कलीसिया के लिए परामर्श
संदेशाचा दुरुपयोग
संदेशाचे पहिले पुस्तक छापिलें त्यांत देवाच्या लोकांना दिलेल्या प्रकाशाचा दुरुपयोग करण्याच्या बाबतींत इशारा देण्यांत आला आहे. मी म्हटले कीं, पुष्कळांनी चुकीचा मार्ग स्वीकारला आहे. जेव्हां त्यांनी आपल्या विश्वासाविषयी तें इतरांशी बोलले आहेत व पुरावा विचारण्यांत आला त्यावेळी त्यांनी पवित्रशास्त्राकडे पुराव्यासाठी जाण्याऐवजी माझी पुस्तकें वाचली. मला असें दाखविण्यांत आलें कीं, हा मार्ग चुकीचा असून त्याकडून विश्वास न धरणारे सत्याविरुद्ध शत्रू बनतील. संदेशाविषयी योग्य माहिती नसणार्यांना त्यांचा कांही फायदा नाहीं. अशा बाबतींत त्यांचा उल्लेख करूं नये. CChMara 148.2
पुढीलप्रमाणे संदेशाच्या उपयोगाविषयी वेळोवेळीं इशारे देण्यांत आलें आहेत. 8 CChMara 148.3
“कांहीं सुवार्तिक याबाबतीत मागें आहेत त्यांचा संदेशावर विश्वास आहे. काहीजण यांचा कडक नियम म्हणून उपयोग करून ज्यांना त्याविषयींची माहिती नाहीं. त्याकरता धोके निर्माण करतात. स्वत: त्याप्रमाणे वागण्यास चुकतात. त्यांनी ज्यांचा पूर्ण अवमान केला आहे अशा सदेशाची त्यांनी पुनरावृत्ति केली आहे. असें करणे योग्य नाही.” CChMara 148.4
देवानें इतरांच्या चुका व पापे याबाबतींत जे दाखविले आहे त्याचा पुष्कळांनी फायदा घेतला आहे असें मला दिसलें. दृष्टांतांत जे दाखविण्यांत आलें आहे त्याचा भलताच अर्थ त्यांनी केला आहे. देवाने जे दाखविले आहे त्यावरील पुष्कळांचा विश्वास दुर्बल केला आहे. मंडळीला निराश केले आहे. 9 CChMara 148.5