार्थ तयार केले पाहिजेत व तें असें चागले करण्यांत यावेत कीं, मासाची आठवण होणार नाहीं. 17 CChMara 306.6

मांसाहाराच्या जागीं अगदी दुबळे अन्न तयार करणारी कुटु माझ्या परिचयाची आहेत त्याचे अन्न इतके निकस असतें कीं, तें पोटाला अगदी नकोसे असतें. तेव्हां आरोग्यांतील सुधारणा आम्हांला संमत नाही असें त्यांनी मला सांगितलेले आहे. कारण त्यामुळे आमच्यांत अशक्तताच वाढत आहे. स्वयपाक साधाच का होईना. पण तो असा चटकदार असावा कीं त्यात भुकेची वाढच होत राहावी. 18 CChMara 307.1

प्रभु आपल्या अविशिष्ट मंडळीला त्याच्या हितासाठींच असा सल्ला देत आहे कीं, मांसाहार, चहा, कॉफी व अवातर अन्न सोडून द्यावीत. हितकारक व चागल्या अशा अनेक गोष्टी आहेत कीं त्यावर आम्हांला चागल्या प्रकारे जगता येईल. CChMara 307.2

प्रभुच्या आगमनाची जे वाट पाहात आहेत त्यांनी आपला मांसाहार काढून टाकावा. आपल्या अन्नांतील मास खाद्य बंद करावे हाच एक उद्देश आम्हीं निरंतर पुढे ठेवावा व तो साध्य करण्याचा एकसारखा प्रयत्न करावा. 19 CChMara 307.3

मांस भक्षणाने बौद्धिक, नैतिक व शारीरिक शक्ति दबल्या जातात. मांसाहाराने एकंदर प्रकृतिमान बिघडते, बुद्धींत गोंधळ होतो व नैतिक चेतना बोथट होतात. प्रिय बंधुभगिनींनो आम्ही तुम्हांला असें सांगत आहो कीं, मांसाहार वर्क्स करावा, हाच तुमचा अत्यंत सुरक्षित जीवनक्रम आहे. 20 CChMara 307.4

*****