कलीसिया के लिए परामर्श
इतरांना माहीत असलेल्या मिसेस ई. जी. व्हाईट
प्रभूच्या निरोप्या या नात्याने मिसेस व्हाईट यांना आलेल्या असामान्य अनुभवाची माहिती घेतल्यावर काहींनी असें प्रश्न विचारलें आहेत; कोणत्या प्रकारची ती व्यक्ति होती ? आम्हांला ज्या अडचणी येतात त्या त्यांना आल्या काय ? त्या श्रीमंत होत्या कीं गरीब होत्या? त्या कधीं हसल्या काय? CChMara 18.6
मिसेस व्हाईट या विचारी माता होत्या. त्या उत्तम गृहिणी होत्या व मनमिळाऊ घरधनीण होत्या. त्या नेहमी आपल्या लोकांचा पाहुणचार करीत. त्या साहाय्यकारी शेजारीण होत्या. त्या निश्चयी व दिसण्यांत बर्य होत्या आणि त्यांचा आवाज व चालीरीति उत्तम होत्या. त्यांच्या अनुभवांत लांब तोंड करणे, र्मुखलेला चेहरा व आनंद विरहित धर्म नव्हता. त्यांच्या समक्षतेत सर्वांना समाधान वाटे, मिसेस व्हाईट यांची ओळख करून घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे १८५९ तील त्यांच्या घराला भेट देणे होय. पहिल्या वर्षी त्यांनी दैनंदिनी ठेवली होती. CChMara 18.7
आपल्याला असें आढळून येते कीं, व्हाईट घराणे बॅटलक्रीकच्या हद्दीवरील एका मोठ्या जागेतील लहान घरांत राहात होतें. तेथें बागबगीचा करण्यास, त्यात थोडी फळझाडे, एक गाय व कोंबड्या आणि मुलांना काम करण्यास व खेळण्यास पटांगण होतें. ह्यावेळी मिसेस व्हाईट या ३१ वर्षे वयाच्या होत्या. एल्डर व्हाईट हें ३६ वर्षे वयाचे होतें. त्यावेळी कुटुंबात तीन मुलें होती. त्यांची वये चार, नऊ व बारा अशी होती. CChMara 19.1
आणखी आपल्याला एक ख्रिस्ती मुलगी या कुटुंबात आढळेल. तिला घरकाम करण्यासाठी कामावर घेतली होती. कारण मिसेस व्हाईट ह्या नेहमी बाहेर जात व लिहिण्यांत व बोलण्यांत नेहमी गुंतलेल्या असत. तरी मिसेस व्हाईट घरकामाची जबाबदारी घेत. स्वयंपाक, स्वच्छता, धुणे व शिवणकाम त्या करीत. कांही दिवशी त्या छापखान्याकडे जात. तेथें लिहिण्यासाठी शांत ठिकाण होतें. इतर दिवशी त्या बागेत फुले व भाजीपाला लावतांना व शेजार्यांना देतांना आढळून येत. लेकरांना आवडेल अशा प्रकारचे घर ठेवण्यास त्यांनी निश्चय केला होता. CChMara 19.2
मिसेस व्हाईट या काळजीपूर्वक बाजार करणार्य होत्या. त्यांचे अॅडव्हेंटिस्ट शेजारी त्यांच्याबरोबर बाजारांत जाण्यास आनंद मानीत, कारण त्यांना मालाच्या किंमती माहीत होत्या. त्यांची आई फार व्यवहारिक स्त्री होती. तिने आपल्या मुलींना महत्त्वाचे धडे शिकविले होतें. त्यांना असें आढळून आलें होतें कीं, स्वस्त जिन्नसा, जास्त किंमतीच्या जिन्नसापेक्षा टिकाऊ मालाच्या दृष्टीने महाग पडतात. CChMara 19.3
लेकरांकरिता शब्बांथ दिवस हा आल्हाददायक बनविण्यंत येत असें. सर्व कुटुंब उपासनेला हजर रहात असें. एल्डर व्हाईट व मिसेस व्हाईट यांची बोलण्याची पाळी नसे तेव्हां सर्व कुटुंब उपासनेत एकत्र बसे. दुपारच्या जेवणासाठी इतर दिवसापेक्षा वेगळे जेवण असें व जर दिवस चांगला असला तर मिसेस व्हाईट लेकरांबरोबर नदीकाठाला किंवा जंगलात फिरायला जात व सृष्टीचे निरीक्षण करून देवाच्या उत्पत्तिकार्याचा अभ्यास करीत. जर दिवस थंडीचा किंवा पावसाचा असेल तर त्या आपल्या घरांत शेकोटीभोवती लेकरांना गोळा करीत व प्रवासांत असतांना गोळा केलेल्या माहितीची पुस्तके त्यांना वाचून दाखवीत. त्यापैकी कांही गोष्टी नंतर छापून काढण्यात आल्या. अशासाठी कीं, त्या इतर आईबापांना आपल्या लेकरांना वाचून दाखविण्यास उपयोगी पडाव्या. CChMara 19.4
मिसेस व्हाईट या वेळी बर्य नव्हत्या, त्यांना दिवसा मुच्छ येई; पण त्याकडून त्यांचे घरकाम व देवाचे काम यांत कोणत्याही प्रकारे अडथळा आला नाही. कांही वर्षांनी म्हणजे १८६३ त त्यांना आरोग्य व आजार्याची शुश्रूषा याविषयीचा दृष्टांत झाला. पांघरण्यास योग्य वस्त्र, खाण्यास सकस अन्न व व्यायाम आणि विसावा यांची आवश्यकता, तसेच देवावरील भरंवशाचे महत्त्वच्या गोष्टी बळकट व निरोगी शरीर राखण्यास उपयोगी आहेत असें दृष्टांतांत दाखविण्यांत आलें. CChMara 19.5
अन्न व मांसाहारी अन्नापासून इजा याविषयी देवापासूनच्या प्रकाशाने मांसाहारी अन्न शक्ति व आरोग्य यासाठी जरुरीचे आहे अशा व्यक्तिवाचक मताला मिसेस व्हाईटने खोडून काढिले. त्यांचे मन प्रकाशित करण्यासाठी दृष्टांताद्वारे त्यांना मिळालेल्या प्रकाशाने जेवण तयार करण्यास मदत करणाच्या स्वयंपाकीण मुलीला टेबलावर कडधान्ये, भाजीपाला, दूध, मलाई व अंडी ठेवण्यास शिकविले फळें भरपूर असत. CChMara 20.1
ज्यावेळेस सर्वजण जेवायला बसत, तेव्हां भरपूर उत्तम जेवण असें. पण मांस नसे. मिसेस व्हाईट यांना मांसाची भूक लागे पण दुसर्य जेवणाची लागत नसे म्हणून त्यांनी पुनः परत येवून साधे अन्न आवडेपर्यंत टेबल सोडून दिला. दुसर्य वेळी सुद्धा तोच अनुभव आला पण त्यांना साधे अन्न आवडेना. पुनः टेबलाकडे आल्या तेव्हां टेबलावर आरोग्य, शक्ति व वाढ यासाठी उत्तम असणारे अन्न दृष्टांतात दाखविले होतें तें मांडले होतें पण त्यांना नेहमीच्या मांसाच्या अन्नाची भूक लागली होती कारण त्याची त्यांना सवय होती, तरी आता त्यांना समजून आलें कीं, मांस हें उत्तम अन्न नाही. त्या सांगतात कीं त्यांनी आपले हात आपल्या पोटावर ठेविले व म्हणाल्या, “तू भाकर खाईपर्यंत थांब.” CChMara 20.2
लवकरच मिसेस व्हाईट यांना साधे जेवण आवडू लागले. अन्नांत असा फरक झाल्याने लवकरच त्यांचे आरोग्य सुधारले. त्यांच्या राहिलेल्या आयुष्यांत त्यांना चांगले आरोग्य लाभले. आपल्याला आढळून येईल कीं आम्हांला याबाबतीत जसा कठीण भासते तसे मिसेस व्हाईट यांना कठीण भासलें. जसा आम्हा सर्वांना भूकेच्या बाबतीत विजय मिळवायचा आहे, तसाच त्यांनाहि विजय मिळवायचा होता. आरोग्याच्या बाबतीत व्हाईट कुटुंबाला मोठा आशीर्वाद प्राप्त झाला. एवढेच नव्हे, पण जगांतील हजारो कुटुंबांनाहि फायदा झाला आहे. CChMara 20.3