कलीसिया के लिए परामर्श
प्रकरण ३४ वें - ख्रिस्ती निवासस्थान
वस्तीस्थानाची (गृहाची) निवड करितांना आपणास व आपल्या कुटुंबास नैतिक व धार्मिक वातावरण लाभेल कीं काय याचा प्रथमदर्शनी विचार करावयास पाहिजे असें देवाला वाटतें. CChMara 213.1
गृहासाठीं जागा शोधतांना ह्याच उद्देशाने निवड करण्यांत यावी. पैशांच्या घमेंडीवर, पोकळ ऐटीच्या नादी लागून अगर सामाजिक चालीरितींना अनुसरून निवड करण्यांत येऊ नये. जेणेकडून साधेपणा, शुद्धता, आरोग्य व वास्तविक उपयुक्तता लाभेल अशाच गोष्टी नजरेपुढे ठेविल्या पाहिजेत. CChMara 213.2
जेथें मानवी कृत्ये व कार्यच मात्र दृष्टोत्पतीस येतील, जेथे देखाव्यांनी व नजिक नादांनी दुर्विचारच वारंवार पुढे येतील, जेथे कष्टांमुळे व गोंधळामुळे कंटाळा व बेचैन वाटेल अशा ठिकाणी जाण्याऐवजी ईश्वरी कृत्ये दिसून येतील अशा ठिकाणी जा. निसर्गाच्या सौंदर्यात, स्वास्थ्यात व शांतींत आराम मिळेल असेच ठिकाण शोधा. हिरवीगार शेतें, वनश्री, व डोंगराळ प्रदेशावर तुमची नजर रमू द्या. शहरच्या धुळीने व धुराने ती स्थळे झाकून जात नाहींत पण निसर्गाच्या आरोग्यदायक हवेने मन प्रसन्न राहातें. CChMara 213.3
देव मार्ग काढीत असताना कुटुंबांनी शहराबाहेरच वस्ती करावी असा वेळ येत आहे. मुलांना खेड्यापाड्यांत घेऊन जात जावें. ऐपतीप्रमाणे आईबापांनी एखादी सोईस्कर जागा घ्यावी. घर लाहनसे का असेना पण बागबगीचा करण्यासाठी आसपास जागा असावी. CChMara 213.4
ज्या आईबापांना जमीनजुमला व सोईस्कर घरदार आहे तीं आईबापें जणू काय राजे व राण्या असतात. CChMara 213.5
साधेल तर वस्तीस्थान शहराबाहेर असावे. व बगीचा करावयास मुलांना तेथें जागा असावी. प्रत्येक मुलाला आपापला स्वतंत्र तुकडा असावा. बगीचा कसा करावा, पेरण्यासाठी जागा कशी तयार करावी व त्यांतलें तण उपटून काढण्याची महत्वाची गोष्ट त्यांना शिकवित असतांना आपल्या चरित्रांतील कुरुप व घातक चालीरिती कशा काढून टाकाव्या, हें मौल्यवान शिक्षणसुद्धा त्यांना देण्यांत यावे. बगीच्यांतील तण जसे उपटून टाकतात तशाच दुर्गुणी संवया उपटून काढण्याचे शिकवा. हें धडे मुरायाला वेळ लागेल हें खरे पण त्यांचे प्रतिफळ अत्यंत मौल्यवान असें ठरेल. CChMara 213.6
जमिनीच्या पोटांत मोठमोठे आशीर्वाद लुप्त आहेत. धैर्याने व चिकाटीने ही संपत्ति प्राप्त करून घेण्याची ज्यांना इच्छा आहे, त्यांना ती लाभून जाईल. हें एक हलक्या प्रतीचे काम समजून श्रम करणार्या पुष्कळशा शेतकर्यांच्या हातीं योग्यसा मोबदला येत नाही. त्यांच्यासाठी व त्यांच्या मुलाबाळांसाठी जमिनींत आशीर्वाद असतात, हें त्यांना दिसून येत नाहीं. CChMara 213.7
आईबापांच्या अंतर्यामी जे सत्य वसत आहे त्याला अनुरुप असें त्यांनी वातावरण बनविण्यासाठी तें देवाला बांधलेले आहेत. त्यांना आपल्या मुलांना अचूक असें शिक्षण देता येईल आणि आपल्या ह्या ऐहिक गृहाचा पारलौकिक घराशी संबंध आहे असें तीं शिकून घेतील. येथील कुटुंब हें शक्य तेवढे वरील कुटुंबाचा नमुना असें बनविण्यांत आलें पाहिजे तेव्हाच मात्र नीचतेकडे व अघमतेकडे ओढून नेणारे मोहपाश दुबळे असें पडतील. आपण तर ह्या ठिकाणी केवळ तात्पुरते रहिवासी आहो असें त्यास शिक्षण देण्यांत यावे. जे ख्रिस्तावर प्रीति करितात व त्याच्या आज्ञा पाळतात त्याच्यासाठीं तयार होत असणार्य महालाचे आपण वारस होणार असें त्यांस शिकवायाचे आहे. हेच आईबापाचे अत्यत श्रेष्ठ कर्तव्य होय. CChMara 214.1
मानवाच्या वस्तीसाठी उभारलेल्या सर्व इमारती शक्य तितक्या उंचावर व कोरड्या ठिकाणी असाव्यात. यामुळे खात्रीपुर्वक कोरडेपणा राहील. याकडे विशेष लक्ष देण्यांत येत नाही. दमट हवेच्या परिणामी कायमची नादुरुस्त प्रकृति, भयंकर आजार व पुष्कळ प्राणहानि घडून येते. मोरीचे पाणी वाहून गेलें नाहीं तर वाईट प्रकारचा मलेरिया (हिंवताप) जडतो. CChMara 214.2
रहावयाच्या इमारतींत भरपूर हवापाणी व उन्ह येऊ देणें विशेष महत्त्वाचे असतें. घरांतील प्रत्येक खोलींत खेळती हवा व पुष्कळ उजेड असावा झोपावयाच्या खोल्या अशा असाव्यात कीं त्यांत रात्रंदिन खेळती हवा असावी. हवेसाठी आणि सूर्य-प्रकाशासाठी रोज रोज खुली ठेविता येणार नाही अशी कोणतीच खोली निजावयासाठी योग्य नसते. CChMara 214.3
घरापासून थोड्याशा अंतरावर पागवून पांगवून लावलेली झाडे व उपवन अंगणाला सुशोभित करितात व त्याचा कुटुंबमडळीवर मोठा सुखद परिणाम घडतो. त्याची चांगली निगा ठेविली तर तीं प्रकृतीला अपायकारक होणार नाहींत. तथापि घरासभोवार खेटूनच सावलीचीं झाडे व बगीचा दाटीने लावल्यास ती अपायकारक ठरतात. कारण मोकळ्या हवेला व सूर्य किरणांना ती मज्जाव करतात. यामुळे घरांत दमटपणा, विशेषत: तो पावसाळ्यात उद्भवला जातो. CChMara 214.4