कलीसिया के लिए परामर्श

108/318

वाचकांना दैवी ज्ञानप्राप्तीचें आश्वासन

आपल्या कर्त्यांच्या शीलाप्रमाणे मर्यादित व्यक्तीकडून कधीही समजली जाणार नाहींत अशीं रहस्ये देवाचे वचन प्रगट करते. उत्पन्नकत्यांकडे आमचे मन लावतें ; जो अगम्य प्रकाशात राहातो. त्याच्याकडे आमचे मन लावते. (१ तिमथ्य. ६:१६) तें त्याचे हेतु दर्शवते. त्यांत मानवी इतिहासाचा समावेश होतो. सर्वकाळात त्याची पूर्णता घडून येईल. अमर्याद खोलीच्या व महत्त्वाच्या विषयाकडे म्हणजे ज्याचा संबंध देवाच्या राज्याशी येतो व मनुष्याच्या भवितव्याशीं येतो अशा गोष्टीकडे लावतें. CChMara 153.3

जगांत पापाचा प्रवेश, ख्रिस्ताचा मानवावतार, पुनरुत्पत्ति व पुनरुत्थान व पवित्रशास्त्रामधील अनेक विषय मानवी मनाला समजण्यास कठीण अशीं रहस्ये असून ती समजण्यास व स्पष्ट करण्यास कठीण आहेत. पण देवाने आपल्या वचनांत त्यांच्या दैवी शीलाचे भरपूर पुरावे दिले आहेत. आम्ही त्याच्या वचनाविषयी संशय बाळगू नये. कारण त्याच्या योजनेतील सर्वच रहस्यें आम्ही जाणू शकत नाही. CChMara 153.4

देव व त्याचे कार्य याविषयी मनुष्याला (म्हणजे उत्पन्न) केलेल्या प्राण्यांना समजणे शक्य असतें तर त्यांच्याकरता काहीं वाढ, काहीं ज्ञान व मनाची व अंत:करणाची वाढ झाली नसती. देव श्रेष्ठ राहिला नसता व मनुष्य ज्ञानाच्या व कर्तव्याच्या मर्यादेस पोहचला असतां तर त्याची वाढ थांबली असती. पण असें नाही म्हणून देवाचे उपकार मानू या. देव अमर्याद आहे यामध्ये सर्व ज्ञानाचे व समंजसपणाचे साठे आहेत. सर्वकाळपर्यंत मनुष्य शोध करीत शिकत राहील. तरी त्यांना त्यांचे ज्ञान संपादितां येणार नाही व त्याचा चांगुलपणा व त्याचे सामर्थ्य आजमावितां येणार नाही. CChMara 153.5

पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाशिवाय आम्ही सतत पवित्रशास्त्राचा विपर्यास करूं किंवा त्याचा गैर अर्थ करूं. शास्त्राचे लाभाशिवाय अधिक पठण होतें व काहीच्या बाबतींत नक्की इजा होतें. देवाचे वचन पूज्यबुद्धीशिवाय व प्रार्थनेशिवाय उघडले जाते आपले विचार व आपल्या आवडी देवावर केंद्रित केल्या जात नाहींत किंवा त्याच्या इच्छेनुसार नसतात. तेव्हां मन संशयाने भरले जाते. शास्त्राच्या अभ्यासांत नश्वरता प्रबळ होतें. आपला शत्रु आपल्या विचाराचा ताबा घेतो व चुकीचे अर्थ सुचवितो. 9 CChMara 153.6