कलीसिया के लिए परामर्श

232/318

सध्यांची आरोग्य सुधारणा

आमच्या सेवाकार्यांत मद्यपानाविषयक सुधारणेकडे अधिक लक्ष पुरवावयास पाहिजे आहे. जेथे कोठे सुधारणा घडवून आणण्याचे कर्तव्य आहे, तेथें प्रत्येक कर्तव्यात पश्चात्ताप, विश्वास व आज्ञांकितपणा यांचा संबंध येतो. मनाची नवीन व अधिक थोर जीवनात प्रगति हाच त्याचा अर्थ होतो. याप्रकारे प्रत्येक निर्भेळ सुधारणेचा तिसर्‍य दूताच्या संदेशांत अश आलेला आहे. आमच्या कॅप मिटींग्जमध्ये (शिबीरामध्ये) आम्ही या कार्याकडे लक्ष वेधून तो एक जिव्हाळ्याचा प्रश्न करावा. मद्यपानानिषेधाची निर्भेळ तत्त्वे विषद करून प्रतिज्ञा पत्रिकेवर सह्या घ्याव्यात. दुर्व्यसनाचे जे गुलाम झालेले आहेत त्यांच्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावयास पाहिजे. आम्हीं अशांना क्रूसापुढे सादर करावें. CChMara 291.6

जसजसे आम्ही काळाच्या अखेरीस येऊन ठेपत आहों, तसतसे आरोग्यविषयक सुधारणेच्या आणि ख्रिस्ती मितव्ययीं जीवनांत वरवरची पायरी गांठून तो प्रश्न अधिक निश्चितपणे व ठराविक पद्धतीने पुढे ठेविला पाहिजे. केवळ आमच्या जिव्हेनेच नव्हें त तर उदाहरणाने लोकांना नेहमी शिक्षण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एकत्रित शिक्षणाचे व व्यवहाराचे परिणामकारक वजन पडतें. 8 CChMara 292.1