कलीसिया के लिए परामर्श

234/318

प्रकरण ४९ वें - आम्ही खातों तें अन्न

आमच्या अन्नावरून आमच्या शरीराची घडण होत असतें. शरीरातील पेशीची निरंतर मातोड होत असतें. प्रत्येक अवयवाच्या एक हालचालींत नादुरुस्तीची होत असतें व अन्नाच्याद्वारे ही नादुरुस्ती भरून काढली जाते. शरीरातील प्रत्येक अवयवाला त्याचा आहार द्यावयास पाहिजे. मेंदला मेंदचे पोषण, अस्थि, स्नायू व मज्जातत् यांची पोषण तत्त्वे दिली पाहिजेत. अन्नापासून रक्त कसे बनले जाते व तें रक्त शरीरातील भिन्न भिन्न अवयवास कसे पोषक असतें, ही एक अद्भुत घटना आहे. परंतु ही घटना निरंतर चालूं असतें व प्रत्येक मज्जातंतूला, स्नायूला आणि शरीरपेशीला जीवन व शक्ति पुरवित राहते. CChMara 296.1

शरीर पोषणासाठी उत्कृष्ठ पुरवठा मिळेल अशाच अन्नाची निवड करण्यांत यावी. भूकेवरून अन्नांची निवड करण्यांत येऊ नये. कारण खाण्यापिण्याच्या अयोग्य संवयामुळे भुकला भलतेच वळण लागलेले असतें. जे अन्न प्रकृतीला विघातक होईल व सशक्ततेच्या ऐवजी अशक्तता आणील असलेच अन्न भुकेला पाहिजे असतें. जमातीच्या चालीरितीने निर्विघ्नपणे मान्य करिता येत नाहींत. अन्नप्रकरणीं सर्वमान्य चुकांचे (दोषाचे) अवलंबन केल्यामुळे सर्वत्र पसरलेले आजार व अडचणी दिसून येतात. CChMara 296.2

परंतु जरी सर्व अन्ने एकंदरीत हितकर असली तरी ती सर्व प्रसगासाठी सर्वच गरज भागविणारी नसतात. अन्नाची निवड करण्यांत सावगिरी बाळगली पाहिजे. काळमानाला, हवेला व आपण करितों त्या धंद्याला उपयुक्त असेच अन्न योग्य असतें. एका काळीं व एका प्रकारच्या हवेमध्ये जे अन्न इष्ट असतें, तें दुसर्‍य काळी व दुसन्या हवेत तसे नसते. म्हणजे निरनिराळ्या धंदाव्यवसायामध्ये असलेल्या लोकांना निरनिराळ्या प्रकारचे अन्न लागू पडते. शारीरिक परिश्रम करणाच्या लोकांना जे अन्न हितकारक असतें तें बहुधा बैठे काम करणार्‍यना व मानसिक श्रम करणार्‍यांना हितकर नसते. परमेश्वराने आरोग्यकारक अन्नाचे भिन्न भिन्न असें भरपूर प्रकार आम्हांला दिलेले आहेत. अनुभवाने आणि सुविचाराने आमच्या गरजासाठी जें उत्कृष्ट आहेत, तेच आम्ही निवडून घ्यावेत. 1 CChMara 296.3