कलीसिया के लिए परामर्श
सकाळ संध्याकाळची उपासना
आईबापांनों, रोज सकाळी संध्याकाळी आपली मुलें एकत्रित करून साहाय्यासाठी आपलीं नम्र अंत:करणें प्रभूसमोर सादर करा. तुमचे प्रियजण मोहाच्या तोंडार्शी असतात. रोजच्या कटकटींना लहानथोर घेरलेले असतात. शांत, प्रेमळ व उत्तेजित वृत्तीने जे राहूं इच्छितात त्यांनी प्रार्थना केली पाहिजे. देवाचें निरतरचे साह्य मिळाले तरच स्वत:वर विजय मिळवितां येईल. CChMara 217.1
प्रत्येक कुटुंबाला जर कधीं प्रार्थनामय कुटुंब व्हावयाचे असेल तर तें आतांच व्हावें. अविश्वास व संशयात्मक वातावरण फैलावत आहे. अनीति सर्वत्र दिसून येते. जीवनाच्या मौल्यवान् प्रवाहांत भ्रष्टता आढळते आणि जीवनचरित्रांत देवाविरुद्ध बंडाळी माजलेली दिसते. पापाच्या कह्यात सापडल्यामुळे आमचीं नैतिक सामर्थ्य सैतानाच्या जुलमाखाली आलेली आहेत. अंत:करण तर मोहाचे अगण होऊन बसले आहे. त्याची मुक्तता करण्यासाठी जर सबळ हस्त पुढे येणार नाहीत तर तो महान् ठकबाज सैतान मानवाला जिकडे ओढून नेईल तिकडे जावें लागेल. CChMara 217.2
तरी पण अशाही भयप्रद संकटांच्या काळी स्वत:ला ख्रिस्ती म्हणविणार्यांच्या घरात कौटुंबिक प्रार्थना होत नाही. त्यांच्या गृहांत देवाला सन्मानाचे स्थान नसते. देवावर प्रीति करून त्याचें सदभय धरावे असें तें आपल्या मुलांना शिक्षण देत नाहीत. पुष्कळजण त्याजपासून इतके दुरावलेले असतात कीं त्याच्या सन्निध जाण्यास आपण दोषपात्र आहों, असें त्यास वाटते. “राग व विशाद याचा स्पर्श होऊ न देता” “आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ’ (१ तिमथ्य २:८; इब्री ४:१) असें त्यांच्याने करवत नाहीं. देवाशी त्याचे जिवत नाते नसते. सामर्थ्याविना त्यांना धार्मिकतेचे स्वरूप मात्र असतें. CChMara 217.3
आत्म्यांचा घात करण्याच्या सैतानाच्या ज्या अतिशय यशस्वी करामती आहेत त्यांत प्रार्थना करण्याची आवश्यकताच नाहीं ही एक कल्पना होय. प्रार्थना तर देवाशीं समागम, सूज्ञतेचा झरा, सामर्थ्याचे, शांततेचे व सौख्याचे साधन होय. “मोठ्या आक्रोशाने व अश्रु गाळीत (इब्री. ५:७) येशूनें बापाची प्रार्थना केली.” “निरंतर प्रार्थना करा” (१ थेस्सल. ५:१७) असें पौल विश्वासणान्यास उत्तेजन देत आहे. धार्मिकाची प्रार्थना कार्य करण्यांत फार प्रबळ असतें.” असें याकोबाचे म्हणणे आहे. (याकोब ५:१६.) CChMara 217.4
निर्भेळ व आस्थेवाईक प्रार्थनेचे आईबापांनी आपल्या मुलाच्या सभोंवार आवरण घालावें. परमेश्वराची वस्ती त्यांच्यासह राहावी अशा पूर्ण विश्वासाने त्यांनी प्रार्थना करावी आणि सैतानाच्या क्रूर सत्तेपासून पवित्र देवदूतांनी त्यांचा व त्यांच्या मुलांचा सांभाळ करावा अशी त्यानीं विनवणी करावी. CChMara 217.5
प्रत्येक घरामध्ये सकाळ संध्याकाळच्या प्रार्थनेचा ठराविक वेळ असावा. स्वर्गीय पित्याने रात्रभर संरक्षण केल्याबद्दल आणि दिवसभर साहाय्य, मार्गदर्शन व साभाळ करावा म्हणून न्याहारी करण्यापूर्वी आईबापांनी आपल्या मुलांस प्रार्थनेसाठीं एकत्रित करणे किती संयुक्तिक होईल ! संध्याकाळ झाल्यावर पुन: एकवार आपली मुलें प्रभूसमोर एकत्र करून दिवसभर पुरविलेल्या आशीर्वादाबद्दल उपकारस्तुति करणे किती योग्य होईल ! 1 CChMara 217.6
रोज सकाळी स्वत:ला व आपल्या मुलांना त्या दिवसासाठी समर्पित करीत जा. महिन्यांचा व वर्षांचा हिशोब करीत बसू नका; तो काळ काहीं तुमच्या हातांत नाहीं. एक अल्पसा दिवस तुम्हांला देण्यांत आलेला आहे. तो तर तुमचा ह्या पृथ्वीवरील शेवटचा दिवस समजून त्यांतील तास-घटिका आपल्या गुरुच्या कार्यात खर्च करा. आपले सर्व बेतविचार देवासमोर सादर करा. तें पार पाडावेत किंवा सोडून द्यावेत हें त्याच्या सूत्राप्रमाणे नक्की करा आपल्या योजनांच्या ऐवजी देवाच्याच योजना मान्य करा. याप्रमाणे दैवी नमुन्याप्रत तुमचे चरित्र अधिकाधिक बनले जाईल आणि सर्व बुद्धिसामथ्र्यांच्या पलीकडे असलेली देवाची शांति तुमची अंत:करणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूमध्ये राखील.’ (फिलिप्पै ४:७.) 2 CChMara 218.1
वडिलानें अगर त्याच्या पश्चात आईने उपासना चालवावी. मनोरंजक व सहज ध्यानात येईल असा शास्त्रपाठ निवडावा. हा प्रार्थना प्रसंग आटोपशीर असावा. भला मोठा शास्त्राध्याय वाचला व लांबलचक प्रार्थना केली म्हणजे ही गृह्य-उपासना कंटाळवाणी होऊन जाते व ती सपली म्हणजे एकदाची सुटका झाली असें वाटते. प्रार्थनेचा तास रुक्ष व त्रासदायक, कंटाळवाणा, नापसंतीचा व मुलाना न रुचणारा केला म्हणजे आपण देवाचाच अपमान करितो. CChMara 218.2
आईबापांनो, उपासनेची वेळ अतिशय आकर्षक करा. इतका अत्यत आल्हादकारक व आनंददायी तास साच्या दिवसांत झाला नाही असा प्रार्थनेचा हा प्रसंग का करूं नये याचे कारण समजत नाही. त्याच्या पूर्वतयारीसाठी जर थोडासा विचार केला तर तो भरपूर चित्तवेधक व लाभदायक असा होऊन जाईल. प्रार्थनेच्या या उपासनेत अधूनमधून फेरफार करीत जावा. वाचलेल्या शास्त्रपाठावर प्रश्न विचारावेत व आस्थेवाईक व समयोचित बोध करण्यांत यावा. स्तुति गायन ही इष्ट होईल. प्रार्थना थोडक्यात व मुद्देसूद असावी. प्रार्थनेत देवाच्या चांगुलपणाबद्दल उपकारस्तुति करून त्याचे साहाय्य मागावे. प्रसगविशेषीं मुलांनाही प्रार्थनेत व वाचनात भाग घेऊ द्यावा. असले प्रार्थना प्रसंग किती आशीर्वाद संपन्नतेचे झाले आहेत याची साक्ष शाश्वतकाळ (पुढील आयुष्यांत) मात्र कळून CChMara 218.3
*****