कलीसिया के लिए परामर्श

237/318

अति मसालेदार अन्न

व्यवहारिक प्रपच्यात गाठलेल्या लोकांना भरपूर मसाला मिश्रिम अन्न आवडते, पण पचनक्रियेसाठी तें घातक असतें. 13 CChMara 298.6

या जलद धावणाच्या युगात जेवण जितकें कमी चेतनाकारक तितकें अधिक बरें. मसाले स्वभावत:च अपायकारक असतात. मोहरी, मिरीं, मसाले, लोणचीं व अशा प्रकारची दुसरीं द्रव्य पचनक्रियेला चेतना देतात व रक्त संतप्त व अशुद्ध करतात. मद्यपानाचा परिणाम म्हणून दारूड्याच्या जठरावर आघात होतो हें उदाहरणार्थ लक्षात आणावे. अति मसालेदार अन्नसेवनाने असेच घडून येते. लवकरच साध्या जेवणाने भुकेची तृप्ति होत नाहीं, शरीर-घटनेला कांहीं तरी उणे उणे भासू लागते. अधिक उत्तेजनदायी जेवणासाठीं चुटपुट लागलेली असतें. 14 CChMara 298.7

कित्येकांना तर इतकी चटक लागलेली असतें कीं जे पाहिजे तें अन्न मिळाले नाही तर जेवणावरचे त्यांचे मनच उडून जाते. मसालेदार अन्न त्यांच्यापुढे आलें नाहीं तर आपल्या पोटाने हा चिडखोर चाबूक चालवावा असें त्यांस वाटते; कारण तसल्या व प्रकारची वागणूक त्याला दिलेली असतें म्हणून चेतनाविरहित अन्न त्यांना चालत नाहीं. 15 CChMara 298.8

कोठ्यावरच्या नाजूक पापुद्रयावर प्रथमत: मसाले आघात करितात परंतु शेवटी त्या नाजूक पडद्याची नैसर्गिक चेतना तिचा तें नाश करून टाकतात. रक्तात उष्णता वाढते व वैषियीक भावनाकडे कल जातो, नैतिक व बौद्धिक शक्ति दुर्बळ होतात व हीनकस मनोविकारांचे दास्यत्व पत्करतात. मातेने आपल्या कु ढे साधे पण शक्तिवर्धक अन्न सादर करण्याचा चागला विचार करावा. 16 CChMara 298.9