कलीसिया के लिए परामर्श
जीविताचा बदल घडवून आणणारे संदेश
एका सुवात्रिकाने मिचिगन येथील बुशनेल या गावी एक व्याख्यानमाला चालविली. पण बाप्तिस्म्यानंतर विश्वासणार्यांना सत्याची खोल माहिती न देता त्यानें तें ठिकाण सोडले. लोक हळूहळू निराश झाले व पूर्वीच्या संवयांनी तें पुन: जखडले गेले. शेवटी मंडळी इतकी कमी झाली कीं आता राहिलेल्या १०, १२ लोकांनी आणखी पुढे राहाण्याचा उपयोग नाही असें ठरविले. हीच आपली शेवटली सभा असें त्यांना वाटून तें निघाले असतां टपाल आलें व त्यांत रिव्ह्यू अँड हेराल्ड हें पत्रक आढळले. त्यांत दौर्यांच्या विभागांत एक सूचना आली होती ती अशी कीं, एल्डर आणि मिसेस व्हाईट या बूशनेल येथे सभा चालविण्यास १८६७ च्या जुलै २७ ला येणार आहेत. हें फक्त एकाच आठवड्याने होणार होतें. घरी जात असलेल्या लोकांना परत बोलावून आणण्यास मुलें पाठविण्यांत आली आणि असें ठरले कीं, आंबराईत एक ठिकाण तयार करावे व सर्वांनी आपल्या शेजार्यांना विशेष प्रकारे सत्यांत थंड होत चाललेल्या सभासदांना आमंत्रण द्यावे. CChMara 21.3
जुलै २० च्या शब्बाथ सकाळी एल्डर व मिसेस व्हाईट सभास्थानी आल्या तेथें सुमारे ६० लोक जमले होतें, एल्डर व्हाईट सकाळच्या उपासनेत बोलले. दुपारी मिसेस व्हाईट बोलण्यास उठल्या पण त्यांनी आपली ओवी वाचल्यावर त्या गोंधळलेल्या दिसल्या आणि आपले शास्त्र बंद करून त्या त्यांच्याशी सलगीने बोलू लागल्या. CChMara 21.4
“मी तुम्हांपुढे बोलण्यास उभी राहिली असतां मी दोन वर्षांमागे दृष्टांतात पाहिलेल्या इसमांचे चेहरे मला दिसत आहेत. तुम्हां सर्वांच्या चेहर्यांकडे पाहिल्यावर तुमचे सर्व अनुभव मला स्मरतात व प्रभूपासून तुम्हांसाठी एक संदेश आहे. CChMara 21.5
“त्या झाडाजवळचा हा भाऊ मला आठवतो. तुझी ओळख नसल्यामुळे तुझे नांव मला माहीत नाही, पण तुझा चेहरा माझ्या माहितीचा आहे व तुझा अनुभव स्पष्टरीत्या मला आठवतो” नंतर त्या या भावाशी त्या थंडपणाबद्दल बोलल्या आणि त्यांनी त्याला उत्तेजन देऊन पुनः देवाच्या लोकांबरोबर चालण्यास परत यावे असें सांगितलें. CChMara 22.1
नंतर जमलेल्या लोकांत दुसर्य एका बहिणीकडे वळून त्या म्हणाल्या कीं, ग्रीनव्हिले मंडळींतील मेनार्ड यांच्याजवळ बसलेली बहिण, तुझे नांव काय तें मला माहीत नाही. पण दोन वर्षामागे दृष्टांतांत तुझी बाब मला दाखविण्यांत आली व तुझा अनुभव मला माहीत आहे. नंतर मिसेस व्हाईट यांनी त्या बाईला उत्तेजन दिले. CChMara 22.2
“त्या ओकच्या झाडाजवळ तो एक भाऊ आहे,” तुझेहि मला नांव माहीत नाही कारण मी तुला अजून भेटले नाही. पण तुझ्या संबंधाने मला माहीत आहे.” मग त्या या भावाशी बोलल्या. त्याचा अनुभव त्याचे अनुभव त्याचे सर्व गुप्त विचार याविषयी त्यांनी तेथील लोकांना सांगितलें. CChMara 22.3
अशा प्रकारे एकापासून तो तेथील बसलेल्या सर्व लोकांतून पुष्कळांचे दोन वर्षांपूर्वी दृष्टांतांत दर्शविलेले अनुभव सांगत राहिल्या. मिसेस व्हाईट आपल्या उपदेशांत चुकांबद्दल कान उघडण्याचे पण उत्तेजनपरे शब्द बोलून त्यांनी आपला उपदेश संपविला व खालीं बसल्या. तेथील एक जण उठून उभा राहिला व म्हणाला, मिसेस व्हाईट यांनी आज दुपारी जे सांगितलें तें खरे CChMara 22.4
आहे किंवा नाही तें मला माहीत पाहिजे. एल्डर आणि मिसेस व्हाईट इकडे पूर्वी कधीं आलें नव्हते त्यांची आम्हांला बिलकुल ओळख नाही. सिस्टर व्हाईट यांना आमची कोणाची नावेहि माहीत नव्हती आणि दोन वर्षांमागे दृष्टांतांत तुम्हां प्रत्येका विषयी त्यांना दाखविण्यांत आलें होतें व प्रत्येकाशी व्यक्तिवाचकरित्या बोलून त्यांचे गुप्त विचार आणि वागणे याविषयी त्या आज दुपारी येथे सांगतात. तर हें सर्व खरे आहे का? का त्यांनी कांही चुका केल्या आहेत ? हें मला समजायला पाहिजे. CChMara 22.5
एकामागे एक सर्व लोक उभे राहिले. देवदारू झाडाजवळचा मनुष्य उभा राहिला व म्हणाला कीं, सिस्टर व्हाईटनी माझ्याविषयी मला वर्णन करून सांगता येणार नाही असें वर्णन करून सांगितलें आहे. तेव्हां त्यानें आपला चुकीचा मार्ग कबूल केला व त्यानें परत फिरून देवाच्या लोकांबरोबर चालण्याचा निश्चय बोलून दाखवला. ग्रीनव्हिले मंडळीच्या सिस्टर मेनार्ड जवळ बसलेल्या बहिणीनेही तशीच साक्ष दिली. ती म्हणाली कीं, सिस्टर व्हाईटनी माझ्यापेक्षा उत्तम रितीने माझा अनुभव सांगितला आहे. ओक झाडाजवळ उभा असलेला मनुष्य म्हणाला कीं, सिस्टर व्हाईटनी माझ्यापेक्षा चांगली माहिती सांगितली. अशा प्रकारे पापकबुली करण्यांत आली, पापे काढून टाकण्यात आली, देवाचा आत्मा त्यांजवर आला व बूशनेल येथे धर्मसंजीवन घडून आलें. CChMara 22.6
एल्डर आणि सिस्टर व्हाईट हें दुसर्य शब्बाथ दिवशी पुन: आलें. बाप्तिस्मे झाले आणि बूशनेल येथील मंडळी उत्तम प्रकारे स्थापण्यांत येवून चालूं राहिली. जे त्याच्याकडे पाहातात त्यांच्यावर जशी प्रीति करितो तशीच प्रभूने बूशनेल येथील लोकांवर प्रीति केली. ज्यांच्यावर मी प्रीति करतो तितक्यांस शिक्षा करतो यास्तव आस्था धर आणि पश्चाताप कर” (प्रकटी ३:१९) ही ओवी तेथें हजर असणार्यांपैकी काहींच्या ध्यानी आली असेल. प्रभूने त्यांची अंत:करणे पाहिली तशी लोकांनी पाहिल्यावर त्यांची अंत:करणे त्यांना समजून आली व त्यांच्या जीवितांत बदल होण्याची त्यांनी इच्छा दर्शवली. मिसेस व्हाईट यांना पुष्कळ दृष्टांत होण्याचा हाच खरा हेतु आहे. CChMara 22.7
एल्डर व्हाईट यांच्या मरणानंतर लवकरच मिसेस व्हाईट या हिल्डसबर्ग कॉलेजजवळ राह लागल्या. शाळेला जाणार्या अनेक तरुण स्त्रिया त्यांच्या घरी राहत होत्या. त्यावेळी अशी एक रीत होती कीं केसाला जाळी लावत असत. हेतु हा कीं, केस दिवसभर नीट व व्यवस्थित राहावे. एके दिवशी मिसेस व्हाईट यांच्या खोलीजवळून जातांना एका मुलीने एक चांगले बनविलेले जाळे पाहिलें व तें तिला हवे होतें म्हणून तें घेतले तें ठेवले. थोड्या वेळाने मिसेस व्हाईट यांना बाहेर जायचे होतें पण त्यांना तें सापडेना म्हणून त्या तशाच गेल्या. संध्याकाळी सर्व कुटुंब एकत्र झाल्यावर मिसेस व्हाईट यांनी आपल्या हरवलेल्या जाळ्याविषयी विचारपूस केली पण तें कोठे आहे याविषयी कोणीच सांगेना. CChMara 23.1
एक दोन दिवसांनी जेव्हां मिसेस व्हाईट त्या मुलीच्या खोलीतून जात असतां वाणी झाली, “ती ट्रंक उघड” कारण ती ट्रंक त्यांची नव्हती म्हणून त्यांनी तसे करण्याचे इच्छिले नाही. दसर्या आवाजाबरोबर त्यांना देवदताचा आवाज समजला. जेव्हां त्यांनी ट्रंक उघडली तेव्हां दूताने तसे का सांगितल तें त्यांना समजले. कारण त्यांचे जाळे तेथें होतें. पुन: सर्व एकत्र झाल्यावर त्यांनी जाळ्याविषयी विचारलें व म्हणाल्या कीं तें एकाएकी नाहीसे होणार नाही. कोणी बोलले नाही. मिसेस व्हाईट यांनी ही बाब सोडून दिली. CChMara 23.2
थोड्या दिवसांनी मिसेस व्हाइट लिखाणापासून थोडा विसावा घेत होत्या. तेव्हां त्यांना एक लहानसा दृष्टांत झाला. एक मुलगी केसाचे जाळे घासलेटच्या दिव्यांत टाकतांना त्यांना दिसली. तें जाळे ज्योतीला लागले आणि जळून गेले हाच दृष्टांताचा शेवट होता. CChMara 23.3
पुन: सर्व एकत्र झाल्यावर हरवलेल्या जाळ्याची गोष्ट त्यांनी काढली. पण कोणी कबूल होईनात व कोठे आहे तें कोणालाच ठाऊक नाही असें सर्व म्हणू लागले. नंतर कांही वेळाने मिसेस व्हाईट यांनी त्या तरूण स्त्रीला एकांतात बोलाविले व त्या वाणीविषयी व दिव्यावर जाळलेल्या जाळ्याच्या दृष्टांताविषयी त्यांनी तिला सविस्तर सांगितलें. ही माहिती समक्ष ऐकल्यावर त्या मुलीने जाळे घेतल्याचे कबूल केले व जाळल्याचेही कबूल केले. नंतर तिने या बाबतीत त्यांची क्षमा मागितली व प्रभूचीहि क्षमा मागितली. CChMara 23.4
आपण कदाचित् म्हणू कीं प्रभूने एकश्चित केसाच्या जाळ्याकडे लक्ष देणे म्हणजे अगदी क्षुल्लक बाब, पण जी वस्तु चोरली गेली तिच्या किंमतीची ही बाब फार महत्त्वाची होती. से.डे.अॅ. मंडळीची सभासद असलेली ही तरुण स्त्री होती. तिला वाटले कीं आपण निर्मळ आहे पण तिच्या स्वत:च्या शीलांतील उणेपणा तिला दिसला नाही. चोरी करण्याचा व फसविण्याचा तिच्यामध्ये जो स्वार्थीपणा होता तो तिला दिसला नाही. पण जेव्हां तिला कळून चुकले कीं, लहान बाबी फार महत्त्वाच्या आहेत कारण प्रभूने तिला ही बाब खर्या स्वरुपांत दिसूं लागली. तिच्या जीवितातील ही बाब म्हणजे पुन: वळण्याची बाब होय. ती नंतर खरे ख्रिस्ती जीर्ण जगू लागली. CChMara 23.5
याच कारणामुळे मिसेस व्हाईट यांना दृष्टांत झाले. जरी मिसेस व्हाईट यांनी लिहिलेल्या पुष्कळ साक्षी एक विशेष प्रकारच्या होत्या तरी त्या जगांतील प्रत्येक देशांतील मंडळीच्या गरजा भागविणारी सत्य तत्वे होती. मिसेस व्हाईट यांनी त्यांच्या साक्षीविषयीचा हेतु व स्थान या संबंधाने पुढील शब्दांत लिहिले आहे. CChMara 24.1
“लेखी साक्ष नवीन प्रकाश देण्यासाठी नसून आत्म्याच्या प्रेरणेने प्रगट केलेल्या सत्याच्या अंत:करणावर परिणाम करण्यासाठी आहेत. देवाच्या वचनांत देवाशी आपले कर्तव्य व मानव बंधूशी आपले कर्तव्य अगदी स्पष्टपणे दर्शविले आहे. पण तुम्हांपैकी थोडेच पण मिळालेल्या प्रकाशाचे पालन करीत आहात. आणखी दिलेले सत्य नाही; पण देवाने साक्षीद्वारे आधी दिलेली महान सत्ये उघड केली आहेत. या साक्षी देवाच्या वचनाला कमीपणा आणण्यासाठी नसून त्यांना मोठेपणा देण्यास व लोकांचे लक्ष त्याकडे वेधून घेण्यासाठी आहेत. अशासाठी कीं, सत्याच्या सुंदर साधेपणाचा सर्वांच्या मनावर चांगला परिणाम घडावा.” आपल्या सर्व आयुष्यांत मिसेस व्हाईट यांनी लोकांपुढे देवाचे वचन मांडिले, त्यांनी आपले पुस्तक या विचाराने संपविले त्या म्हणतात. CChMara 24.2
“प्रिय वाचका, मी तुला अशी शिफारस करते कीं देवाचे वचन तुझ्या जिवितांतील विश्वासाचा नियम आहे. त्या वचनाने आमचा न्याय होणार आहे. देवाने या वचनांत शेवटल्या काळांत विश्वासाचा नवीन नियम म्हणून नव्हे पण आपल्या लोकांच्या समाधानासाठी व पवित्रशास्त्राच्या सत्याविषयी जे चुकतात त्यांची दुरुस्ती करण्यासाठी दृष्टांत देण्याचे वचन दिले आहे.” CChMara 24.3