कलीसिया के लिए परामर्श
नूतन दांपत्यांस मसलत
प्रिय बंधुभगिनीनो, आयुष्यभर एकत्रीतपणाचा तुम्ही करार केलेला आहे. विवाहजीवनातील शिक्षणाला तुम्ही सुरुवात केली आहे. यांतले पहिले वर्ष में अनुभवाचे वर्ष म्हणजे ज्याप्रमाणे मूल शाळेत शिकू लागते त्याप्रमाणे नवराबायको परस्पराच्या शीलांतील विशेष-अविशेष गुणदोष काय आहेत तें त्या पहिल्या वर्षांत शिकू लागतात. तुमच्या भावी सौख्यांत विघातक होईल असें ह्या प्रथम वर्षांत कांहीं घडू देऊ नका. CChMara 189.3
वैवाहिक नातेसंबंधातील यथायोग्य ज्ञान प्राप्त करून घेणें हें आयुष्यभराचे कार्य असतें. विवाह करून जे कोणी ह्या शिक्षणसंस्थेत प्रवेश करतात त्यांचे शिक्षणकार्य कदापि परिपूर्ण होऊन जात नाहीं. प्रिय बांधवा, तुमच्या पत्नीचा काळ आणि सौख्य हीं तुमच्याशी निगडीत झालेली असतात. तिच्यावर तुमचे पडणारें वजन (नैतिकबळ) तिला जगायला जीवन अगर मरावयाला मरणच होईल. तिच्या चरित्राचा बिघाड होऊ नये म्हणून अत्यंत काळजी घ्या. CChMara 189.4
प्रिय भगिनी, वैवाहिक जीवनातील जबाबदार्य काय काय असतात यांचे व्यवहारिक धडे तुला घ्यावयाचे आहेत. विश्वासूपणे हें धडे रोज रोज शिकण्याविषयीची तुझी खात्री करून घे. उदिग्नतेला व अतृप्तीला स्थान देऊ नको. आरामाचे व निरोद्योगतेचे जीवन जगण्याची अपेक्षा करूं नको. स्वार्थाच्या बळी पडू नये म्हणून निरंतर खरबदारी ठेव. CChMara 189.5
तुमच्या ह्या ऐक्याच्या चरित्रांतील प्रेमसंबंध परस्परांच्या सौख्यांत भर पाडणारे असें व्हावेत. तुम्हां प्रत्येकाला एकमेकांच्या सुखसंवर्धनाची सेवा करावयाची आहे. तुम्हांविषयी देवाची इच्छा हीच आहे. तरी एक म्हणून तुमचा मिलाफ होत असतो. तुम्हांपैकी कोणीही आपले व्यक्ति स्वातंत्र्य गमावता कामा नये. तुमच्या व्यक्तीत्वाचा मालक परमेश्वर आहे. त्यालाच तुम्ही विचारावयाचे असतें कीं योग्य काय व अयोग्य काय? माझ्या अस्तित्वासंबंधीचा उद्देश उत्कृष्ट प्रकारे पार पाडण्यासाठी मी काय करूं? “तुम्ही आपले नाही; कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहा; यास्तव तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा.” (१ करिंथ ६:१९, २०) मानवी प्रेम भावना ही तुमच्यांतील देवाविषयींच्या प्रेमभावनेपुढे दुय्यम प्रतीची असते. ज्यानें आपला जीव तुम्हांसाठीं समर्पित केला त्याकडेच तुमच्या प्रेमसंपत्तीचा प्रवाह वाहावयास हवा. देवावर प्रीति करणान्याच्या अंतर्यामी ज्या अतिश्रेष्ठ व उच्च प्रकारच्या प्रेमभावना असतात त्या तो देवासाठीं व देऊन टाकतो. ज्याने तुम्हांसाठी आपले प्राणदान दिले. त्याकडे तुमची प्रीति अति मोठ्या प्रमाणात जात आहे काय? जर तसे असेल तरच तुमची परस्परांवरची प्रीति स्वर्गीय धर्तीची होईल. CChMara 189.6
तुमचे प्रेमसंबंध स्फटिकाप्रमाणे स्वच्छ व त्याच्या निष्कलंकेत आकर्षक असू शकतील. तरी त्यांची परीक्षा व कसोटी न झाल्यामुळे तें उथळ असू शकतील. हरएक गोष्टीमध्ये ख्रिस्ताला आद्य आणि अखेरचे व सर्वोत्कृष्ट स्थान द्या. निरंतर त्याकडे पाहात राहा म्हणजे त्यासाठी तुम्हांत वसणारी प्रीति कसोटीच्या क्षेत्रांत अधिकाधिक खोल, आणि सबळ अशी नित्यशः होत जाईल. जसजशी तुमची त्यावरील प्रीति वृद्धिंगत होत जाईल तसतशी तुमची परस्परांवरची प्रीति अधिक खोल व अधिक बळकट होत जाईल. “आपण सर्वजण आरशाप्रमाणे प्रभूच्या वैभवाचे प्रतिबिंब पाडीत आहों आणि त्याच्याद्वारे तेजस्वितेच्या परंपरेने आपले रूपांतर होत असतां आपण त्याच्याशी समरूप होत आहो.” (२ करिथ ३:१८). लग्नापूर्वी नव्हती अशी कर्तव्ये आता तुम्हांवर सोपविण्यांत आलेली आहेत म्हणून करुणायुक्त हृदय, ममता, नम्रभाव, सहनशीलता ही अंगी ल्या.” “ब्रिस्ताने तुम्हांवर प्रीति केली..... तदनुसार तुम्हीही प्रीतीने चाला.’ पुढील गोष्टीचे काळजीपूर्वक ध्यान करा. “बायकांनो, तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपापल्या नवर्याच्या अधीन असा, कारण जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे तसा नवरा बायकोचे मस्तक आहे.... अशी मंडळी ख्रिस्ताच्या अधीन आहे. तसे बायकांनीहीं सर्व गोष्टींत आपापल्या नवर्यांच्या अधीन असावे. नवर्यांनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीति केली आणि स्वत:चे तिच्यासाठी अर्पण केले, तशी तुम्हीही आपापल्या बायकोवर प्रीति करा.” (कलस्स ३:१२;) इफिस, ५:३, २२-२५). CChMara 190.1
लग्न हें आयुष्यभर टिकणारे ऐक्य असतें. ख्रिस्त व मंडळी यांच्यामधील ऐक्याचे तें दर्शकचिन्ह होय. ख्रिस्त मंडळीविषयीं जी पूज्यभावना व्यक्त करितो तीच नवराबायकोंने परस्पराविषयी व्यक्त करावयाची असते. CChMara 190.2
नवर्यला अगर बायकोला अधिकार गाजविण्याचे प्रयोजन नसते. या प्रकरणी प्रभूनें एक तत्त्व घालून दिलेले आहे. ख्रिस्त जसा मंडळीला आवडीने वागवितों तसेच पतीने पत्नीला वागविले पाहिजे. बायकोने आपल्या नवर्यचा आदर राखून त्याजवर प्रीति करावी. दोघांनीही ममतेची जोपासना करावयाची असतें. परस्परांनी कोणालाही खजिल अगर दु:खापत करावयाची नाहीं असा त्यानी निर्धार करावयाचा असतो. CChMara 190.3
माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, तुम्हां दोघांनाही बळकट इच्छासामर्थ्य आहे. तुम्ही स्वत:ला आणि ज्यांच्याशी तुमचा संबंध घडेल त्याना ह्या सामर्थ्याच्या आशीर्वादित तरी कराल किंवा त्याच्या नाशाला कारणीभूत तरी व्हाल. आपल्याच लहरीप्रमाणे वागण्यानें परस्परावर जुलूम करूं नका. हें करून तुम्हांला एकमेकांवरची प्रीति राखणे शक्य नाही. आपल्याच मनोवृत्तीच्या तोर्यने गृहातील शांति व सुख नष्ट होतें. तुमचे विवाह जीवन विवाद्य होऊ देऊ नका. असें केलें तर तुम्ही उभयतां दुर्दैवी व्हाल. आपल्या भाषणात मायाळू आणि आपल्या कृतींत सभ्य असें राहा. हेकडबुद्धि सोडून द्या. आपले शब्द कसे निघतात याकडे बारकाईने लक्ष्य द्या, कारण त्यांत हित व अहित करण्याचे मोठे सामर्थ्य असतें. आपल्या वाणींत तिखटपणा येऊ देऊ नका. ख्रिस्तासारख्या जीवनाचा सुगंध तुम्ही आपल्य वैवाहीक जीवनात आणा. CChMara 190.4
विवाहासारख्या निकट ऐक्यांत पाय टाकण्यापूर्वी आत्मसंयमन करण्याचे व इतरांशी कसं वागावें हें मनुष्याने शिकून घेतले पाहिजे. CChMara 191.1
माझ्या बांधवा, मनाने मायाळू, शांत व सहनशील असें राहा. तुमच्या पत्नीने तुम्हांला आपला पति म्हणून पत्करले आहे, तें तुम्ही तिच्यावर अधिकार चालवावा म्हणून नव्हें तर तुम्ही तिला साहाय्यक असें व्हावे. घमेंडखोर व जुलमी कदापित होऊ नका. आपल्याच इच्छेप्रमोणं वागण्यासाठी आपल्या पत्नीवर जुलूम करुं नका. तिलाही इच्छा व आपल्या इच्छेप्रमाणे गोष्टी घडाव्यात असें तिलाही वाटते, हें तुम्ही लक्षात घ्या. तुम्हांला अधिक अनुभवाचा पाठिंबा आहे हेही ध्यानात आणा. विचारवंत व आदरशील असें वागा. “वरून येणारे ज्ञान हें मुळात शुद्ध असतें. शिवाय तें शांतिप्रिय, सौम्य, समजून घेण्याजोगें, दया व सत्फळे यांनी पूर्ण, अपक्षपाती. निर्दभ असें आहे.” (याकोब ३:१७.) CChMara 191.2
माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, लक्षात घ्या कीं, देव प्रेमस्वरूप आहे आणि विवाह-प्रसंगी तुम्ही घेतलेली शपथ आपण एकमेकांस सुखी करूं ही त्याच्याच कृपेने तुम्हांला यशस्वी करून दाखविता येईल. उद्धारकाचे सामर्थ्य घेऊन वक्र दृष्टीची चरित्रे प्रभूमध्ये तुम्हांला सरळ करिता येतील. ख्रिस्ताला करता येणार नाहीं असें काय आहे? सूज्ञतेत, न्यायात्वांत व प्रेमांत तो परिपूर्ण असा आहे. तुमची एकमेकांवरची प्रीति एकमेकांसाठीच राखू नका व त्यामध्येच तृप्त होऊ नका. आपल्या शेजार्यपार्यांना आपल्या प्रीतिचा शब्द सहानुभूतीची दृष्टि, गुणग्राहकतेची भाषा यामुळे धडपडणाच्या व एकलकोंड्या अशा अनेक व्यक्तींना जणू काय तृषितांना थंड पाण्याचा प्यालाच दिल्यासारखे होईल. चिंतातुरतेत दबून गेलेल्यास तुमचा उत्तेजनाचा शब्द, कृपेचे एखादें कार्य याकडून हलके वाटेल. नि:स्वाथर्भ सेवेतच खरे सुख आढळून येते. असला प्रत्येक शब्द व प्रत्येक कार्य ख्रिस्तासाठीच केलेली सेवा स्वर्गीय पुस्तकांत ती नोंदिली जाईल तो असें स्पष्टपणे सांगतों कीं. “ज्याअर्थी तुम्हीं या माझ्या अति कनिष्ट बंधूतील एकाला केले, त्याअर्थी तें मलाच केले आहे.” (मत्तय २५:४०.) 1 CChMara 191.3
तारणार्याच्या प्रीतीच्या सूर्यप्रकाशात जगत राहा. मग तुमच्या प्रेममय वजनाने जग आशीर्वाद संपन्न होईल. ख्रिस्ताचा आत्मा तुम्हांवर आपला ताबा चालवो, प्रेमळतेची भाषा निरंतर तुमच्या ओठावर असो, ख्रिस्तामध्ये नवीन जीवन जगावे म्हणून जे पुनर्जीत झालेले आहेत अशाच्या वाणींत व कृतीत सहनशीलता व नि:स्वार्थी ही दिसून येतात. 2 CChMara 191.4
****