कलीसिया के लिए परामर्श
पवित्रशास्त्राच्या अभ्यासाकडून बुद्धि वाढते.
जर पवित्रशास्त्राचा करावा तसा अभ्यास केला तर मनुष्यें बुद्धीनें बळकट होतील. देवाच्या वचनाच्या विषयातील शब्दाचा थोर साधेपणा व श्रेष्ठ असा मुद्दा मनाला पटवून दिला जातो तेव्हां दसर्य कशानेंहि विचार न पावणाच्या मनष्याच्या शक्ति विकास पावतात, पवित्र शास्त्रांत अमर्याद असें कल्पनेचे क्षेत्र उघडले जाते. त्यातील उत्तम मुद्यावर मनन करण्याकडून, उंच कल्पनेच्या सहवासाकडून, भावना व विचार अधिक शुद्ध व उंच होतात. कोणत्याही सहवासाकडून, भावना व विचार अधिक वाचनापेक्षा पवित्रशास्त्राचे वाचन अधिक प्रमाणात उंच करिते. तरुण लोक आपली श्रेष्ठ वाढ करून घेण्याच्या बाबतींत जेव्हां तें देवाचे वचन म्हणजे श्रेष्ठ असें ज्ञान मिळविण्याचे नाकारतील तेव्हां अपयशी होतील. आज चांगल्या मनाचीं लायक व स्थिर अशी माणसें थोडी आहेत, याचे कारण तें देवाची भीति बाळगीत नाहींत. जे देवावर प्रेम करीत नाहींत त्यांच्या जीवितांत धर्माची तत्त्वे आचरली जात नाहींत. CChMara 154.4
आमच्या बुद्धीच्या शक्ति वाढविण्यास व प्राप्त करून घेण्यास जे साधन लागते त्याचा फायदा घ्यावा अशी देवाची इच्छा आहे. जर पवित्रशास्त्र अधिक वाचले गेले, व त्यांतील सत्य चांगले समजले गेले तर आम्ही अधिक ज्ञान पावलेलेल व बुद्धिवान् लोक होऊ. शास्त्राच्या पानांचा शोध केल्याकडून शक्ति प्राप्त होतें. 13 CChMara 154.5
या आयुष्यातील सर्व बाबतींत मनुष्याच्या वाढीची बाब पवित्रशास्त्राच्या शिकवणीवर अवलंबून आहे. त्याकडून राष्ट्राच्या भरभराटीची मुख्य कोनशिला बसवणारी तत्त्वे, समाजाला एकत्र बांधणारी तत्त्वे, कुटुंबाचे संक्षरण करणारी तत्त्वे व ज्याशिवाय मनुष्याला नि:स्वार्थीपणा, सुख व मान या जीवितांत मिळू शकत नाहीत किंवा अमरत्व व भावी आयुष्याची आशा लाभत नाहीं अशीं तत्त्वे त्यात सांगितली आहेत. जर पवित्रशास्त्र हें महत्त्वाच्या तयारीसाठी शिकविले जात नाही. तर मनुष्याचा अनुभव जीवितांतील दर्जा त्याला प्राप्त होणार नाही. 14 CChMara 154.6