कलीसिया के लिए परामर्श
प्रकरण २८ वें - भिन्न विश्वासणार्याशीं लग्न करुं नका
ख्रिस्ती नाहीं अशाशीं ख्रिस्ती व्यक्तीने विवाह करण्याविषयी देवाच्या शास्त्रात दिलेल्या शिक्षणासंबंधी ख्रिस्ती जनतेत आश्चर्यकारक व भयप्रद अशी बेपरवाई दिसून येते. आपण देवावर प्रीति करून त्याचे सदुद्भय बाळगतों असें मानणारे पुष्कळजण देवाच्या अद्भूत सुज्ञतेची मसलत बाजूला सारून आपल्याच मानसिक लहरींच्या नादाने आवड निवड करतात. उभय पक्षांसाठी या जगांत व येणार्य जगांत लाभणाच्या सुखासंबंधींच्या व हितासंबंधीच्या बाबींकडे दुर्लक्ष करून आणि सारासार विचार, धोरण व देवाचे सदुभय यांना धाब्यावर बसवून अंधवृत्ति, लहरीभावना आणि हेकडपणा यांचाच ताबा मान्य करण्यांत येतो. CChMara 185.1
जे पुरुष व स्त्रिया एरवीं सावध व जाणती असतात ती सल्लामसलतीपुढे बधीर होतात; मित्र, नातेवाईक व देवाचे सेवक यांच्या विनंत्या व काकुळतीं त्यांना ऐकू येत नाहींत. सावधगिरीच्या व इशार्यांच्या सूचना ह्या अप्रासंगिक व लुडबुडीच्या वाटतात, कान उघाडणी करण्यांत जो मित्र विश्वसनीय असतो तोच शत्रु असा वाटतो. सैतानाला तर हें हवेच असतें. (त्याच्या जादूत आत्मा गुरफटून गेलेला असतो) त्याला मोहनी पडते व तो बुद्धिभ्रष्ट होतो. विषयवासनेमुळे त्याच्या बुद्धिमतेचे कांही चालत नाही व आत्मसंयमन त्याच्या हातचे सुटते. अपवित्र मनोविकाराचा इतका जोर होतो कीं अखेरीस संकटाच्या व गुलामगिरीच्या जीवनाला तो बळी पडतो. ही वस्तुस्थिती कांहीं काल्पनिक चित्र नव्हें तर सत्य गोष्टीचे तें निवेदन आहे. स्पष्टपणे मना केलेल्यांच्या एकत्रीकरणाला देवाची पसंत नसते. CChMara 185.2
सभोंवार असलेल्या मूर्तिपूजकांशी विवाहसंबध करूं नयेत असें प्राचीन काळच्या इस्राएलांना देवाने बजावून सांगितलें होतें : “त्यांच्याशी सोयरिक करूं नको, आपली कन्या त्यांच्या मुलास देऊ नको व त्यांची कन्या आपल्या मुलास करूं नको’ ह्याचा खुलासा दिलेला आहे. कारण तें लोक तुझ्या पुत्रास मजपासून बहकवितील आणि अन्य देवाची उपासना करावयास लावितील त्यामुळे परमेश्वराचा कोप तुम्हांवर भड़केल व तो तुमचा नाश सत्वर करील. कारण तें आपला देव परमेश्वर याची पवित्र प्रजा आहेस; या अखिल पृथ्वीवरील देशांतील लोकांतून तुझा देव परमेश्वर याने तुला निवडून घेतले आहे.” CChMara 185.3
खिस्ती लोकांनी जे देवनिंदक (विधर्मी) आहेत अशांशी विवाहबद्ध होऊ नये असेच नव्या करारांत सांगितलें आहे. करिथकरांस लिहिलेल्या पहिल्या पत्रांत प्रेषित पौल उघड सांगत आहे कीं, “नवरा जिवंत आहे तोपर्यंत बायको बांधलेली आहे; नवरा मेल्यावर तिची इच्छा असेल त्याबरोबर पण केवळ प्रभूमध्ये लग्न करावयास ती मोकळी आहे.” पुन: दुसर्य पत्रांत तो लिहितो कीं, “तुम्ही विश्वास न ठेवणार्यांबरोबर जडून विजोड होऊ नका; कारण धर्म व अधर्म यांची भागी कशी होणार ? उजेड व अंधार यांचा मिलाफ कसा होणार ? ख्रिस्ताचे बलियालाराबरोबर कसे ऐक्य होणार ? विश्वास ठेवणारा व विश्वास न ठेवणारा हें कसे वाटेकरी होणार ? देवाच्या मंदिराचा मूर्तिबरोबर मेळ कसा बसणार ? आपण सदावीजी देवाचे मंदिर आहों; देवाने असें म्हटले आहे कीं मी त्यात निवास करीन व चालेन; मी त्यांचा देव होईन व तें माझे लोक होतील. यास्तव त्यातून निघा व वेगळे व्हा, असें प्रभु म्हणतो; आणि अशुद्ध वस्तूला शिवू नका; म्हणजे मी तुम्हांस स्वीकारीन; आणि मी तुम्हांस पिता असा होईन, आणि तुम्ही मला पुत्र व कन्या अशी व्हाल.” CChMara 185.4
मना केलेल्या क्षेत्रात देवाच्या लोकांनी कदापित पाऊल घालण्याचे धाडस करूं नये. ख्रिस्ती व ख्रिस्तीतराचा विवाह देवाने मना केलेला आहे. परंतु ज्यांच्या मनाचे नवीकरण झालेले नाहीं तें हेकेखोरपणाने मना केलेले विवाहसंबंध घडवून आणितात. यामुळेच पुष्कळ पुरुष व स्त्रिया या जगांत आशाहीन व देवहीन असें जगतात त्यांच्या उदार महत्वाकांक्षा भरून जातात. परिस्थितींच्या श्रृंखलाने तें सैतानाच्या जाळ्यांत जखडलेले असतात. CChMara 186.1
“संगनमताशिवाय दोघांचे एकत्र जीवन चालेल का?” “पृथ्वीवर तुमच्यातील दोघे कोणा एका गोष्टीविषयीं एक चित्त होऊन विनंति करितील तर ती माझ्या स्वर्गीय पित्याकडून त्यासाठी केली जाईल.” पण पाहा, परिस्थिती किती विक्षिप्त दिसते ! जेव्हां एकजण निकट सहवासार्न भक्ति रसात रमलेला असतो तेव्हां दुसरा बेपरवाई व निष्काळजी असतो; एकजण सनातन जीवनाचा शोध करितो तो दुसरा मरणाकडे नेणाच्या रुंद मार्गावर चाललेला असतो. CChMara 186.2
अंत:करणाचा पालट न झालेल्याशी विवाह केल्यामुळे आँकडा जनानी ख्रिस्ताचा व स्वर्गीय प्राप्तीचा त्याग केलेला असतो. मर्त्य आणि लाचारीच्या सोबतीपुढे ख्रिस्ताची प्रीति व सोबत इतकी क:पदार्थ असू शकेल काय? बहुमूल्य तारकाविषयींची प्रीति ज्याच्या अंगीं नाहीं. अशाच्या सोबतींत रमण्यासाठी स्वर्गप्राप्तीचा धिकार करावा इतका तो स्वर्ग क्षुद्र वाटावा कीं काय ? CChMara 186.3
धार्मिक तत्त्वांचा अचूकपणा सिद्ध करण्याच्या आणीबाणीच्या कसोटीत प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने कसे काय वागावें ? अनुकरणीय अशा दृढपणाने त्यानें स्पष्ट म्हणावं कीं : “मी एक न्यायनिष्ठ ख्रिस्ती आहे. आठवड्याचा सातवा दिवस हा पवित्रशास्त्राने दिलेला शब्बाथ आहे असा माझा विश्वास आहे. आमची विश्वासनिष्ठा आणि आमची धर्मतत्त्वे विरोधक मार्गदर्शन देतात. आम्हांला एकत्र जीवन जगता येणें शक्य नाहीं. देवाच्या इच्छेचे अधिक पूर्ण ज्ञान मिळविण्यासाठी जर मी जगू लागलों तर माझी जगाविषयींची आवड कमी कमी होत जाईल व मी ख्रिस्तासारखा होत जाईन. जर तुम्हांला ख्रिस्तांचा प्रेमळपणा दिसून येत नसेल व सत्याविषयी आकर्षण वाटत नसेल तर तुमची भक्ति जगावर बसेल व ती तर मला नको आहे, मला तर देवाच्या गोष्टी आवडतात, त्या तुम्हांला नको आहेत. आत्मिक गोष्टींचे मोजमाप आत्मिकतेनेच करता येते. देवाचा मजवर काय हक्क आहे हें तुम्हांला आत्मिक दृष्टीशिवाय कळून येणार नाहीं अगर ज्याची मी सेवा करीत आहे त्या माझ्या स्वामीविषयींची माझीं कर्तव्ये काय हीं तुम्हांला उमजणार नाहींत माझ्या धार्मिक कर्तव्यात मी असतां मी तुमची हेळसांड करिते असें तुम्हांला वाटू लागेल व यांत तुम्हांला सुख वाटणार नाही. माझ्या देवाविषयी माझ्या मनीं जी कळकळ आहे तिच्याविषयी तुमच्या मनीं हेवा वाटू लागेल आणि माझ्या धर्मविश्वासांत मी एकलकोंडी अशी राहीन. तुमची मते पालटतील, देवाच्या अधिकाराला तुम्ही मान द्याल आणि माझ्या तारणाच्यावर प्रीति करण्याचे जेव्हां तुम्ही शिकू लागाल तेव्हांच मात्र आपल्या नातेसंबंधाचे नवीकरण होऊ शकेल.” CChMara 186.4
आपल्या विवेक बुद्धीच्या संमतीने विश्वासणारा याप्रकारे ख्रिस्तासाठी स्वार्थत्याग करितो. सार्वकालिक जीवन गमावण्याचा धोका टाळून त्या जीवनाचें मोल व महत्त्व किती तरी अत्यंत थोर आहे, हें तो दाखवून देतो. जगाच्या आवडीला जो भाळलेला आहे त्याला आपले चरित्र देऊन टाकावे आणि जो मला ख्रिस्ताच्या क्रूसापासून हिरावू पाहातो अशाशीं सोबत करावी यापेक्षां लग्न न करिता ख्रिस्ताशीं बिलगून राहाणे इष्ट होय असें त्याला वाटतें. CChMara 187.1
अविचाराच्या विवाह- मागणीपेक्षां ती मोडलेली बरी CChMara 187.2
ख्रिस्तामध्ये मात्र विवाहसंबंध सुरक्षितपणे जुळविता येतात. दैवी प्रीतीच्या आधारें मानवी प्रीतीचीं निकट बंधने एकत्रित करावीत. तें ख्रिस्ताचे राज्य आहे. तेथेच मात्र खोल, सत्य व नि:स्वार्थी प्रीति असूं शकते. CChMara 187.3
ज्यांच्याशी आपण एक होऊं पाहातो त्यांच्या शिलाविषयी संपूर्ण ज्ञान मिळविल्याशिवाय मागणी जरी झालेली असली तरी विवाहसंबंध अवश्य असा होऊ शकत नाही कारण लग्नाचे शपथविधि घेऊन त्याच्यावर आपण प्रीति करून सन्मान देऊ शकत नाहीं. मागणीचे करार फार काळजीपूर्वक करा. लग्न झाल्यावर ज्याप्रमाणें अनेकजण ताटातूट करितात त्यापेक्षा मागणीच मोडून टाकणे हें फार अधिक बरें. CChMara 187.4
****