कलीसिया के लिए परामर्श

125/318

उमेदवारांची कसून तयारी

बाप्तिस्मा घेऊ इच्छिणाच्या उमेदवारांची अधिक पक्की तयारी करण्याची आवश्यकता असतें. पूर्वी दिलेल्या शिक्षणापेक्षा त्यांना अधिक नियमित शिक्षण देण्याची गरज असतें. सत्याचा शोध करण्यासाठी जे नव्याने आलेले असतात. त्यांच्यापुढे ख्रिस्ती जीवनाची तत्त्वे खुलासेवार माडली पाहिजेत. तारणप्राप्तीसाठी आपला ख्रिस्ताशी संबंध जुळलेला आहे. एवढ्याच विश्वासावर कोणीं विसंबून राहूं नये. “मी विश्वास धरितों” एवढे म्हणून भागत नाही तर सत्य जीवन आचरणांत उतरले पाहिजे. आमच्या बोलण्याभाषणात व देवाच्या इच्छेत सुमेळ, आणि आमचे वर्तन व शील पाहूनच आमचा देवाशी कसा काय सबध येतो, हें सिद्ध करुन दाखवायाचे असतें. नियमशास्त्राचे उल्लघन म्हणजेच पाप व त्या पापाचा त्याग केला तरच नियमशास्त्राची व आमची एकरूपता होऊन आम्ही आज्ञाधारक बनतो, हें सर्व कांहीं पवित्र आत्म्याकडून घडून येते. शास्त्रवचनातील प्रकाशाचे काळजीपूर्वक अध्ययन केल्याने, सद्सद्विवेकाची हुकमत ऐकिल्यानें आणि आत्म्याचे साह्य घेण्याची खटपट केल्याने आमच्या अंत:करणात ख्रिस्तीविषयीं अस्सल प्रेम निर्माण होतें. त्यानें स्वत:चा संपूर्णत: यज्ञ करून घेतला. आज्ञापालनांत प्रीतीचे प्रगटीकरण होतें. जे देवावर प्रीति करून त्याच्या आज्ञा पाळतात व जे त्याजवर प्रीति न करता त्यांच्या नियमांची बेपरवाई करितात त्याच्यांतील अंतर स्पष्ट केले जाईल. CChMara 167.1

देवाला संपूर्णपणे शरण जाण्याची कोणाला गरज आहे असें सैतानाला वाटत नाहीं. जेव्हां कोणी अशा प्रकारे शरण जाण्याचे चुकवितो तेव्हां त्याचे पाप कांही सुटत नाहीं. मोठेपणाची भूक व आकांक्षा त्यांत धडपड करीत राहातात; मोहपाश सद्सद्विवेकाचा गोंधळ करून सोडतात व त्यामुळे खरे खुरे नवीकरण घडून येत नाहीं. मोहात पाडावें, दिशाभूल करावी, फसवेगिरी लढवावी याविषयी सैतानी साधने मनांत जी ओढाताण करितात ती जर सर्वांच्या लक्षात येतील, तर विश्वासांत जे नवखे आहेत त्यांच्याकरितां अधिक तत्परतेने श्रम करता येतील. CChMara 167.2