कलीसिया के लिए परामर्श

105/318

या धमकीचा कसा स्वीकार करावा

जे देवाच्या आत्म्यानें धमकाविले आहेत त्यांनी नम्र अशा साधनाविरुद्ध उठू नये. नाशापासून तारण्यास बोलणारा तो असून मर्त्य प्राणी नव्हें. धमकी स्वीकारण्यास मानवी स्वभावाला आवडत नसते. तसेच मनुष्याच्या अंत:करणाला देवाच्या आत्म्याकडून मिळालेला प्रकाश स्वीकारणे अशक्य आहे. धमकीची व मिळणाच्या आशीर्वादाची आवश्यकता भासणे हेहि अशक्य आहे. मनुष्य मोहाला वश होतो व पापांत गुंगतो तेव्हां त्याचे मन अंधारात पडते त्याची नैतिक इद्रिय कुमार्गाला लागतात. सदसद्विवेकाचे इशारे नाकारले जातात व त्याची वाणी अस्पष्ट ऐकू येते. हळूहळू त्याला बरें व वाईट यांतील फरक कळण्याची शक्ति तो गमावून बसतो व आपला देवापुढे दर्जा काय आहे हें विसरून जातो. CChMara 149.3

तो धर्माच बाह्यांगे पाळून उत्साहाने तत्त्वांचे पालन करील. पण त्याची वृत्त निराश्रित होईल. त्याची स्थिति साक्षीदाराने वर्णन केल्याप्रमाणे होतें. “तूं म्हणतोस कीं मी श्रीमंत आहें व मी मालमत्ता साठविली आहे व मला कांही उणें नाहीं. पण तुझी स्थिति कष्टी, दीन, उघडीबागडी, दरिद्री व अध अशी आहे.” जेव्हां देवाचा आत्मा या धमकीच्या संदेशाद्वारे त्याची स्थिति प्रगट करितो, तेव्हां हा संदेश खरा आहे असें त्याला दिसत नाही. म्हणून त्यानें हा इशारा नाकारावा काय ? नाहीं. CChMara 149.4

देवानें भरपूर पुरावा दिला आहे अशासाठीं कीं, ज्यांना तसे करण्याची इच्छा आहे त्यांनी संदेशाच्या स्वभावाबद्दल संतुष्ट व्हावे, तें देवापासून आहेत हें जाणून ही धमकी स्वीकारणे त्यांचे कर्तव्य आहे. मग त्यांना त्यांचा मार्ग पापिष्ट आहे हें दिसूं अगर न दिसूं. जर त्यांनी स्वत:ची स्थित पूर्णपणे जाणली तर धमकीची काय गरज आहे? त्यांना माहीत नाहीं कीं, देवाने आपल्या दयेने त्याच्यापुढे सत्य मांडले आहे. अशासाठीं कीं, त्यानी पश्चात्ताप करून उशीर होण्याआगोदर सुधारणा करून घ्यावी. जे कोणी हा इशारा नाकारतील तें फसगत होण्याकरिता अंधळे होतील; पण जे कोणी तो स्वीकारतील व उत्साहाने गरजेची कृपा प्राप्त होण्यासाठी आपल्यापासून पाप वेगळे करण्याचे काम करतील तें आपल्या अंत:करणाचे द्वार उघडतील अशासाठीं कीं, तारणाच्याने येऊन त्याबरोबर वस्ती करावी. जे अधिक प्रमाणात देवाच्या सानिध्यात आलें आहेत तें देव त्याच्याशी बोलतो तेव्हां त्याची वाणी ओळखतात. जे आत्मिक आहेत तें आत्मिक गोष्टी जाणतात. प्रभूने आपल्या चुका दाखविल्या म्हणून तें उपकारिक बनतील. CChMara 150.1

दाविदानें देवाशी सबंध ठेवून परात्पराच्या शिक्षेखाली नम्र होऊन ज्ञान मिळविले. त्याच्या खर्‍य स्थितीचे वर्णन नाथान भविष्यवाद्याने करून दाविदाला त्याच्या पापाची जाणीव होऊ दिली व पापे घालवून देण्यास त्याला मदत झाली. त्यानें देवाचा सल्ला सौम्यपणे स्वीकारून स्वत:ला देवापुढे नम्र व लीन केलें, “देवाचे नियमशास्त्र पूर्ण आहे तें मनाचे पुनरुज्जीवन करते.” स्तोत्र १९:७. CChMara 150.2

“ज्या शिक्षेचे भागीदार सर्व झाले आहेत अशा शिक्षेविरहित तुम्ही जर आहां तर तुम्ही पुत्र नाही.” (इब्री १२:८.) प्रभूने म्हटले आहे, “जितक्यावर मी प्रीति करतों तितक्याना त्याचे अपराध त्यांच्या पदरीं घालतों व शिक्षा करतो. (प्रगटी.२:१९). हल्ली कोणतीही शिक्षा आनंदाची भासत नाहीं, पण दुःखाची वाटते तरी ज्यास तिचा अभ्यास झाला त्यास ती पुढे धार्मिकता में शांतिकारक फळ देते. (इब्री १२:११.) जरी शिस्त कडू वाटते तरी ती पित्याच्या आम्हांवरील प्रेमामुळे नेमलेली आहे अशासाठीं कीं, आम्ही त्याच्या पवित्रपणाचे भागीदार व्हावें.” 11 CChMara 150.3

*****