कलीसिया के लिए परामर्श
देवभिरू मातापितरांची सल्लामसलत
वैवाहिक जीवनांतून इतकी विपत्ति दृष्टोपत्तीस येत असतां तरुण मंडळी अधिक समंजस का होत नाहीं? पोक्त आणि अधिक अनुभविक लोकांच्या मसलतींची कांही गरज नाहीं; असें त्याना कां वाटत राहावे ? व्यवहार क्षेत्रात पुरुष व स्त्रिया मोठी सावधगिरी राखतात. एकाद्या महत्त्वाच्या धाडसात पडण्यापूर्वी ती आपल्या कर्तव्याची सिद्धता करितात. वेळ व पैसा खर्ची घालून ज्या कामात आपण पाऊल घालणार त्याची फार काळजीपूर्वक चौकशी करतात कारण तसे न केले तर तें पराभूत होतील. CChMara 180.4
विवाहाच्या संबंधात पडताना किती तरी अधिक सावधगिरी घ्यावयास पाहिजे ? कारण त्याद्वारे भावी पिढ्यावर व भावी जीवनावर परिणाम घडून यावयाचा असतो. ह्या ऐवजी गमतीने व अस्थानीं विनोदाने, लहरीने व विकारबुद्धीने, अधदृष्टीने व समतोल विचाराच्या अभावाने विवाहाच्या कार्यात वारवार शिरण्यात येते. याला एकच स्पष्टीकरण आहे कीं या जगांत हालअपेष्टा व नाश आणणे सैतानाला आवडते व या जाळ्यात फसवायला तो तें विणीत असतो. या जगांतील सुख व भावी जगांतील त्याचे गृह याचा आनंद नष्ट करण्याकरिता तो असल्या अविचारी लोकांना हातीं धरण्यात फार खूष असतो. CChMara 180.5
आपल्या आईबापाची मसलत व त्यांचा न्यायनिवाडा यांची परवा न करता मुलांनी आपल्याच इच्छावर व आवडीनिवडीवर अवलंबून राहावे कीं काय? आपल्या आईबापाच्या इच्छा अगर पसंत अगर त्यांचा पोक्त निर्णय यांचा कधीं विचारच करावयाचा नाहीं असें कित्येकाला वाटते. मातापितरांवरची त्यांची भक्ति स्वार्थामुळे अजिबात नष्ट झालेली असतें. या प्रकरणीं तरूणांच्या मनात जागृति निर्माण करण्याची आवश्यकता आहे. मात्र पाचव्या आज्ञेत एक अभिवचन देण्यांत आलेले आहे. परंतु प्रियकरांच्या हिरावणाच्या हक्कामुळे त्या अभिवचनाचे महत्त्व वाटत नाहीं किंबहुना तें झुगारण्यांत येते. आईच्या प्रेमाची उपेक्षा केल्याने आणि बापाने केलेल्या प्रतिपाळाचा धिक्कार केल्याने जी पापे होतात तीं पुष्कळ तरुणांच्या नावें नोंदलेली असतात. CChMara 181.1
आपल्या प्रेमामध्ये कांही अडखळण येऊ नये व त्या प्रेमाच्या व्यवहारात कोणी लुडबुड करुं नये अशी मनोवृत्ति तरुणांनी व अनानुभवांनी करावी, ही या प्रकरणी सर्वांत मोठी चूक होय, प्रत्येक बाजूने जर एकाद्या विषयाचे निरीक्षण करण्याची गरज असेल तर तो हाच एक विषय होय. इतरांच्या अनुभवाचे साह्य व या बाबीविषय उभय पक्षांच्या बाजूचे शांतपणे व काळजीपूर्वक केलेले परीक्षण अत्यंत आवश्यक असें आहे. जनतेत फार मोठा भरणा असा आहे आहे कीं तो या बाबीविषयीं फार उथळपणे विचार करतो. तरुण मित्रांनो, देवाच्या आणि आपल्या देवभिरु मातापित्याच्या सल्ल्याचा फायदा घ्या व या प्रकरणी प्रार्थना करा. CChMara 181.2
“आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या इच्छेची व मताची पर्वा न करता आईबापानींच जोडीदाराची निवड करावी कीं काय?” असा प्रश्न तुम्ही विचाराल तो प्रश्न मी दुसर्य रितीने माडिते. आईबापांची जर आपल्या मुलावर प्रीति असेल व त्याच्या मुलाने किंवा मुलीने आपल्या जोडीदाराच्या केलेल्या निवडीमुळे त्या आईबापांच्या प्रत्यक्ष सुखांत विघ्न निर्माण होत असतांना त्यानें किंवा तिने प्रथम आईबापाची सल्लामसलत घेऊ नये कीं काय? तसेच मुलाने किंवा मुलीने आपल्या आईबापाच्या मसलतीची व विनंत्यांची पर्वा न करता आपल्याच हेकड मार्गाचे अवलंबन करावे कीं काय? माझे स्पष्ट उत्तर असें आहे कीं, छे, यापेक्षा त्यानें किंवा तिने लग्नच न केलेले पुरवले. असल्या वागणुकीवर पाचव्या आज्ञेने मज्जाव घातलेला आहे. “आपला बाप व आपली आई यांचा मान राख, म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाल राहशील.” घ्या ही आज्ञा. तिच्यांत दिलेले अभिवचन जे कोणी पाळतील त्यांच्यासाठी प्रभु आपले वचन खात्रीने परिपूर्ण करील. आपल्या मुलांच्या संमतीला मान दिल्याशिवाय सूज्ञ आईबाप त्याच्या जोडीदारांची निवड कदापि करणार नाहींत. CChMara 181.3
आपल्या तरुण मुलांच्या प्रेमप्रवाहाला असें मार्गदर्शन देण्यांत यावे कीं त्यांनी आपले प्रेमसंबध योग्य अशा सोबत्याशीच जुळवून आणावेत, हें आईबापावर पडलेले एक कर्तव्य असतें, हें त्यांनी ओळखून घ्यावे, त्याचप्रमाणे अगदी प्रारंभापासूनच त्यांनी आपल्या मुलांचे शील असें बनवावे कीं तीं शुद्ध व उदार वर्तनाची व चागुलपणाकडे व सत्याकडे त्यांचा ओढा राहील. ही गोष्ट आईबापांनी आपल्या शिक्षणाच्या व उदाहरणाद्वारे व ईश्वरी कृपेचे साह्य घेऊन आपल्या मुलांपुढे मांडावी. समानतेला समानता आकषून घेतो. समानतेला समानता आवडते. अगदीं बालपणापासूनच मुलांच्या मनात सत्य, शुद्धता व चांगुलपणा यांच्या आवडीचे बीं रुजविण्यात यावेत म्हणजेच तरुणपणी आपल्या अंगच्या गुणांचेच सोबती शोधून काढण्याचा ती प्रयत्न करितील. CChMara 181.4