कलीसिया के लिए परामर्श

221/318

अति लहान असतां मुलांना शाळेंत घालण्याचें धोके

एदेनातील रहिवाशांना निसर्गाच्या ग्रंथांतून ज्ञान मिळाले. मोशेला अरेबियन पठाराकडून व डोंगराकडून शिक्षण मिळाले, येशूबाळाला नासरेथ जवळील डोंगर - टेंकड्यांनी ज्ञान दिलें, त्याप्रमाणें आमच्या मुलांनी ख्रिस्तापासून शिकून घ्यावे. दृश्यापासून अदृश्याची कल्पना येते. CChMara 281.5

मुलांच्या अगदीं बाळपणापासून शक्य असेल तर हा अद्भूत पाठ्यग्रंथ उघड करून ठेवलेला असावा. 28 CChMara 282.1

फार लहानपणीच मुलांना शाळेला पाठवू नका. आपल्या मुलाचे मन दुसर्‍याच्या हस्ते योग्य सांच्यात कसे काय पडेल, याविषयी मातेने खबरदारीने विचार करावयास पाहिजे. मुलें आठदहा वर्षांची होईपर्यंत आईबापच त्यांचे अत्यत्तम शिक्षक होत. खरे असलेले उघडे मैदान हें त्याचे शालागृह आणि निसर्गातील संग्रह हेच त्यांचे पाठ्यपुस्तक त्यांची मने जितक्या झपाट्यानें आकलन करूं शकतील तितक्या प्रमाणात आईबापानी ईश्वराचा निसर्ग-ग्रंथ त्यांच्यापुढे उघडा करीत राहावा. तसल्या परिस्थितीत त्यांना दिलेले धडे लवकर विसरले जाणार नाहींत. 29 CChMara 282.2

अगदीं लहानपणीच शाळेत टाकल्याने मुलाची शारीरिक व मानसिक प्रकृति धोक्यांत येईल एवढेच नव्हें तर तीं नैतिक दृष्टिकोणाला अंतरतील जी मुलें चांगल्या शिष्टाचारांत वाढलेली नसतात त्यांच्याशी परिचित होण्याची संधि त्यांना मिळेल. त्यांना अशा काहीं उर्मठ व आडमुठ्या संगतीत ढकलून देण्यांत येते कीं, तेथें लबाडी, खोट्या शपथा, चोरी व फसवणूक प्रचलित असतील आणि आपणाहून लहान असलेल्यांना स्वत:च्या दुर्गुणांत ओढून घेण्यांत त्यांना मजा वाटेल. लहान मुलांना त्याच्याच मार्गाने जाऊ दिलं तर सद्गुणापेक्षां दुर्गुणच ती अधिक लवकर उचलतात. ऐहिक स्वभावधर्माला वाईट सवया अधिक आवडीच्या वाटतात आणि बाळपणीं जें कांहीं तीं पाहातात व ऐकतात त्याचा त्यांच्या मनावर चांगला ठसा उमठला जातो. त्यांच्या बाल अंतर्यामात पेरलेले वाईट बीं रुजले जाते व तें वाढून आईबापाच्या अंत:करणाना तीव्रपणे बोचणारी कुसळेच वाढतात. 30 CChMara 282.3