कलीसिया के लिए परामर्श
मातृ-पितृत्व
ज्या स्त्रीला लवकरच मातृपद लाभावयाचे आहे तिने कोणत्याही परिस्थितीमध्ये निरंतर सुखी, आनदी व समाधानी वृत्ति धारण करण्याचा प्रयत्न करावा. कारण तिला कळून चुकेल कीं, या धोरणाने केलेले तिचे सर्व प्रयत्न तिच्या संततीच्या शारीरिक व नैतिक शीलसंवर्धनासाठी दसपट अधिक फायदेशीर होतील. एवढेच होणार नाहीं. तर आनंदित विचारसरणी ठेवण्याची सवय लावून घेतली तर खुद्द तिच्या सौख्यावर, तिच्या कुटुंबाच्या व शेजार्यपाजाच्याच्या सौख्य-वृत्तीवर परिणाम घडून येतील आणि तिची प्रकृति फार मोठ्या प्रमाणात सदृढ होऊन जाईल. जीवनदायी प्रवाहाना एक नवीन जोभ प्राप्त होईल. निराशावस्थेत आणि खिन्नावस्थेत ज्याप्रमाणे रक्ताभिसरण मंदावते, तसे तें होणार नाहीं. तिच्या मनाच्या आनंदित वृत्तीमुळे तिची मानसिक व नैतिक प्रकृति सबळ होऊन जाईल. इच्छासामर्थ्याच्याद्वारे मनांतील अस्पष्ट कल्पना काढून टाकता येतील व त्याच सामर्थ्याच्या साह्याने मज्जातंतूमध्ये सौम्यता निर्माण होइल. आईबापापासून परपरेनें प्राप्त होणारी जीवनशक्ति ज्या मुलांतून नष्ट झाली आहे त्यांची अत्यंत काळजी घ्यावयास पाहिजे. त्यांच्याकडे बारकाईने लक्ष पुरविल्यास त्याची स्थिति अधिक चांगली बनून जाईल. मातृपदाची अपेक्षा करणार्य बाईने आपल्या अंतर्यामात देवाची प्रीति बाळगली पाहिजे. तिचे मन शांत असावें. येशूच्या प्रीतीत तिने स्थिर राहावे व ख्रिस्ताचे अनुकरण करीत राहावे. आई ही देवासह श्रम करणारी असतें, हें तिने लक्षांत बाळगावें. CChMara 202.1
नवराबायकोमध्ये सहकारिता असावी. जर सर्व मातांनी ईश्वरासमोर आत्मसर्मपण केले आणि जन्मापुर्वी व नंतर आपली संतति परमेश्वराच्या हवाली केली तर आपला हा इहलोक कितीतरी वेगळा होऊन जाईल ! CChMara 202.2
आईबापांच्या नैतिक बळाविषयी पुष्कळशा आईबापांची समजूत फार कोती असतें परंतु परमेश्वराला तसे वाटत नाहीं. देवदूतांच्या हस्ते पाठविलेला संदेश व तो तर दोनदा मोठ्या गांभिर्याने देण्यांत आलेला होता, त्यावरून असें दिसून येते कीं, आपण त्याकडे फार काळजीपूर्वक पाहावयास हवे आहे. CChMara 202.3
इब्री मातेला (मानोहाच्या पत्नीला) जे शब्द सांगण्यांत आलें तेच शब्द देव सर्व मातांना सर्व युगात सांगतो. त्यात म्हटले आहे कीं, “मी या स्त्रीस सांगितलें आहे, त्या सगळ्यास तिने जपावें.” आईच्या सवयाचा मुलांच्या सौख्यावर परिणाम घडत असतो. तत्त्वानुसार तिने आपल्या वासना व मनोविकार आटोक्यात ठेविले पाहिजेत. तिला मूल देण्यांत देवाचा हेतु जर पूर्णपणे पाळावयाचा असेल तर काहीं गोष्टी तिला टाळाव्या लागतील व कित्येकाना तिला विरोध करावा लागेल. CChMara 202.4
तरुणांच्या मार्गात फसविणारी जाळी या जगांत भरपूर आहेत. स्वार्थी व विलास सौख्याच्या फदांत शेंकड़ों लोक गुंतलेले आहेत. त्यांच्या पसंतीच्या सुखमार्गामध्ये कितीतरी लुप्त संकटे वे भयंकर परिणाम आहेत हें त्याच्या ध्यानी मनीं येतच नाहीं. मोहकतेच्या भुकेने व मानसिक विकाराने त्याच्या शक्तीचा दुरुपयोग केला जातो व लाखो लोकांचा ह्या जगी व भावी जगी नाश होऊन जातो. या मोहपाशास आपल्या मुलांना तोंड द्यावयाचे आहे, हें आईबापानी ध्यानात आणावे. मुलाचा जन्म होण्यापूर्वीच दृष्टाईविरुद्ध यशस्वी रितीने लढा देण्याची तयारी करावी. CChMara 203.1
जर माता मुलाला जन्म देण्याअगोदरच स्वार्थी, असहिष्णु, कडक स्वभावाची बनून आपल्या अनावर लाडांचे लालन पालन करण्याकडे झुकली तर या सर्वांचा परिणाम मुलाच्या स्वभावावर झाल्याशिवाय राहाणार नाहीं. अशा रीतीनें कांही मुलें जात्याच दुष्टतेला सोकाकलेली दिसतील. CChMara 203.2
परतु जर माता अढळपणे योग्य अशा तत्त्वाना बिलगून राहील, नेमस्तपणे व स्वनाकार करून वागेल, मनाने मायाळ, सौम्य व नि:स्वार्थी अशी होईल तर तिचे हेच मौल्यवान सदगुण तिच्या मुलांत उतरतील. ज्यांत आपल्या सवयाची व वागणुकीची प्रतिमा पाहाता येईल असः आरसा जणू लहान मुलें होत. म्हणून आपल्या या छोट्याशा शिकाऊ बालकापुढे आईने आपल्या भाषणात व व्यवहारात किती चोख असावयास पाहिजे ! त्याच्या शीलांत ज्या ज्या गोष्टी प्रगल्भ व्हाव्यात असें तिला वाटते त्या त्या गोष्टींची जोपासना तिने स्वत:मध्ये केली पाहिजे. CChMara 203.3