कलीसिया के लिए परामर्श
आमच्या संमतीशिवाय मनांत सैतानाला प्रवेश दुरापास्त
आमच्यानें मनात शिरकाव असल्या प्रकारचे मोह आम्हांवर येऊ नयेत अशी ईश्वरी योजना आहे. प्रत्येक मोहासाठी तो एक सुटका-मार्ग पुरवितो. जर आम्ही आपले जीवन संपूर्णत: परमेश्वराला दिले तर आम्ही आपल्या मनाला स्वार्थी भावनांत रमू देणार नाहीं. CChMara 233.4
सैतानाला मनांत शिरकाव करण्याचा जर एखादा मार्ग असेल तर तो हाच कीं, त्यानें आपले निदण मनांत पेरावे व तें वाढून मोठे झाल्यावर भरगच्च हंगाम गोळा करावा. बुद्धि पुर:सर आम्हीं द्वार उघडे ठेवून त्याला प्रवेश दिल्याशिवाय सैतानाला आमच्या विचारांवर, उच्चारावर आणि आचारावर कदापि अधिपत्य करता येणार नाही. त्यानें आत प्रवेश केल्यावर अंतर्यामात पेरलेले चांगले बी उपटून सत्याचा कसलाही परिणाम तो घडू देणार नाहीं. CChMara 233.5
सैतानाच्या सूचनांना शरणागत गेल्यावर काय काय फायदे होतात या विचारात रेंगाळत बसणे आम्हांला सुरक्षितपणाचे होणार नाहीं. पापांत रमणाच्या प्रत्येकाला पाप ही एक अप्रतिष्ठा व संकट होय, आणि स्वभावत तें अंध करणारे व दगलबाज असतें. खोट्यानाट्या बतावण्या करून तें आम्हांला मोहपाशात गाठील. सैतानाच्या क्षेत्रांत शिरण्याचे जर आम्ही धाडस केले तर त्याच्या सामर्थ्यापासूनच्या बचावाची आम्हांला काहीं एक खात्री नसते त्या मोहकाला शिरकाव मिळू नये म्हणून आम्हांला समजते. त्याप्रमाणे हरएक प्रवेशमार्ग आम्ही बंद ठेवावा. CChMara 233.6
सैतानाला अंतर्यामाकडे फिरकता येऊ नये म्हणून हरएक प्रवेशमार्गावर नजर ठेवून प्रत्येक ख्रिस्ती मनुष्याने अखंड पहारा ठेविला पाहिजे. देवाच्या साह्याप्रीत्यर्थ त्यानें प्रार्थना करावयास पाहिजे आणि त्याचवेळी पापवासनेकडे नेणारी प्रत्येक इच्छा मोठ्या निर्धाराने झुगारून दिली पाहिजे. धैर्याने, निष्ठेने आणि अविश्रांत श्रमानें तो यशस्वी होऊन जाईल. परंतु विजय मिळवावयाचा असेल तर ख्रिस्ताने त्यामध्ये आणि त्यानें ख्रिस्तामध्ये जगले पाहिजे हें त्यानें लक्षात ठेवावें. CChMara 233.7
जगांत जो अन्याय चाललेला आहे त्याठिकाणी आम्ही व आमची मुलें गेलेली दिसणार नाहींत, यासाठी जे कांही करता येईल तें आईबापांनी केले पाहिजे. या भयंकर गोष्टी आमच्या मनात येऊ नयेत म्हणून आम्ही आमच्या डोळ्यांच्या दृष्टीवर आणि कानाच्या श्रवणावर काळजीपूर्वक पहारा ठेविला पाहिजे. एखाद्या डोंगराच्या कड्यावरून सुरक्षितपणे जाण्याचा आपण प्रयत्नच करूं नये. धोक्याच्या समीप जाण्याची मूळ कल्पनाच धिक्कारून टाका. आत्म्याच्या हितसंबधाचा खेळ करता कामा नये. तुमचे शील हें तुमचे मौल्यवान धन आहे. ज्याप्रमाणें धनसंपत्तीच्या ठेवीचे तुम्ही जतन करता त्याचप्रमाणे शिलाचे जतन करा. नैतिक शुद्धता, स्वाभमान, प्रतिकाराचे भक्कम बळ, ह्याचा मोठ्या निर्धाराने आणि नित्यशः संभाळ करा. आत्मसंयमनापासून रतीभरही ढळू नका. अतिपरिचयाचे एखादें जरी कृत्य घडलं किंवा एखाद्या जरी अविचाराला थारा दिला तर तेवढ्यानेच तुम्ही आपल्या आत्म्याला धोक्यात आणाल व त्याच्यासाठीं मोहाचा मार्ग खुला कराल व यामुळे तुमची प्रतिकारक शक्ति नेभळी होऊ जाईल. 1 CChMara 234.1
*****