कलीसिया के लिए परामर्श
हेवा व दोष काढणें
मंडळीच्या सभासदांमध्ये असत्य वदणाच्या जिव्हा आहेत हें सांगण्यास मला द:ख वाटते. खोडसाळपणावरच जगणाच्या खोट्या जिव्हा असतात. कावेबाज व कुजबुजणाच्या जिव्हा असतात. टवाळखोर, मग्रुरपणे लुडबुडणाच्या व कुशलतेनें निंदा करणाच्या जिव्हा असतात. गप्पीदासामध्ये काहींना जिज्ञासेमुळे, कांहींना मत्सरामुळे व पुष्कळांना देवाच्या सांगण्यावरून केलेल्या निषेधाबद्दल वाटत असलेल्या द्वेषामुळे बडबड करण्याचे प्रोत्साहन मिळत असतें. हें सर्व विसंगत व्यवहार चालूं असतात. काहींजण आपली वास्तविक मनोवृत्ति छपवून ठेवितात, तर काहीजण आपणाला माहीत असलेले उघड करण्यास उत्सुक असतात अगर कांहींजण सशयाने दुसर्याच्या विरुद्ध अपायकारक बातम्या उठवितात. CChMara 244.4
सत्याचें असत्य करावे, चांगल्याला वाईट बनवावे आणि निरपराध्याला अपराधी ठरवावें असल्या खोट्या व्यवहाराची प्रत्यक्ष वृत्ति आज जोरीने चालूं आहे, हें मी पाहिलेले आहे. देवाच्या मान्य केलेल्या मंडळीच्या ह्या अवस्थेवरुन सैतानाला अत्यानंद होत आहे. आपल्या स्वत:च्या आत्म्याची निष्काळजी करून दुसर्यवर टीका करावी व त्याचे दोष काढावेत याची आस्थेने वाट पाहणारे पुष्कळजण आहेत. सर्वांच्या स्वभावात दोष आढळून येतात तरी त्यांच्या नुकसानीला मत्सरबुद्धिच कारणीभूत असतें, हें शोधून काढणे फारसे अवघड नसते. हें आत्मनियोजित न्यायाधिश काय म्हणतात तें पाहा “हें पाहा, आम्हांजवळ पुरावे आहेत, त्यांवर आधारलेल्या दोषांपासून त्यांची सुटका होणे शक्यच नाहीं.” तें सधि शोधीतच असतात. वेळ आली कीं आपल्या थापाचे गाठोडे उघडून आपल्या मनपसंतीच्या गोष्टी ओकीत राहातात. CChMara 245.1
एखादा मुद्दा सिद्ध करितांना जे स्वभावात: मोठे तर्कट असतात, तें स्वत:ला तरी फसवतील किंवा दसर्यांना तरी फसवितील. दसरा बोलत असतांना त्याचे बेसावधपणाचे शब्द जुळवून घेतील. तें घाईघाईने तोंडातून निघाले असतील व त्यावरून बोलणाराच्या मनातील वास्तविक अर्थहि तो नसेल परंतु विचार न केलेले शब्द कदाचित् क्षुल्लक किंवा मनावर न घेण्यसारखेहि असतील, परंतु सैतानाच्या दृष्टीने त्यांना भले मोठे स्वरुप देऊन त्यांचे चर्वितचर्वन करून व बकवा करून राळ्याचा थाळा करण्यांत येतो. CChMara 245.2
दुसर्याच्या शिलावर शिंतोडे पडतील अशी सर्व उडत्या गप्पा एकत्र कराव्या आणि त्याचा बोभाटा करून त्याच्या विघ्नांत संतोष मानावा हें ख्रिस्तीपणाचे लक्षण होईल काय ? ख्रिस्ताच्या अनुयायांची बेअब्रु किंवा नुकसान झाले तर सैतानाला अत्यानंद होतो. “आमच्या बांधवांना दोष लावणारा” तो आहे. त्याच्या खटपटींत ख्रिस्ती लोकांनी साहाय्यभूत व्हावे कीं काय? CChMara 245.3
देवाच्या सर्वसाक्षी, दृष्टीला सर्वांचे दोष व प्रत्येकाचा प्रमुख मनोविकार उघडा असतो, तरी तो आमच्या चुका पोटांत ठेवितो व आमच्या अशक्ततेची त्याला दया येते. तीच प्रेमळतेची व क्षमाशीलतेची मनोवृत्ति आपल्या लोकांनी धारण करावी अशी त्याची आज्ञा आहे. खरे ख्रिस्ती लोक इतरांचे दोष व त्यांच्या उणीवा उघड्या करण्यांत आनंद मानणार नाहींत. जे काहीं नीच व उणे आहे त्याकडे दुर्लक्ष करून तें जें कांहीं आकर्षक व प्रेमळ आहे त्याकडे लक्ष देतील. दोषारोपाचे प्रत्येक कार्य आणि निदेचा प्रत्येक शब्द ख्रिस्ती माणसाला दु:खदायी असतो. 6 CChMara 245.4