कलीसिया के लिए परामर्श

228/318

प्रकरण ४७ वेंb - नेमस्त जीवनासाठीं आव्हान

आरोग्य हा एक मौल्यवान आशीर्वाद आहे. त्याचा सदसद्विवेकाशी व धर्माशी किती अधिक निकटचा संबंध असतो, हें पुष्कळांच्या ध्यानीं येत नाही. सेवा-कार्यांत त्याची कार्यक्षमता फार मोठी असल्यामुळे शील संरक्षणाची जितक्या दक्षतेने सावधगिरी ठेवण्यात येते तितकीच आरोग्यविषय बाळगली पाहिजे कारण आरोग्य जितकें अधिक संपन्न असेल तितकें अधिक कार्याच्या प्रगतीसाठी आणि मानवतेच्या आशीर्वादासाठी आमचे परिश्रमही अधिक संपन्न होऊ शकतील. 1 CChMara 288.1

डिसेंबर १०, १८७१ : मध्ये मला दाखविण्यांत आलें कीं प्रभूच्या आगमनासाठी लोकांची सिद्धता करण्याचे जे महान कार्य आहे त्यापैकी आरोग्यविषयक सुधारणा ही एक शाखा आहे. ज्याप्रमाणे हाताचा व शरीराचा अविभाज्य संबंध आहे तसेच तें सुधारणा कार्य तिसर्‍य देवदूताच्या संदेशाशी संघटित आहे. मानवाच्या दृष्टीने नियमशास्त्रांतील दहा आज्ञा तुच्छ गणण्यांत आलेल्या आहेत, परंतु प्रथमत: इषाच्याचा संदेश दिल्याशिवाय प्रभू आज्ञांचे उल्लघन करणान्याना शासन द्यावयास प्रगट होणार नाहीं. ह्याच संदेशाची घोषणा तिसरा दूत करीत आहे. मानवजातीने जर दहा आज्ञाचे पालन केले असतें व त्याच्यातील नियमबधने आपल्या जीवनचरित्रात रुळविल असती तर जगांत आजार विकारांचा दिसून येणारा सुळसुळाट हा शाप दिसून आला नसतां. CChMara 288.2

नीतिभ्रष्टतेच्या आणि विकार-वासनांच्या धुदींत गुग राहन आम्ही नैसर्गिक नियमांचे उल्लघन करीत नाहीं असें स्त्री-पुरुषांना म्हणता येणार नाही व तें करून आम्ही ईश्वरी आज्ञा अवमानित नाही असेहि नाही. म्हणून आरोग्यशास्त्राच्या सुधारणेतून सिद्ध होत असलेला प्रकाश आमच्यापुढे ठेवण्यात येत आहे. अशासाठीं कीं ज्या बंधनांनी आमचे अस्तित्व बद्ध झालेले आहे त्याचे उल्लघन करण्याचे पाप आम्हांला दिसून यावे. आम्ही निसर्गाचे कानूकायदे पाळतों कीं उल्लघतो, हें आम्ही पाहून घेतले तर आमच्या सुखदु:खाचे कारण काय हें आम्हांला कळून येईल. काहीजण समजून उमजून व पुष्कळजण अज्ञानाने ईश्वराने आम्हांला घालून दिलेल्या बंधनांचे उल्लघन करितात आणि आमची ही दुःस्थिति आमच्या कृपावंत स्वर्गीय पित्याला दिसून येते. मानवांवरील आपल्या प्रीतीने व कळवळ्याने तो आमच्या आरोग्याच्या सुधारणेसाठी आम्हापुढे प्रकाश पाडितो. कानुकायद्यांचे प्रसिद्धिकरण होतें व उल्लंघन करणार्‍यांना शासन कार्य हें दर्शविले जाते. अशासाठीं कीं सर्वांनी निसर्गाच्या कानूकायद्याप्रमाणे काळजीपूर्वक सुसंगत राहण्याचे शिकावें. ज्याप्रमाणे एकादी डोंगरावरील नगरी स्पष्ट दृष्टोत्पत्तीस येते, त्याचप्रमाणें एखादी परमेश्वर आपले धर्मशास्त्र अगदी स्पष्ट आणि ठळक रीतीने प्रसिद्ध करितो. पाहिजे असेल तर सर्व समजदार माणसांना तें समजून येईल, वेड्यांना मात्र तें कळावयाचें नाहीं हे धर्मशास्त्र स्पष्ट करणे व त्याच्या पालनाचा आग्रह करणे हें तिसर्‍य दूताचे कार्य आहे कारण त्याच्याच सदेशांतून लोकांनी प्रभूच्या आगमनासाठीं सिद्ध व्हावे असें सांगण्यांत आलेले आहे. 2 CChMara 288.3