कलीसिया के लिए परामर्श
मंडळीची जबाबदारी
रात्रींच्या वेळी एका भल्या मोठ्या बैठकीपुढे शिक्षण या विषयावर खळबळ उडालेली दिसत होती व त्या बैठकीला मीही हजर होतें. आमचा एक दीर्घ अनुभवी गुरुजी ती चालवीत होता. त्याचे असें म्हणणे पडले कीं, “आमच्या संबंध सेव्हन्थ-अॅडव्हेंटिस्ट मंडळीने शिक्षण या विषयांत विशेष मन घालावयास पाहिजे.” CChMara 276.2
मुलांना शिक्षण व वळण लावण्याचे विशेष कार्य मंडळीकडे आहे. शाळेत अगर दुसर्य एकाद्या विचारसंगतींत मुलें असतांना त्यांना भ्रष्ट संवयाचा संपर्क न होऊ देणे, हेच तें कार्य होय. अन्यायाने हें जग भरलेलें असून देवाच्या सत्तेला तें झुगारून देते. शहरातील वातावरण तर सदोम नगरीप्रमाणे झालेले असून अनेक त-हेच्या दुष्ट मार्गात रोज रोज आमची मुलें वावरत असतात. आमच्या मुलांची होत आहे त्यापेक्षा अधिक गबाळ झालेल्या मुलांशी त्यांचा सार्वजनिक शाळांमधून सहवास धडतो व ह्या शाळांतील सोबत्याशिवाय रस्त्यातून फिरणाच्याशींसुद्धा त्यांचा सबध येतो व त्यांच्याकडून त्यांना काहीं ज्ञान मिळते. तरुणाच्या मनावर सहजासहजीं सस्कार घडून येतात व योग्य प्रकारचे वातावरण जर त्याच्यासाठीं तयार केले नाही तर असल्या मोकार झालेल्या मुलांनी अधिक काळजीपूर्वक वळण दिलेल्या मुलांना अंकित करण्यासाठी सैतान याचा उपयोग करितो. या प्रकारे शब्बाथ पाळणाच्या आईबापांच्या स्वप्नांत येण्यापूर्वीच त्यांच्या मुलांना नीतिभ्रष्टतेचे शिक्षण दिले जाते व त्यांची ती लहान मुलें भ्रष्ट होऊन जातात. 7 CChMara 276.3
मुलांना सुशिक्षण देण्याच्या उद्देशाने पुष्कळशी कुटुंबे मोठमोठ्या शाळांकडे त्यांना घेऊन जातात. परंतु र्ती आहेत त्याच ठिकाणी राहिल्यास त्यांना आपल्या गुरुसाठी अधिक चांगली सेवा करिता येईल. आपल्या स्वत:च्या मंडळींने शाळा काढण्याची चालना द्यावी. तेथेच आपल्याजवळ ठेवून मुलांना सर्व प्रकारचे व्यवहारिक ख्रिस्ती शिक्षण देण्याची तरतूद करण्यांत यावी. लहान लहान मंडळ्या असलेल्या ठिकाणीच राहणे त्याच्या मुलांसाठीं, खुद्द त्यांच्यासाठी व देवाच्या कार्यासाठी फार अधिक हितावह असें होऊन जाईल, या ठिकाणी त्याच्या साहाय्यची गरज पडेल. परंतु जर र्ती कुटुंबे मोठमोठाल्या मंडळ्याकडे गेली, तर त्यांची त्या ठिकाणीं गरजही भासणार नाहीं व आत्मिक शिथिलतेचा मोह वारंवार झडप घालीत राहील. 8 CChMara 276.4
जेथें कोठें शब्बाथ पाळणारी कुटुंबे थोडीशींच का असेनात त्यांनी एकत्र होऊन मुलांच्या व तरुणाच्या शिक्षण-सोईसाठी शाळा उघडावी व ख्रिस्ती शिक्ष ठेवावा. तो तर समर्पित झालेला मिशनरी मनाचा असावा व मागेपुढे मुलें मिशनरी होतील असें शिक्षण त्यानें द्यावे. जगासाठी नव्हें परंतु देवासाठी आम्ही आमची मुलें वाढवू असा पवित्र करार आम्हीं देवाशीं केलेला आहे. जगाच्या हातांत हात घालून जगावयाचे नाही तर देवावर प्रीति करावी, त्याचे सभय धरावे व त्याच्या आज्ञा पाळाव्या, हेच शिक्षण त्यांस द्यावयाचे असतें. उत्पन्नकर्त्यांच्या प्रतिमेप्रमाणेच त्यांना बनविण्याचे आहे व त्याचा नमुना ख्रिस्त ह्याप्रमाणेच त्यांना व्हावयाचे आहे, हाच विचार त्यांच्या मनात ठसवायचा आहे. ज्या शिक्षणातून तारणाचे ज्ञान देता येईल व त्यांचे जीवन व त्यांचा स्वभाव दैवी स्वरुपाचा होईल त्या शिक्षणाकडे मोठ्या आस्थेनें लक्ष पुरवायास पाहिजे. 9 CChMara 277.1
कामकर्याचा पुरवठा करता यावा म्हणून भिन्न भिन्न देशांतून शिक्षणकेंद्रे उपस्थित करण्यांत यावीत अशी देवाची इच्छा आहे. या शिक्षणसंस्थांतून होतकरु विद्याथ्र्यांना व्यवहारिक ज्ञानशास्त्राचे व पवित्रशास्त्रांतील सत्याचे शिक्षण देण्यांत यावे. ही मंडळी कामाला लागली म्हणजे नवीन प्रदेशात सत्याच्या प्रगटीकरणाला तो स्वरुप देऊ शकेल. CChMara 277.2
आमच्या जुन्या मिशनरी कॉन्फरन्सकडून मिशनरी म्हणून परदेशी जाणान्यांना जे शिक्षण द्यावयाचे त्याशिवाय जगांतील वेगवेगळ्या देशातील लोकांस आपल्या देशबांधवांमध्ये व शेजाच्यामध्ये काम करण्यास उपयोगी पडेल असेही शिक्षण देण्याची आवश्यकता आहे आणि शक्य तों ज्या प्रदेशी त्यांना श्रम करावयाचे त्याच प्रदेशांत शिक्षण देणे तें अधिक सोईस्कर व सुरक्षितपणाचे होऊन जाईल. आपल्या शिक्षणाप्रित्यर्थ दूर देशी जाणे, हें त्या कामगारासाठी वे कार्याच्या प्रगतीसाठी क्वचितच चांगले होईल. 10 CChMara 277.3
मंडळी म्हणा अगर व्यक्ति म्हणा जर न्यायाच्या दिवशी निर्दोष म्हणून आम्हांला सिद्ध व्हावयाचे असेल तर आमच्या तरुणांना द्यावयाचे वळण अधिक थोर परिश्रमानी द्यावयास पाहिजे आहे. अशासाठीं कीं जें महान कार्य आमच्याकडे सोपविण्यात आलेले आहे त्यांच्या भिन्न बाजूंत त्यांनी अधिक लायक असें तयार व्हावे. आम्ही अशा कांही सूज्ञतेच्या बेत योजना आखाव्यात कीं त्यांत बुद्धिवान तरुणांची चतुर मनें अधिक सबळ, शिस्तशील आणि सुसंस्कृत होतील. या प्रकारे ख्रिस्ताच्या कार्यासाठी चतुर कारागीरांच्या कमतरतेमुळे अडखळण होणार नाहीं. ती मंडळी तर मोठ्या आवेशाने व निष्ठेने आपले सेवाकार्य तडीस नेईल. 11 CChMara 277.4